Magnetic Maharashtra Convensions 2018

 1. मुंबईत पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४,१०६ सामंजस्य करार झाले.
 2. उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्रासाठी हा एक मैलाचा दगड ठरला.
 3. या परिषदेला उद्योजकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला आहे.
 4. या परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते.
 5.  ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी झाले.
 6. तर २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.
 7. जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
 8. यापूर्वी २०१६मध्ये मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. या परिषदेत ८ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ 

 1. एकूण करार : ४ हजार १०६
 2. गुंतवणूक : १२,१०,४०६ कोटी 
 3. रोजगार : ३६ लाख ७७ हजार १८५
 4. क्षेत्रनिहाय गुंतवणूक (कोटी रुपयांमध्ये)
  1. उद्योग : ५ लाख ४८ हजार १६६
  2. गृह निर्माण : ३ लाख ८५ हजार
  3. ऊर्जा : १ लाख ६० हजार 
  4. उच्च शिक्षण :  २ हजार ४३६  
  5. महाआयटी : ५ हजार ७०० 
 5. पायाभूत प्रकल्पांसाठी सरकारची ३ लाख ९० हजार कोटींची गुंतवणूक:-
  1. वाहतूक आणि बंदरे (४८ प्रकल्प) :  ५९ हजार ३२ कोटी
  2. सार्वजनिक बांधकाम (५ प्रकल्प) : १ लाख २१ हजार ५० कोटी
  3. मुंबई महानगरपालिका (१८ प्रकल्प) : ५४ हजार ४३३ कोटी
  4. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (३० प्रकल्प) :  १ लाख ३२ हजार ७६१ कोटी
  5. नगर विकास (३ प्रकल्प) : २३ हजार १४३ कोटी
  6. देशातील पहिल्या ज्वेलरी पार्कची उभारणी लवकरच मुंबईनजीक करण्याची घोषणाही या परिषदेत करण्यात आली.
  7. लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना प्रस्तावित असून, त्या माध्यमातून ६० हजार रोजगार निर्माण होतील.
  8. गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदुरबार यांसारख्या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागातही गुंतवणूक होणार आहे.

 

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ चे परिणाम 
 1. प्रमुख गुंतवणूक करार आणि प्रकल्प
  1. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड : ६० हजार कोटी
  2. व्हर्जिन हायपरलूप वन : ४० हजार कोटी
  3. थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर (अमोल यादव) : ३५ हजार कोटी
  4. जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल : ६ हजार कोटी
  5. ह्योसंग कंपनी : १२५० कोटी
  6. महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल : ५०० कोटी
 2. क्लस्टर विकासामुळे एमएसएमई उद्योगांना चालना:-
  1. राज्यात क्षेत्रनिहाय क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना फायदा होणार आहे. त्याचा थेट रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे.
  2. सिंधुदुर्ग येथे कॉयर क्लस्टर विकसित होणार असून, ७.५६ कोटींची गुंतवणूक होणार.
  3. रायगड जिल्ह्यात चामडे उद्योगाचे क्लस्टर असून, त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक होणार.
  4. पालघरमध्ये चित्रावारली फाउंडेशन आर्ट ॲण्ड क्राफ्ट क्लस्टरसाठी १ कोटींची गुंतवणूक.
  5. नागपूरमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी ५ कोटींची गुंतवणूक होईल.
  6. अहमदनगरमध्ये गोल्ड ज्वेलरी क्लस्टर विकसित केले जाणार. 


Organizing an International Conference on 'Sustainable Organic Fuels' in New Delhi

 1. शाश्वत जैव इंधन विषयावर नवी दिल्लीत 26-27 फेब्रुवारी 2018 रोजी एक आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
 2. या परिषदेचे आयोजन  मिशन इनोव्हेशन  आणि   बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म यांच्या वतीने भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून केले जात आहे.
 3. परिषदेचे उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तसेच पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते केले जाणार आहे.
 4. परिषदेचे स्वरूप:-
  1. परिषदेत जैव इंधन क्षेत्रातील संशोधकांना एकत्र आणले जाणार आहे. वर्तमान ज्ञान, माहितीचा आढावा घेणे, माहिती आणि सर्वोत्तम कार्यपद्धती याबाबत माहिती सामायिक करणे आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीसाठी एकत्र येणे यासारखी उद्दीष्टे साध्य केले जातील. 
  2. या कार्यक्रमात उद्योग व गुंतवणूकदार, विविध देशांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी, विशेषज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि इतर प्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे.
  3. परिषदेत सहभागी देशांद्वारे बनवलेल्या जैव-अर्थव्यवस्थेच्या विकासाला स्पष्टपणे समजून घेतले जाईल आणि या क्षेत्रात येणार्‍या आव्हानांबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. 
  4. परिषदेच्या शेवटी बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म समूह आणि मिशन इनोव्हेशन मधील सदस्य देशांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आलेले "शाश्वत जैव इंधन विषयक दिल्ली घोषणापत्र" ला स्वीकारण्यात येईल.

