chalu ghadamodi, current affairs

1. भारताने ‘चांद्रयान-2’ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानने आता 2022 पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे.

2. तसेच चीनच्या मदतीने पाकिस्तान पुढील चार वर्षांमध्ये पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे.

3. अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या पहिल्या महत्वकांशी मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.

4. तर 2018 मध्ये पाकिस्तानने दोन घरगुती बनावटीचे उपग्रह चीनच्या मदतीने अंतराळात सोडले आहेत. लाँग मार्च (एलएम-टूसी) रॉकेटच्या सहाय्याने गोबीच्या वाळवंटामधील चीनच्या अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते.

5. यापैकी एक अपग्रह हा ‘दूरस्थ संवेदन उपग्रह’ (पीआरएसएस वन) असून तो पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ऑप्टिकल उपग्रह (संवादासंदर्भातील) म्हणून वापरला जातो. तर दुसरा उपग्रहाचे नाव पीएके-टीईसी-वनए असं असून त्याचा उपयोग देशातील उपग्रह निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केला जात आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल यांच्यासह मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून समावेश केला आहे. तर ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन केले जात आहे.

2. राणी एलिझाबेथ यांनी जॉन्सन यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी, आलोक शर्मा यांची आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपदी, तर ऋषी सुनाक यांची वित्त विभागाचे प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक केली. डाऊनिंग स्ट्रीट येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

3. तर ब्रेग्झिट समर्थन मोहिमेतील जॉन्सन यांच्या सहकारी असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे ब्रिटनची सुरक्षा, इमिग्रेशन आणि व्हिसाविषयक धोरणांचा कार्यभार राहणार आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. आर्थिक आघाडीवर निराशाजनक स्थिती असताना केंद्राचे अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जासचिवपदी बदली करण्यात आली. मावळते ऊर्जासचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदाची सूत्रे येणार आहेत.

2. तर प्रशासनात ज्येष्ठ पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली करण्यात आली.

3. रिझव्‍‌र्ह बॅंकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर रिझव्‍‌र्ह बॅंकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि सुभाषचंद्र गर्ग यांच्यात वाद रंगला होता. आता आर्थिक आघाडीवर निराशानक स्थिती असताना गर्ग यांची बदली करण्यात आली आहे.

4. तर 1985 च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी अतनू चक्रवर्ती यांची आता अर्थसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.


chalu ghadamodi, current affairs

1. आजच्याच दिवशी 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै, 1999 रोजी भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. घुसखोर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध ऑपरेशन विजयच्या भारतीय सशस्त्र दलांच्या विजयासाठी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

2. प्रत्येक वर्षी हा दिवस भारतीय मानवाच्या बहादुर भारतीय सैन्यांकडे कृतज्ञता दर्शविण्यासाठी साजरा केला जातो ज्यांनी भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे जीवन अर्पण केले.  द्रास-कारगिल सेक्टर आणि नवी दिल्ली येथील अमर जवान ज्योती, नवी दिल्ली येथे कारगिल विजय दिवाचे सैन्य कर्मचारी साजरे करता.

 


chalu ghadamodi, current affairs

1. सन 1509 मध्ये ‘सम्राट कृष्णदेवराय‘ यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरुवात केली.

2. कवी समाजसेवक ‘वासुदेव गोविंद मायदेव‘ यांचा जन्म 26 जुलै 1894 मध्ये झाला.

3. 26 जुलै 1999 मध्ये भारताचा कारगिल युद्धात विजय झाला. तेव्हा पासून हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो.


Top