Airtel, Huawei's first successful 5G network test in India

 1. चीनी तंत्रज्ञान उद्योगातली प्रमुख हूवेई ही कंपनी आणि दूरसंचार सेवा प्रदाता भारती एयरटेलने भारतात प्रायोगिक तत्वावर 5G नेटवर्कची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.
 2. ही चाचणी मानेसर (गुरुग्राम) येथील एयरटेलच्या नेटवर्क एक्सपिरियंस सेंटरमध्ये घेतली गेली. 
 3. चाचणी दरम्यान 3Gbps हून अधिक गती साध्य करण्यात आली.
 4. हे 3.5GHz बॅंडमध्ये एक मोबाइल नेटवर्कसाठी 100MHz बॅंडविड्थ आणि सुमारे 1 मिलीसेकंदच्या एंड-टू-एंड नेटवर्क विलंबासह उच्चतम मापले गेले. 

5G नेटवर्क

 1. चाचणीच्या सुविधेने इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि संवर्धित वास्तविकता/आभासी वास्तविकता (AR/VR) यासारख्या विविध सेवांसाठी क्षमता प्रदर्शित केली आहे, जे डिजिटल रूपाने जोडल्या गेलेल्या जगभरातील सेवासाठी 5G तंत्रज्ञानाद्वारे वितरित केले जाऊ शकते.
 2. 5G तंत्रज्ञानाअंतर्गत, वापरकर्ते व्हर्च्युअल रियालटी आणि वाढीव रियालटीसह 360-डिग्री, 4K, अल्ट्रा-HD मोडमध्ये प्रीमियम व्हिडिओ गुणवत्ता अनुभवू शकतात.
 3. भारती एयरटेलने भारतात 5G तंत्रज्ञान तैनात करण्यासाठी एरिक्सन या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
 4. भागीदारी अंतर्गत, एरिक्सन, एयरटेल सोबत एक योजना तयार करण्यासाठी काम करणार, जेणेकरून टेलको पुढील पिढीच्या 5G नेटवर्कवर आपल्या नेटवर्कला अद्ययावत करू शकणार आहे. 
 5. एरिक्सन आणि हूवेई यांच्या व्यतिरिक्त, एयरटेलने 5G तंत्रज्ञानासाठी नोकिया या मोबाइल कंपनीसोबतही भागीदारी केली आहे.


Inauguration of development projects worth Rs. 1000 crore in Daman and Diu by the Prime Minister

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दमण व दीवमध्ये 1,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 2. प्रकल्पांमध्ये ‘उडे देश का आम नागरिक (UDAN)’ या क्षेत्रीय हवाई संपर्क योजनेंतर्गत ‘एयर ओडिशा’ द्वारे संचालित अहमदाबादला दीवशी जोडणारी हवाई सेवा तसेच पवन हंस लि. द्वारे संचालित दमन व दीव दरम्यान हेलिकॉप्टर सेवा यांच्यासह अन्य सुविधांचा समावेश आहे.
 3. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत जन्मलेल्या मुलीस ‘बधाई किट’चे वाटप केले गेले.
 4. एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या UDAN (उडे देश का आम नागरिक) या नावाच्या प्रादेशिक जोडणी योजना (RCS) अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
 5. त्यामधून टियर-2 आणि टियर-3 श्रेणीतील शहरांतल्या 43 विमानतळांना जोडण्यात येत आहे.
 6. योजनेंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50% भाडे केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.
उडान बद्दल इतर माहिती
 1. विशिष्ठ मार्गावरील प्रवासासाठीच या  स्वरूपाचा प्रवास करता येणार आहे.विमानासह हेलिकॉप्टर प्रवासाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
 2. सध्या अस्तित्वात असलेली विमानसेवा उडान अंतर्गत येणार नाही. नव्याने सुरु होणार्या विमान प्रवासासाठीच  ही यीजना असेल.
 3. या योजनेबाबत केंद्राशी दोन महिन्यापूर्वीच सामंजस्य करार केला होता.
 4. या योजनेचा शिर्डी सह इतर 10 शहरांना याचा फायदा होणार आहे.


All banks will add SWIFT to CBS by April 30: RBI

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आतंरिक नियंत्रण बनविण्यासाठी सर्व बँकांना 30 एप्रिल 2018 पर्यंत आपल्या SWIFT (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनॅनष्यल टेलीकम्युनीकेशन) प्रणालीला कोअर बँकिंग सोल्यूशन (CBS) सोबत जोडण्याचे निर्देश दिले.
 2. सन 1973 मध्ये प्रस्तुत SWIFT (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनॅनष्यल टेलीकम्युनीकेशन) प्रणाली एक नेटवर्क आहे, ज्याचा वापर जगभरातील बँक आणि वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या अन्‍य संस्‍था करतात.
 3. सर्व बँकांकडे एक SWIFT कोड असतो आणि या कोडच्या माध्यमाने परदेशी व्यवहारांमधून पैसे हस्तांतरीत केले जातात.
 4. भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 5. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
 6. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते.
 7. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


