IMF-World Bank announces valuation of Indian financial system under FSAP

 1. अंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी वित्तीय व्यवस्था स्थिरता मुल्यांकन (FSSA) आणि जागतिक बँकेनी वित्तीय व्यवस्था मुल्यांकन (FSA) जाहीर केले आहेत.
 2. तसेच IMF-जागतिक बँक यांनी संयुक्तपणे केलेल्या दुसर्‍या व्यापक वित्तीय व्यवस्था मूल्यांकन कार्यक्रम (FSAP) अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन केले. FSAP मधून असे आढळून आले आहे की, भारताने वित्तीय परिस्थिती आणि वित्तीय क्षेत्रातील आर्थिक घडामोडींमुळे अलिकडच्या वर्षांत GDP च्या सुमारे 136% वाढीची नोंद केली आहे. 

 

अहवालाच्या मुख्य बाबी आणि निष्कर्ष
 1. वाढीव वैविध्यपूर्णता, व्यावसायिक अभिमुखता आणि तंत्रज्ञानातील समावेशामुळे वित्तीय उद्योगाला वाढीचा आधार झाला आहे, तसेच सुधारित कायदेशीर, विनियमन आणि पर्यवेक्षी संरचनेचा वापर केला गेला आहे. 
 2. भारतीय प्रशासनातर्फे बुडीत अकार्यक्षम संपदेच्या (NPA) समस्येला हाताळण्यासाठी नानाविध प्रयत्न चालविलेले आहेत, जसे की बँकांचे पुनर्पूंजीकरण आणि विशेष लवाद पद्धतीची अंमलबजावणी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सुसूत्रीकरण, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाची (IBBI) स्थापना आणि इतर.
 3. RBI ने थकीत मालमत्तेला ओळखण्याच्या बाबतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने बँकिंग पर्यवेक्षी संरचनेला बळकट करण्याच्या प्रयत्नांमध्ये विशेष प्रगती केलेली आहे.
 4. बेसेल-III कार्यचौकट आणि इतर आंतरराष्ट्रीय नियम लागू केले गेले आहेत किंवा त्यांस टप्प्याटप्प्याने लागू केले जात आहेत. 
 5. RBI ने एक नवीन अंमलबजावणी विभाग स्थापन केला आहे आणि प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) कार्यचौकटीमध्ये सुधारणा केली आहे. 
 6. भारतातील बँकिंग क्षेत्रातील जोखीम मर्यादित आहे तसेच गैर-बँक वित्तीय उप-क्षेत्रात जोखम दिसून येत आहे, परंतु सतत देखरेख करणे आवश्यक आहे.
 7. सर्वात मोठ्या बँका आर्थिक परिस्थितीमध्ये बिघडलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात संपन्न आणि फायदेशीर असल्याचे दिसते. 
 8. तथापि, काही सार्वजनिक बँकांची स्थिती कमकुवत आहे आणि त्यांना अतिरिक्त भांडवलाची गरज आहे. हे गरजेचे भांडवल GDP च्या 0.75-1.5% या दरम्यान असल्याचे मूल्यांकीत केले गेले.
 9. SEBI ने 2013 साली प्रकाशित IOSCO (इंटरनॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन) मूल्यांकनात समाविष्ट असलेल्या शिफारसींच्या आधारावर त्याच्या नियामक कार्यक्रम लक्षणीय बदल केले असल्याचे दिसून आले आहे.
 10. वित्तीय बाजारपेठ पायाभूत सुविधा (FMIs) बाबत, पैसे, जी-सेक रेपो आणि दुय्यम बाजारपेठ यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पात्र सेंट्रल काऊंटरपार्टी (CCP) ला RBI ने नियुक्त केले, जी उच्च कार्यक्षम विश्वसनीयता दर्शवते.

 

 

तुम्हाला हे माहित आहे का?

IMF अंतरराष्ट्रीय नाणेनिधी:-

स्थापना:- २७ डिसेंबर १९४५

१ मार्च १९४७ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात

मुख्यालय:- वॉशिंग्टन

सदस्य :- १४५(नवीन सदस्य:- नारू)
उद्दिष्टे:-
 1. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एका मध्यवर्ती बँकेची भूमिका निभावते. 
 2. अंतरराष्ट्रीय चलन विनिमयात सहकार्य करणे.
 3. विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे.
 4. विविध देशातील व्यवहारतोल मधील असंतुलन दूर करण्यास सहाय्य करणे.
 5. अंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दिंगत करणे.

कार्ये:-

 1. सदस्य देशांना व्यवहारातोलातील संकट दूर करण्यासाठी कर्ज देणे.
 2. आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक संकट टाळण्यासाठी IMF विविध देशांच्या, क्षेत्रीय संघटनाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक धोरणाचा आढावा घेते.
 3. आर्थिक संकट टाळण्यासाठी IMF सदस्य देशांना धोरणात्मक सल्ला देते.

