mpsc classes

'ब्रिटन' आणि 'एक्‍झिट' या दोन शब्दांचा मिळून बनलेला शब्द म्हणजे 'ब्रेक्झिट' होय. त्याचा अर्थ 'ब्रिटनची युरोपियन महासंघातील 'इक्‍झिट' असा होतो. 

सार्वमत चाचणीमध्ये ब्रिटनमधील 72.2 टक्के जनतेने मतदान केले. झालेल्या एकूण मतदानाच्या 51.9 टक्के लोकांनी ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडावे, या बाजूने मतदान केले तर उर्वरित 48.1 टक्के लोकांनी ब्रिटनने महासंघात कायम राहावे, हे मतदानाद्वारे सांगितले.

सार्वमत चाचणीच्या निकालानंतर ब्रिटनने युरोपियन महासंघात कायम राहावे, या मताचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून (David Cameron) यांनी राजीनामा दिला. 

बाहेर पडण्याच्या समर्थनार्थ दिली गेलेली कारणे 

 • ब्रिटनच्या सार्वभौमत्वाला युरोपियन महासंघाकडून धक्का
 • मुक्त धोरणांतर्गत युरोपीय देशांमधील अनेकजण ब्रिटनमध्ये स्थलांतरित, त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ताण
 • मोठ्या प्रमाणात दहशतवाद फोफावत असताना हे धोरण धक्कादायक
 • महासंघाचे निर्बंध संपुष्टात आल्यास ब्रिटनमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतील, बेरोजगारांची संख्या कमी होऊन हा प्रश्‍न सुटू शकेल. 
 • व्यापारासाठी ब्रिटनला महासंघाची गरज नाही, तर महासंघालाच ब्रिटनची गरज आहे, असा मतप्रवाह. लंडन पूर्वीपासूनच जागतिक सत्तेचे केंद्र असल्याने ब्रिटनला महासंघाच्या टेकूची गरज नाही, असा बाहेर पडण्याच्या बाजूने असणाऱ्या वर्गाचा विचार.  

महासंघातून बाहेर पडलेले देश 

 • युरोपियन महासंघाच्या करारानुसार कलम 50 अन्वये सदस्य राष्ट्रांना महासंघातून बाहेर पडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. 
 • स्वातंत्र्यापूर्वी फ्रान्सचा भाग असणाऱ्या अल्जेरिया (Algeria) या राष्ट्राने स्वातंत्र्यानंतर इ. स. 1962 मध्ये युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 
 • 1985 मध्ये डेन्मार्कचा स्वायत्त भाग असणाऱ्या 'ग्रीनलॅण्ड' (Greenland) ने महासंघाचे सदस्यत्व सोडले. 
 • अल्जेरिया आणि ग्रीनलॅण्डनंतर युरोपियन महासंघातून बाहेर पडणारे ब्रिटन हे तिसरे राष्ट्र ठरले आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासंबंधी ब्रिटनने यापूर्वी 1975मध्येही सार्वमत घेतले होते; पण त्या वेळचा कौल महासंघात कायम राहण्याच्या बाजूने मिळाला. 
 • स्वतंत्र देश या निकषाखाली जर विचार केला तर महासंघातून बाहेर पडणारे ब्रिटन हे पहिलेच राष्ट्र ठरले आहे. 


mpsc current affairs

 1. हा पूल भारतामधील सर्वांत लांब पूल आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार व "ब्रह्मपुत्रेचे पुत्र' असलेल्या भूपेन हझारिका यांचे नाव या पुलास ठेवण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी सभेत बोलताना केली.
 2. शाश्‍वत विकासासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्‍यकताही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
 3. पंतप्रधान म्हणाले -
 4.  गेल्या पाच दशकांपासून तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होता; तो पूल आता प्रत्यक्षात आला आहे.
 5.  श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीवर येणे मी परम भाग्याचे समजतो.
 6.  2004 मध्ये अटलजींचे सरकार पुन्हा निवडून आले असते; तर हा पूल 10 वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाला असता. आमच्या तत्कालीन खासदारांनी हा पूल बांधण्याची विनंती केली होती व अटलजींच्या सरकारने या पुलाच्या रचनेचा अभ्यास करण्याचे आदेशही दिले होते. मात्र यानंतर सरकार बदलले व तुमचे स्वप्न लांबणीवर पडले. 
 7. आज आसाम राज्यामध्ये भाजपशासित सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. आम्ही आसाममधील समस्यांवर कालबद्ध उपाययोजना करत आहोत.
 8.  केवळ आसामच नव्हे; तर संपूर्ण भारतासाठी हा पूल एक आभिमानास्पद बाब. 
 9. या पुलामुळे आसाम व अरुणाचल प्रदेश ही अधिक जवळ येतील. आर्थिक समृद्धीच्या नव्या वाटा उपलब्ध होतील. वेळेच्या बचतीसहच या पुलामुळे दिवसाला 10 लाख रुपयांची इंधनबचत होईल. 
 10.  आम्ही हा भाग आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या पुलाच्या माध्यमामधून भारतास दक्षिण पूर्व आशियासही जोडण्यात येईल


mpsc current affairs

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत 'सचिन..अ बिलिअन ड्रीम्स' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात सचिन दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे. 

ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एर्स्किन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. देशभरातील सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून समजणार आहेत.

ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हा चित्रपट आधीच करमुक्त झाला आहे. 

सचिनच्या जीवनचरित्रातून राज्यातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल या हेतून हा चित्रपट टॅक्स फ्रीचा निर्णय घेण्यात आला असे आसामचे अर्थमंत्री शशीभूषण बेहेरा यांनी सांगितले.

या चित्रपटात सचिनचा बालपणापासून ते क्रिकेटचा देव बनण्यापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. गेल्या वर्षी धोनीच्या आत्मकथेवर चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. आता सचिनचा आत्मकथेवर आधारीत चित्रपटाची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. 


mpsc current affairs

 1. राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी 2.5 टक्के सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेलवर आकारले जाणारे एक्साइज आणि रीस्टिलेवर सेंट्रल रोड फंड हे एक कर्तव्य आहे.
 2. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी आणि देखरेखीसाठी दरवर्षी सुमारे 2000 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल जे यामधून अंतर्देशीय जलवाहतुकीला चालना मिळेल.
 3. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणानुसार, 2022-2023 पर्यंत राष्ट्रीय जलमार्गांचा विकास करण्यासाठी 25,000 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पुढच्या 5 वर्षांत 1.8 लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
 4. नेव्हिगेशन , नाइट नेव्हीगेशन सुविधा, प्रक्षेपण आणि उदभवनसाठी, फारका नेव्हीगेशन लॉकच्या प्रवासाची सोय करण्यासाठी सुविधा आणि संकटांत मदत आयडब्ल्यूएआय द्वारे प्रदान केली जाईल.
 5. पार्श्वभूमी : राष्ट्रीय वाटरवेजच्या विकासासाठी 2009 साली राष्ट्रीय जलमार्ग कायदा, 2016 ला मंजूर करण्यात आला. 12 एप्रिल 2016 मध्ये लागू करण्यात आलेली कार्यवाहीने 24 राज्यांतील 111 अंतराळ जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग घोषित केले आहे. सध्या पाच राष्ट्रीय जलमार्ग चालू आहेत.
 6. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) भारतातील जलमार्गांवर जबाबदारी आहे. याचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे.
 7. या जलमार्गांमध्ये आवश्यक आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, नवीन प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता तसेच प्रशासन व नियमन करणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
   


Top

Whoops, looks like something went wrong.