मिशन इनोव्हेशन (MI)

 1. पार्श्वभूमी:-
  1. मिशन इनोव्हेशन (MI) हा 22 देश आणि युरोपीय संघाचा एक वैश्विक पुढाकार आहे, जो जागतिक पातळीवर स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात अभिनवतेला प्रोत्साहन देत आहे.
  2. पुढाकाराचा एक भाग म्हणून, भागिदार देशांनी पाच वर्षांमध्ये स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास दुप्पट करण्याचे वचन दिलेले आहे.
  3. शाश्वत जैव इंधन हा सात अग्रगण्य अभिनवतेसंबंधी आव्हानांपैकी एक आहे आणि त्यात ब्राझील, कॅनडा आणि चीन या देशांसोबत भारत सह-नेतृत्व करीत आहे.
  4. शाश्वत जैव इंधनाच्या विकासामध्ये येणार्‍या प्रमुख आव्हानांना हाताळण्यासाठी सहभागी देश एकत्र कार्य करीत आहेत.


Ayushman Bharat scheme appointment Dr Dinesh Arora as director

 1. निती आयोगाचे आरोग्य संचालक डॉ. दिनेश अरोरा यांची नुकतीच ‘आयुष्मान भारत’ या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे संचालक म्हणून नेमणूककरण्यात आली आहे.
 2. आयुष्मान भारत अमेरिकेतील ओबामा केअरएवढीच मोठी आरोग्य योजना असून, यायोजनेची प्राथमिक आखणी अरोरा यांनी केली होती.
 3. अरोरा हे एमबीबीएस डॉक्टर होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत आले. मूळ चंदिगढचे असलेले डॉ. अरोरा केरळ केडरचे २००२च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पंजाबी, मल्याळम, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
 4. केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील ओट्टापल्लम येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्द सुरू केली.
 5. त्यांनी सार्वजनिक आरोग्य योजनेत केरळमध्ये २००६-२००९ दरम्यान काम केले आहे. त्यांच्या काळात केरळने आरोग्य क्षेत्रातील अनेक निर्देशांकांत बाजी मारली होती.
 6. विम्यातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला पैसा मिळेल व तो पैसा पुन्हा याच व्यवस्थेसाठी वापरल्याने ही योजना बळकट होईल, असे त्यांचे मत आहे.
 7. त्यांनी केरळात बेकायदा खाणींवर बंदी, बंदिस्त हत्तींच्या समस्या, वाहतूक अशा अनेक प्रश्नांत लक्ष घालून शिस्त आणली. त्यामुळे बेधडक अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक आहे. 
 8. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचाअर्थशास्त्र व राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
 9. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळात काम करताना त्यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य) यात चमकदार कामगिरी केली आहे.


Mandrina has official language status from Pakistan

 1. पाकिस्तानमधील सिनेटने चीनमधील मँडरिन या भाषेचा पाकिस्तानमधील अधिकृत भाषांच्या यादीत समावेश केला आहे.
 2. त्यामुळे पाकिस्तानमध्ये इंग्रजी, अरबी, उर्दुसह मँडरिनचाही अधिकृत भाषांच्या यादीत समावेश झाला आहे.
 3. मँडरिनला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरअंतर्गत जनतेमधील संवाद वाढण्यास हातभार लागेल, असा दावा केला जात आहे.
 4. पाकिस्तानमध्ये पंजाबी, पश्तू या भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, अजूनही या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
 5. पाकिस्तानमधील बोली भाषांना डावलून परदेशी भाषेला अधिकृत भाषांच्या यादीत स्थानदेण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
 6. पाकिस्तान-चीनमधील वाढते व्यापारी संबंध पाहता पाकमधील अनेक जण मँडरिन ही भाषा शिकत आहेत.
 7. चीनमधील शैक्षणिक संस्थांनीही पाकमध्ये मँडरिन भाषा वर्ग सुरु केले आहेत. तर पाकिस्तानमधील काही शाळांमध्येही ही भाषा शिकवली जाते.
 8. पश्चिमेकडील देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे पाकमधील तरुणाईचा कल आता चीनकडे वाढत असल्याचेसांगितले जाते. 


