India's 177th rank in 'Environment Performance Index-2011'

 1. वैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण 180 देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत 177 व्या स्थानी आहे.
 2. 10 श्रेणीत विविध 24 मुद्द्यांवर संशोधन करून हा अहवाल तयार केला गेला आहे. यामध्ये वायूची गुणवत्ता, जल व स्वच्छता, कार्बन उत्सर्जन तीव्रता (GDP च्या प्रति संयंत्र उत्सर्जन), जंगलतोड आणि सांडपाण्यावर उपचार प्रक्रिया या बाबींचा समावेश आहे.
 3. एनवायर्नमेंट परफॉर्मेंस इंडेक्स:-
  1. हा निर्देशांक शासनाद्वारे त्याच्या क्षेत्रात राबवविलेल्या पर्यावरण सुधारणा कार्यक्रम आणि त्याच्याशी संबंधित धोरणांचे आकलन करते.
  2. हा अहवाल पहिल्यांदा वर्ष 2002 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.
  3. हा अहवाल येल विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठ यांच्याद्वारे तयार केला जातो.
  4. यामध्ये जागतिक आर्थिक मंच (WEF) आणि जॉइंट रिसर्च सेंटर ऑफ यूरोपियन कमिशन देखील सामील असतात.
एनवायर्नमेंट परफॉर्मेंस इंडेक्स
 1. ठळक बाबी
 2. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नियमित प्रयत्न करणार्‍या देशांमध्ये स्वित्झर्लंड प्रथम स्थानी आहे. त्यानंतर फ्रांस, डेनमार्क, माल्टा आणि स्वीडन यांचे शीर्ष 5 मध्ये स्थाने आहे.
 3. यादीत शेवटच्या पाच देशांमध्ये भारत, बांग्लादेश, बुरुंडी, कांगो प्रजासत्ताक आणि नेपाळ यांचा समावेश आहे.
 4. भारताच्या शेजारी राष्ट्रांचा - चीन आणि पाकिस्तानचा क्रम यादीत अनुक्रमे 120 आणि 169 वा आहे.
 5. चीन आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पर्यावरणावर लोकसंख्या वाढीचा भार आणि वेगाने वाढणार्‍या आर्थिक परिस्थितीचा भार दिसून येत आहे.
 6. वायूची गुणवत्ता हे सार्वजनिक आरोग्यासाठी एक प्रमुख कारण म्हणून उदयास आले आहे. वर्ष 2016 मध्ये, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन यांच्या अहवालानुसार, संपूर्ण वर्षभरात पर्यावरणाशी संबंधित मृत्यू आणि आलेले अपंगत्व यांच्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषनामुळे झालेल्या मृत्युचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश इतके आहे.
 7. अतिसूक्ष्म PM2.5 कणामुळे मरणार्‍यांची संख्या गेल्या दशकात वाढलेली आहे. एका अंदाजानुसार, भारतात वायू प्रदूषणामुळे 16,40,113 मृत्यू वर्षाला होतात.
 8. भारत सरकारची कारवाई असूनही, घन इंधनापासून होणारे प्रदूषण, कोळसा आणि पीकांचे अवशेष जाळण्यामुळे होणारे प्रदूषण आणि मोटार वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे देशातील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. भारताच्या पर्यावरण मंत्रालयाकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया उपलब्ध नाही.