 

जागतिक बँक :-

स्थापना:-३१ डिसेंबर १९४५ 

सदस्य :- १४५(नवीन सदस्य:- नारू)

मुख्यालय:- वॉशिंग्टन

उद्दिष्टे:-
 1. पुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे.
 2. जागतिक बँकेचे अंतिम उद्धिष्ट गरिबी कमी करणे.
 3. युद्धग्रस्त अर्थव्यवस्थांसाठी,अविकसित देशातून विकासात्मक योजना राबविण्यासाठी व एकूणच शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक बँक सदस्य देशांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते.

कर्जे:-

 1. सदस्य देशाला त्याच्या भांडवलाच्या हिश्शाच्या २०% कर्ज देऊ शकते.
 2. २०% वर्षे मुदतीचे किंवा वाढीव म्हणजे २५ वर्षांपर्यंतचे कर्ज देऊ शकते.
 3. कर्ज विकास प्रकल्पासाठीच आहे का हे तपासले जाते.
 4. कर्जदार देशाची पतही तपासली जाते.
 5. ज्या प्रकल्पासाठी कर्ज आहे त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते.


Launch of Ganga Gram Project of Drinking Water Ministry

 1. 23 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाने नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत ‘गंगा ग्राम प्रकल्प’ चा औपचारिक रूपाने शुभारंभ केला आहे.
 2. या प्रकल्पाचा उद्देश्‍य म्हणजे गंगा नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये संपूर्ण स्‍वच्‍छता आणणे.

प्रकल्पाच्या प्रमुख बाबी​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

 1. गंगा किनारी वसलेल्या गावांना हागणदारी मुक्त घोषित केल्यानंतर मंत्रालय व राज्‍य शासनांनी 24 गावांची ओळख केली आहे, ज्यांना गंगा ग्रामच्या रूपात रूपांतरित केले जाईल.
 2. हे गाव ‘स्‍वच्‍छतेचे मानदंड’ स्‍थापित करणार. या गावांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत गंगा ग्राममध्ये बदलण्याचे लक्ष्‍य ठेवले गेले आहे.
 3. गंगा ग्राम प्रकल्प ग्रामीणवासीयांच्या सक्रिय सहभागाने गावांच्या संपूर्ण विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवल्या गेले आहे.
 4. प्रकल्पांतर्गत ठोस व द्रव कचरा व्यवस्थापन, तलाव आणि अन्‍य जलाशयांचे पुनरुज्जीविकरण, जल सुरक्षा प्रकल्प, जैविक शेती, फळबाग आणि औषधी वनस्पती शेतीला प्रोत्‍साहन दिल्या जाईल.
 5. पेयजल व स्‍वच्‍छता मंत्री उमा भारती यांच्या अध्‍यक्षतेखाली एक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे, जी धोरणांची निर्मिती सोबतच सर्व आवश्यक निर्णय घेणार आहे.
 6. याव्यतिरिक्‍त आणखी एक समिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण, समन्‍वय साधणार.
 7. पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालय ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ साठी नोडल संस्था म्हणून कार्य करीत आहे.
 8. ऑक्टोबर 2014 मध्ये अभियानाला सुरुवात झाल्यापासून मंत्रालयाने 6 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांच्या 260 जिल्ह्यात स्थित 2.95 लाख गावांमध्ये 5.2 कोटी शौचालये बांधण्यात आलीत.
 9. ऑगस्ट 2017 मध्ये 5 राज्यांच्या (उत्‍तराखंड, उत्‍तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल) सक्रिय सहयोगाने मंत्रालयाने गंगा नदीचे तट असलेल्या सर्व 4470 गावांना हागणदारी मुक्त घोषित केले.

 

 


RBI's 'Quick Improvement for Banks' (PCA)

 1. भारतीय रिजर्व बँकेने (RBI) अधिक कर्जामुळे बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या अकार्यक्षम संपत्तीमुळे (NPA) देशातील मोठ्या बँकांचा जमा-खर्च नकारात्मक दिसून येत आहे.
 2. त्यामुळे RBI ने आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांविरुद्ध ‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (Prompt Corrective Action)’ संचालित केली आहे.
 3. त्यामध्ये – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), IDBI बँक, इंडियन ओवरसीज बँक, UCO बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉरपोरेशन बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया – या बँकांचा समावेश आहे.
 4. बँकांच्या निव्वळ NPA मध्ये 10% ची वृद्धी झालेली आहे आणि वर्ष 2017 च्या शेवटी दुसर्‍या तिमाहीत 1035 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
 5. वर्तमानात बँकांची भांडवली पुरेसा प्रमाण 10.23% आहे आणि मार्च 2018 पर्यंत बँकांना हे 10.875% इतके राखणे आवश्यक आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?