Researchers from the University of Hyderabad developed drugs destroying deadly malaria agents

 1. हैदराबाद विद्यापीठामधील संशोधकांच्या चमूने प्राणघातक मलेरिया (हिवताप) ला कारणीभूत ठरणार्‍या परजीवीला नष्ट करणारे एक औषध विकसित केले आहे.
 2. औषध मलेरियास कारणीभूत असलेल्या प्लास्मोडीयम फाल्सिपरम नामक परजीवीला नष्ट करण्यास सक्षम आहे.
 3. विद्यापीठातील अभियांत्रिकी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रा. प्रदीप पाइक यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी पॉलिमर-आधारित एक नॅनोमेडिसीन विकसित केलेले आहे.
 4. हे औषध लाल रक्तपेशींमधील मलेरियाच्या परजीवीच्या संक्रमणाला नष्ट करण्यात कुशल आहे.
 5. पुढे औषध आता जनावरावरील चाचणीसाठी वापरले जाणार आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. मलेरिया:-
 2. मलेरिया आजार प्लास्मोडीयम फाल्सिपरम नामक परजीवीच्या संक्रमणाने होतो. परजीवांचे संक्रमण प्रभावित मच्छराच्या माध्यमातून होतो.
 3. जागतिक आरोग्य संघटनेचा असा अंदाज आहे की, मलेरिया हा मानवीय जीवनातील सर्वात भयंकर श्वासोच्छ्वासांसंबंधी आजारांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे 212 दशलक्ष लोकांना याचा प्रादुर्भाव होतो आणि दरवर्षी 4,29,000 जण मृत्यूमुखी पडतात.
 4. मानवाला प्रभावित करणार्‍या चार परजीवी प्रजातींपैकी ‘प्लास्मोडीयम फाल्सिपरम’ एक असलेले अधिक धोकादायक आहे. वर्तमान परिस्थितीत सर्व उपलब्ध औषधे नवीन औषध-विरोधी मलेरियावर प्रभावी नाहीत आणि त्यामुळे नवीन औषधे विकसित करण्याची त्वरित गरज भासत आहे. जगभरात याबाबत संशोधन चालू आहे.


The FIU has prepared a list of 9500 high-risk financial companies

 1. वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत फायनेंशियल इंटेलिजेंस यूनिट (FIU) ने जवळपास 9500 बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFC) एक यादी तयार केली आहे, ज्यामध्ये कंपन्यांना उच्च जोखीम असलेल्या वित्तीय संस्थांच्या श्रेणीत अंतर्भूत करण्यात आले आहे.
 2. FIU इंडियाला या कंपन्या 31 जानेवारी 2018 पर्यंत पैसा घोटाळा प्रतिबंधक कायद्याचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे.
 3. कायद्याअंतर्गत सर्व NBFC साठी वित्तीय संस्थांमध्ये प्रिन्सिपल ऑफिसरची नियुक्ती करणे आवश्यक आहे आणि 10 लक्ष रुपये वा त्याहून अधिकच्या शंकास्पद रोख व्यवहारांच्या बाबतीत FIU कडे माहिती देणे सक्तीचे आहे.
 4. या संस्थांना 5 वर्षासाठी व्यवहार आणि ग्राहकांची ओळख यासंबंधी माहिती संरक्षित करणे आवश्यक आहे.
 5. बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) ही कंपनी कायदा-1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असते, जी कर्ज आणि सावकारी व्यवसाय, समभागांची खरेदी, स्टॉक, बॉण्ड्स भाडे-खरेदी, विमा व्यवसाय किंवा चिटफंड व्यवसाय या क्षेत्रांमध्ये कार्यरत असते.
 6. मात्र यात अश्या कोणत्याही संस्थेचा समावेश होत नाही, ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती, औद्योगिक क्रियाकलाप किंवा स्थावर मालमत्तेची विक्री, खरेदी किंवा बांधकाम या बाबींचा समावेश आहे.
 7. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून NBFC च्या कामकाजाचे नियमन केले जाते.


important things about day

 1. घटना:-
  1. १९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
  2. २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
  3. २००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
 2. जन्म:-
  1. १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)
  2. १९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)
  3. १९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)
  4. १९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.
 3. मृत्यू:-
  1. १९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.
  2. १९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)
  3. १९३६: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)
  4. १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर१८८८)


Top