Jammu and Kashmir Bank is brought under the supervision of the RTI, CVC, State Legislature

 1. जम्मू-काश्मीर राज्य सरकारने जम्मू-काश्मीर बँक लिमिटेडला माहितीचा अधिकार (RTI) कायदा, केंद्रीय दक्षता आयोग (CVC) आणि राज्य विधानमंडळ यांच्या देखरेखीखाली आणले आहे.
 2. राज्य सरकारने सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम (PSU) म्हणून जम्मू-काश्मीर बँक लिमिटेडला मानण्यासंबंधी राज्यपाल सत्य पाल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रशासकीय परिषदेचा प्रस्ताव मंजुर केला आहे.
 3. त्यानुसार जम्मू-काश्मीर माहितीचा अधिकार कायदा-2009’ याच्या तरतुदी इतर PSU प्रमाणेच बँकेला लागू होतील आणि ते CVCच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार आहे.
 4. इतर PSU प्रमाणेच बँक राज्य विधानमंडळास देखील उत्तरदायी असेल आणि त्याचा वार्षिक अहवाल राज्य सरकारच्या वित्त विभागाद्वारे विधानमंडळाकडे सादर केला जाणार आहे.
 5. वित्त विभाग बँकेच्या देखरेखीसाठी योग्य दिशानिर्देश देणार आहे.
 6. 1938 साली स्थापना करण्यात आलेली जम्मू-काश्मीर बँक ही देशातली एकमेव राज्याकडून चालवली जाणारी बँक आहे.
 7. ज्यात त्याचा 59.3% हिस्सा आहे.
 8. भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे.
 9. याची स्थापना सन 1964 मध्ये केली गेली.
 10. ही कोणत्याही कार्यकारी अधिकारांच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते.
 11. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त नियुक्त केले जातात.


Stratospheric aerosol injection technique can work to limit temperature rise: a study

 1. काही संशोधकांच्या मते, स्ट्रॅटोस्फेरिक एरोसोल इंजेक्शन (SAI) हे भू-अभियांत्रिकी तंत्र हवामानातील बदलांमुळे वाढत्या तापमानाला मर्यादित करण्यास मदत करू शकते. मात्र अद्याप ही एक अप्रमाणित आणि काल्पनिक कल्पना आहे.
 2. स्ट्रॅटोस्फेरिक एरोसोल इंजेक्शन (SAI) या तंत्रामधून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरात सूर्यप्रकाशाला रोखणारी रसायने फवारणी केली जाते.
 3. यासाठी मोठ्या प्रमाणात सल्फेट कणांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, हे तंत्र वापरण्यास 15 वर्षांच्या कालावधीत दरवर्षी सुमारे $2.25 अब्ज एवढा खर्च येऊ शकतो.
 4. ओझोन हा वातावरणात मुख्यत: दोन थरांमध्ये  आढळतो. जमिनीपासून 10-16 किमीपर्यंतचा वातावरणाचा थर  म्हणजे तपांबर (troposphere) आणि त्यावरील 50 किमीचा थर हा स्थितांबर (stratosphere) म्हणून ओळखला जातो.
 5. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.
 6. ओझोन हा हरितगृह वायू (greenhouse gas) असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो.
 7. स्थितांबरातील (stratosphere) ओझोन सूर्यकिरणांतील अतिनील (ultraviolet or UV) किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो.
 8. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होणे, गुणसूत्रांचे उत्परिवर्तन होणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. शिवाय पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.


Dictionaries of rare tribal languages ​​have been created in Odisha

 1. आदिवासी भाषांना लुप्त पावण्यापासून वाचविण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने 21 आदिवासी भाषांचे शब्दकोष तयार केले आहेत.
 2. द्वैभाषिक आदिवासी शब्दकोष आदिवासी जमात असलेल्या जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर राज्य सरकारद्वारे दिल्या जाणार्‍या बहुभाषिक शिक्षणामध्ये वापरले जातील.
 3. ओडिशा राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या 13 आदिवासी समुदायांसह 62 वेगवेगळे आदिवासी समुदाय आढळतात.
 4. या जमाती 21 भाषा आणि 74 बोलीभाषा बोलतात.
 5. 21 आदिवासी भाषांपैकी सातकडे त्यांची स्वत:ची लिपी आहे.


'Pigme Falls Catshark': A new species of shark found in India

 1. उत्तर हिंद महासागरात खोल समुद्रात शार्कची एक नवीन प्रजाती आढळली आहे.
 2. या नव्या प्रजातीला ‘पिग्मी फॉल्स कॅटशार्क’ हे नाव देण्यात आले आहे. त्याचे वैज्ञानिक नाव ‘प्लॅनोनासूस इंडिकस’ हे आहे.
 3. ‘पिग्मी फॉल्स कॅटशार्क’ समुद्रात 200-1000 मीटर खोलीत आढळून आली आहे.
 4. त्यांची लांबी 65 सेंटीमीटर एवढी आहे. त्यांचा रंग गडद तपकिरी आहे व त्यात कोणतीही समरूपता नाही.
 5. मुंबईचे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (CMFRI) येथील संशोधक के. व्ही. अखिलेश यांचा समावेश असलेल्या अमेरिका आणि जर्मनीच्या शास्त्रज्ञांच्या चमूने ही नवीन प्रजाती भारताच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टी आणि श्रीलंकेच्या उत्तरेस शोधली आहे.
 6. 2011 साली भारतीय क्षेत्रात मंगलोर हाऊंडशार्क आढळले होते.
 7. त्यानंतर आता पहिल्यांदाच ही नवी प्रजाती आढळली आहे.


In the Rhythmic Gymnastics World Cup, Deepa works as a bronze medal in the Vault format

 1. भारताची महिला जिम्नॅस्ट दिपा कर्मकार हिने जर्मनीत कोटबस शहरात ‘FIG तालबद्ध (कलात्मक) जिम्नॅस्टिक विश्वचषक 2018’ स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.
 2. कर्मकार हिने 14.316 गुण मिळवत हे पदक प्राप्त केले आणि ती आता 2020 टोकियो ऑलंपिकसाठी आठ-कार्यक्रम पात्रता प्रणालीचा एक भाग आहे.
 3. स्पर्धेच्या या प्रकारात ब्राझीलच्या रेबेका अँड्राडेने सुवर्णपदक जिंकले तर अमेरिकेच्या जेड केरीने रौप्यपदक मिळविले आहे.
 4. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ (FIG) ही स्पर्धात्मक जिम्नॅस्टिक या क्रिडा प्रकाराची एक प्रशासन संस्था आहे.
 5. याचे मुख्यालय लॉंसन (स्वित्झर्लंड) शहरात आहे.
 6. महासंघाची दिनांक 23 जुलै 1881 रोजी स्थापना करण्यात आली आणि ती सध्या अस्तित्वात असलेली जगातली सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय क्रिडा संस्था ठरलेली आहे.
 7. त्यांनी 1975 साली पहिल्यांदा तालबद्ध (कलात्मक) जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन केले होते.


Top