1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद १ ऑक्टोबरला शिर्डी विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अहमदनगरमधील शिर्डी विमानतळाचा व्यावसायिक वापर करण्यास हवाई वाहतूक महासंचालनालने (डीजीसीए) मागील आठवड्यात परवानगी दिली.
 2. हे विमानतळ मुंबईपासून २३८ किलोमीटर अंतरावर आहे.  १ ऑक्टोबर पासून साईबाबा संस्थान ट्रस्टकडून साईबाबा समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.
 3.  महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’ने (एमएडीसी) शिर्डीतील विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानतळाची मालकीदेखील याच कंपनीकडे राहणार आहे. ‘मुंबई-शिर्डी’ विमानसेवेची उड्डाण चाचणी आज पार होणार आहे. शिर्डीसाठी झेपावणाऱ्या विमानातून अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे उड्डाण करणार आहेत.
 4.  आम्ही ‘एटीआर ७२’ विमानाच्या मदतीने उड्डाण चाचणी घेणार आहोत. यानंतर १ ऑक्टोबरला या विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल,’ अशी माहिती ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकनी यांनी दिली.
 5. ‘शिर्डीतील विमानतळावरुन एअर इंडियाचा भाग असलेल्या ‘ अलायन्स  एअरवेज’चे विमान उद्घाटनानंतरचे पहिले उड्डाण करेल. या विमानतळाचा व्यावसायिक वापर २ ऑक्टोबरपासून सुरु होईल,’ असेही त्यांनी सांगितले. या विमानतळावरुन भविष्यात रात्रीच्या वेळीही विमानाचे उड्डाण करण्याची योजना आहे.
 6. नवी दिल्ली, हैदराबाद विमानतळांसोबत शिर्डी विमानतळ जोडले जाणार आहे. शिर्डीत दररोज  ८० हजार साईभक्तांची ये-जा सुरु असते. या विमानतळामुळे साईभक्तांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.


 1. अफगाणिस्तानमध्ये भारतीय सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्टीकरण संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांची भेट घेतल्यानंतर सीतारमन यांनी अफगाणिस्तानमध्ये भारतीय सैन्य पाठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
 2. अफगाणिस्तानमध्ये भारताने सक्रीय व्हावे असे अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. यानंतर भारत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवणार अशी चर्चाही सुरु झाली. मंगळवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस हे भारतात आले होते. द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर सीतारामन व मॅटिस यांनी चर्चा केली. चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी  अफगाणिस्तानात सैन्य पाठवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्यक्ष लष्करी मदत करण्याची शक्यता फेटाळून लावली.
 3.  पाकि स्तानमधून दहशतवाद पसरवला जात असून त्याचा फटका अफगाणिस्तानला बसत आहे, असा आरोप त्यांनी केला. अफगाणास्तानातील विकासकामे आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात भारत नेहमीच सहकार्य करेल असे त्यांनी स्पष्ट केले.
 4.  सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाबाबत दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशाला जबाबदार ठरवून दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा व दहशतवादी छावण्या मोडून काढल्या पाहिजेत असे सीतारामन यांनी म्हटले आहे. तर मॅटिस म्हणाले, दहशतवाद्यांना मोकळे रान देण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही.


 1. २८ सप्टेंबरपासून आंतराष्ट्रीय क्रिकेटचे सामने हे नवीन नियमांनुसार खेळवले जाणार आहेत. आयसीसीने आज यासंदर्भात घोषणा केली आहे. बॅटची जाडी, पंचांना दिलेले विशेष अधिकार आणि डीआरएस यासारख्या नियमांमध्ये आता प्रामुख्याने  बदल करण्यात आलेला आहे.
 2.  आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आणि  पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्यांपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेली वन-डे सामन्यांची मालिका ही जुन्या नियमांनुसारच खेळवली जाणार आहे.
 3. एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत ( LBW ) असल्याचं अपील केलं, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही ‘तो’ संघ आपली ( DRS ) ची संधी गमावणार नाहीये. याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची संधी संपून जायची.
 4. कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर DRS च्या  दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.
 5. वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही DRS चा वापर करण्यात येणार आहे.


 1. जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थानावर असलेल्या रॉजर फेडररच्या चतुरस्र खेळामुळेच युरोप इलेव्हनला लेव्हर चषक टेनिस लढतीत जागतिक इलेव्हनविरुद्ध विजय मिळवता आला. 
 2. फेडररने निक किर्गिओसवर ४-६, ७-६ (८-६), ११-९ असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला आणि आपल्या संघाला १५-९ अशी विजयी  आघाडी मिळवून दिली.
 3. याबाबत फेडरर म्हणाला, दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये मला खेळाचा  सूर सापडला. तेथूनच खऱ्या अर्थाने मी सामन्यावर नियंत्रण मिळविले.
 4. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील  अंतिम सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर जे समाधान मिळते, तसे समाधान येथे मला या सामन्यानंतर झाले. किर्गिओस हा लढवय्या खेळाडू आहे. त्याने येथे खूप सुरेख खेळ केला.’


Top

Whoops, looks like something went wrong.