Once again 'A' certification certificate from the UN to the NHRC of India

 1. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने सलग चौथ्यांदा संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्राप्त ‘ए’ मान्यता प्रमाणपत्र मिळवले आहे.
 2. हे प्रमाणपत्र जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्लोबल अलायंस ऑफ नॅशनल ह्यूमन राइट्स इंस्टिट्यूशन (GANHRI)’ कडून दिले जाते.
 3. हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी दिले जाते. असे प्रमाणपत्र केवळ त्याच मानवाधिकार आयोगांना दिले जाते, जे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅरिस सिद्धांतांचे पुर्णपणे पालन करतात.
 4. भारताला हे प्रमाणपत्र सर्वात आधी सन 1999 मध्ये मिळाले होते. त्यानंतर सन 2006 आणि सन 2011 मध्ये प्राप्त झाले.
 5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ही एक स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे, ज्याची स्थापना 28 सप्टेंबर 1993 रोजी प्रसिद्ध झालेल्या मानवाधिकार संरक्षण अध्यादेश अंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली.
 6. याला मानवाधिकार संरक्षण अधिनियम-1993 मार्फत वैधानिक आधार दिला. NHRC मध्ये एक अध्यक्ष (भारताचे निवृत्त सरन्यायाधीश CJI), एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, एक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अन्य दोन अनुभवी व्यक्ती आणि चारही राष्ट्रीय आयोग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि अल्पसंख्यांक) यांचे अध्यक्ष सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.
ग्लोबल अलायंस ऑफ नॅशनल ह्यूमन राइट्स इंस्टिट्यूशन (GANHRI)
 1. ग्लोबल अलायंस ऑफ नॅशनल ह्यूमन राइट्स इंस्टिट्यूशन (GANHRI) (पूर्वीचे NHRI ची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती (ICC) किंवा फक्त ICC) हे सभासद देशांमधील राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांचे (NHRIs) एक वैश्विक जाळे आहे.
 2. हे एकमेव बिगर-UN मंडळ आहे.
 3. ज्याची आंतरिक मान्यता प्रणाली 1993 सालच्या पॅरीस सिद्धांतावर आधारित आहे.


The 62nd session of the United Nations Commission for Women's Affairs concluded in Bangkok

 1. मार्चमध्ये नियोजित ‘महिलांच्या स्थिती विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयोगाचे 62 वे सत्र (CSW62)’ यासाठी उच्च पातळीवरची संयुक्त राष्ट्रसंघाची एक क्षेत्रीय सल्लामसलत बैठक 23 फेब्रुवारी 2018 रोजी बॅंकॉकमध्ये पार पडली.
 2. बैठकीत आशिया आणि प्रशांत महासागर खंडातल्या वरिष्ठ शासकीय प्रतिनिधींनी ग्रामीण स्त्रियांना आणि मुलींना सशक्त बनविण्यासाठी वचनबद्धता दर्शवली.
 3. बैठकीसंबंधी विशेष बाबी:-
  1. बैठकीचा उद्देश्य म्हणजे ग्रामीण स्त्रियांचे आणि मुलींचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या मानवाधिकारांना प्रभावित करणार्‍या संरचनात्मक अडचणींचा सामना करण्यामध्ये मदत करणे हा होता.
  2. बैठकीत 'स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि ग्रामीण स्त्रियांचे आणि मुलींचे सशक्तीकरण यामध्ये येणारी आव्हाने आणि संधी' याबाबत शिफारसींना स्वीकारण्यात आले, जे 12-23 मार्च 2018 या काळात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयी आयोजित होणार्‍या CSW62 मध्ये उपयोगात आणले जाईल.
  3. बैठकीत मान्य करण्यात आलेल्या शिफारसी मानक आणि कायदा संरचनेला बळकट करण्याविषयी तात्काळ आवश्यकता दर्शवतात आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तिकरण तसेच समाजात सार्थक भागीदारीसाठी समन्वयित कारवाई निश्चित करतात.
  4. प्रतिनिधींकडून पुराव्यावर आधारित धोरण तयार करण्यासाठी माहिती आणि स्त्री-पुरुष समानतासंबंधी आकड्यांच्या उपलब्धतेविषयी आवश्यकतेवर प्रकाश टाकण्यात आला.
  5. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात ग्रामीण स्त्रियांसमोर आणि मुलींसमोर येणार्‍या मुख्य आव्हानांमध्ये चांगले जीवनमान, स्त्रियांचे आर्थिक सशक्तीकरण, भूमी हक्क, अन्न सुरक्षा, आरोग्य सुविधा, गुणवत्ता शिक्षण, लवचिकपणा आणि आपत्ती व संघर्ष परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी करणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग (CSW)

 1. पार्श्वभूमी:-
  1. संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग (Commission on the Status of Women - CSW किंवा UNCSW) हे संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC) चे कार्यरत आयोग आहे.
  2. याची 1946 साली स्थापना करण्यात आली.
  3. एप्रिल 2017 मध्ये, ECOSOC ने 2018-2022 या चार वर्षांच्या नव्या कार्यकाळासाठी 13 नवीन सदस्यांची निवड केली.
  4. सौदी अरब हा नवीन सदस्यांपैकी एक आहे. 


Pramod Nagadeva gets the Prime Minister's Shramavir Award

 1. अशोक लेलँडचे कर्मचारी प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार घोषीत झाला असून, तसेच २६ फेब्रुवारीला दिल्ली येथील विज्ञान भवनात त्यांना सन्मानित करण्यात आले.
 2. भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या श्रम व रोजगार मंत्रालय दिल्लीतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
 3. कामगार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 4. यापूर्वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईतर्फे केला जाणारा गुणवंत कामगार २००८ या पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.


important thiungs

 1. घटना:-
  1. १९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.
  2. १९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
  3. १९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
  4. १९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
  5. १९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
  6. १९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
  7. १९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
  8. १९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.
 2. जन्म:-
  1. १८०२: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८८५)
  2. १८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९०२)
  3. १८६६: अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर१९३०)
  4. १८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.
  5. १९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २००७)
  6. १९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण  यांचा जन्म.(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९०)
  7. १९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९४)
 3. मृत्यू:-
  1. १८७७: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८०४)
  2. १८८७: भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म. (जन्म: १५ मार्च १८६५)
  3. १९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे१८८३)
  4. २०००: बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.
  5. २००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर  यांचे निधन.
  6. २००४: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९२०)
  7. २०१०: समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ – कडोळी, परभणी, महाराष्ट्र)


Top