Delhi Declaration - ASEAN Bharat Memorial Shikhar Parishad concludes

 1. ASEAN-भारत संबंधांना 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. यानिमित्ताने, 25-26 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्लीत ASEAN-भारत स्मारक शिखर परिषदेचे (AICS) आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या शेवटी चर्चा झालेल्या मुद्द्यांना स्पष्ट करणारे सर्वसंमतीने दिल्ली घोषणापत्र अंगिकारले.
 2. दिल्ली घोषणापत्रात गेल्या 25 वर्षांपासून भारत ASEAN संवादाच्या तीन स्तंभांचा - राजनैतिक-सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक सहकार्य – यांचा उल्लेख केला गेला आहे तसेच दोन्ही पक्षांमध्ये शांती, प्रगती व समन्वयित समृद्धीच्या भागीदारीची कार्ययोजना याच्या अंमलबजावणी संदर्भात प्रगतीवर संतोष व्यक्त केला गेला.
 3. मान्य करण्यात आलेल्या बाबी:-
  1. सर्व प्रमुखांनी भारत आणि ASEAN ने आपली धोरणात्मक भागीदारी पुढे सुरू ठेवत सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि अन्य सीमावर्ती गुन्ह्यांना रोखण्यासाठी एकत्र काम करणे, क्षेत्रीय आर्थिक भागीदारी सहकार्य कराराला निर्णायक परिसीमेपर्यंत पोहचवणे तसेच भारत व ASEAN दरम्यान परिवहन व डिजीटल कनेक्टिव्हिटीला अधिक चांगले करण्याचा संकल्प व्यक्त केला.
  2. संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात शांती, स्थायित्व, सुरक्षा, व्यापार यांसाठी जहाजांच्या अबाधित वहनासाठी नियमबद्ध व्यवस्थेसाठी काम करण्याचे मान्य करण्यात आले.
  3. शांती, प्रगती आणि सामायिक समृद्धी (2016-2020) यांसाठी ASEAN-भारत भागीदारीची अंमलबजावणी करण्यासाठी कृतीयोजनेच्या संपूर्ण, प्रभावी आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी प्रयत्न आणि सहकार्य करत राहणे.
  4. ASEAN-भारत परिषद, पूर्व आशिया परिषद, भारतासोबत मंत्रिस्तरीय बैठक (PMC+1), ASEAN क्षेत्रीय मंच (ARF), ASEAN संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM) प्लस आणि अन्य ASEAN-भारत मंत्रिस्तरीय/क्षेत्रीय यंत्रणा यांसारख्या भागीदारीच्या विद्यमान कार्यचौकटीमध्ये उच्चस्तरीय सहभाग आणि सहकार्य वाढविणे.
  5. ASEAN समुदाय दृष्टीकोण 2025 च्या पूर्ततेच्या दिशेने ASEAN एकात्मता आणि ASEAN समुदाय बांधणी प्रक्रियेमध्ये समर्थन देणे आणि योगदान देणे चालू ठेवणे.
  6. शांती, सुरक्षा, कायद्याचे अधिराज्य कायम ठेवण्यासाठी, शाश्वत आणि समाकलित विकासासाठी, न्याय वाढ आणि सामाजिक सुसंवाद वाढविण्यासाठी मध्यस्थांच्या वैश्विक चळवळी संदर्भात लेंगकवी जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीला समर्थन देणे. 
  7. दहशतवाद विरोधात आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात सुरक्षा सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने सहकार्याला बळकट करणे.
दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN)
 1. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.
 2. याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.


Announcement of bravery award for military personnel to be provided

 1. 2018 सालच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय लष्कराच्या कर्मचार्‍यांना एक किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र प्रदान केले जाणार आहेत.
 2. जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री विभागाच्या चौथ्या तुकडीचे मेजर विजयन बिस्त यांना किर्ती चक्र दिला जाईल.
 3. मेजर अखिल राज आर.व्ही., कॅप्टन रोहित शुक्ला, कॅप्टन अभिनव शुक्ला, कप्तान प्रदीप शौरी आर्य, हवलदार मुबारक अली, हवालदार रवींद्र थापा, नाईक नरेंद्र सिंह, लान्स नाईक बदर हुसेन आणि पॅराट्रूपर मांचू यांना शौर्य चक्र प्रदान केले जाईल.
 4. किर्ती चक्र आणि शौर्य चक्र (1952 सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्‍यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत.
 5. महावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.


Top