 त्वरित सुधारात्मक कार्यवाही:-

 1. ‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’ हे RBI द्वारा प्रस्तुत केले गेलेले एक गुणात्मक साधन आहे, ज्याअंतर्गत बँकांचे वित्तीय आरोग्य कायम चांगले राखण्यासाठी कमकुवत बँकांवर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाते आणि त्यांना अत्याधिक नुकसानीपासून वाचविण्यात येते.
 2. नियामक कार्यवाहीमधून बँकांची कार्यक्षमतेवर “कोणत्याही प्रकारे भौतिक प्रभाव” पडत नाही आणि ही कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन, संपत्तीची गुणवत्ता, लाभ आणि दक्षता यामध्ये समग्र सुधारणा आणण्यास योगदान देते.
 3. एकदा का PCA लागू केले गेले तर बँकांना शाखा खोलणे, कर्मचार्‍यांची भर्ती आणि कर्मचार्‍यांची वेतन वृद्धी अश्या खर्चांवर प्रतिबंध लडला जाऊ शकतो.
 4. आता बँका फक्त त्याच कंपन्यांना कर्ज देऊ शकतात, ज्यांचे कर्ज इन्वेस्टमेंट ग्रेडच्या अधिकची आहे.

PCA चे मापदंड:-

 1. RBI ने मूल्यांकनासाठी चार मापदंड प्रस्तुत केले आहेत, ज्यामधून हे ओळखले जाते की बँकेला त्वरित सुधारात्मक कार्यवाहीच्या कक्षेत आणले जावे का?
 2. कॅपिटल टू रिस्क वेटेड रेशिओ (CRAR) – हे प्रमाण 9% च्या खाली असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.
 3. NPA (अकार्यक्षम संपत्ती) – जर NPA 6% -9% हून अधिक झाल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.
 4. मालमत्तेवरील लाभ (ROA = एकूण उत्पन्न / एकूण संपत्ती) – जर मालमत्तेवरील परतावा 0.25% पेक्षा खाली असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.
 5. पत प्रमाण (Leverage ratio) –  जर लाभ संपत्तीच्या 25% हून अधिक असल्यास बँकेच्या प्रथम मर्यादेंतर्गत पत प्रमाण 3.5-4.0% दरम्यान असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.
 6. या मापदंडांमध्ये प्रत्येकाला स्थितीच्या गंभीरतेनुसार वर्गीकृत केले गेले आहे आणि प्रत्येक श्रेणी RBI द्वारा एक वेगळ्या संचाची कार्यवाही केली जाते.
 7. सोबतच प्रत्येक मापदंडासाठी तीन आपत्ती मर्यादा निश्चित केली आहे आणि प्रत्येक मर्यादेसाठी विशिष्ट सुधारक उपायांनाही जोडले आहे. सुधारात्मक कार्य बँकांवरील आपत्तीवर निर्भर करणार. कोणत्याही आपत्ती मर्यादेच्या उल्लंघनाच्या परिणामस्वरूप PCA ला आमंत्रित केले जाते. आपत्ती अधिक असल्यास बँकांसाठी सुधारात्मक कार्यवाही अधिक हे कठीण होईल.

 

 

पार्श्वभूमी

 1. 1980 आणि 1990 दशकाच्या सुरूवातीला जगभरात कित्येक बँका आणि वित्तीय संस्थांनी वित्तीय संकटाच्या दरम्यान मौद्रिक नुकसानीचा सामना केला होता.
 2. 1600 हून अधिक वाणिज्यिक बँका आणि बचत बँका एकतर बंद झाल्या किंवा अमेरिकेकडून त्यांना वित्तीय सहकार्य प्राप्त झाले. त्यांना झालेले नुकसान USD 100 अब्जहून अधिक होते.
 3. बँका आणि वित्तीय संस्थांना अश्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी योग्य निरीक्षणात्मक धोरणाची (म्हणजेच त्वरित सुधारात्मक कार्यवाही) आवश्यकता निर्माण झाली.
 4. भारतात प्रथम वर्ष 2002 मध्ये RBI गव्हर्नर बिमल जलान यांच्या कार्यकाळात PCA प्रस्तुत केले गेले आणि एप्रिल 2017 मध्ये RBI गवर्नर उर्जित पटेल यांनी या नियमांना आणखी कडक केले.
 5. ही प्रक्रिया ग्रामीण प्रादेशिक बँका (RRB) यांना वगळता सर्व अनुसूचित वाणिज्यिक बँकांसाठी (SCB) लागू होते. याच्या कार्यकक्षेत पेमेंट बँक, NBFC आणि मुद्रा बँका येत नाहीत.

 


Life ban on 11 players in Russia

 1. आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे.
 2. IOC ने आतापर्यंत एकूण रशियाच्या 43 खेळाडूंवर बंदी घातली आहे.
 3. 2014 हिवाळी ऑलंपिक खेळांमध्ये डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली IOC ने हा निर्णय घेतला.
 4. या 11 मध्ये
  1. एल्बर्ट डेमचेंको (रौप्यपदक विजेता),
  2. इवान स्कोब्रेव,
  3. आर्टम कुजनेत्सोव,
  4. लुगेर तातयाना इवानोवा,
  5. निकिता क्रेयुकोव,
  6. एलेक्जेंडर बेस्मेर्तनेक,
  7. नतालिया मातवीना,
  8. लियुडमीला उदोबकीना,
  9. मेक्सिम बेलुगिन,
  10. तातियाना बुरिना
  11. एना स्चुकिना
 5. या खेळाडूंचा समावेश आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?

आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC):-

 1. आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे.
 2. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे.
 3. सध्याचे अध्यक्ष:- थॉमस बाग
 4. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली.
 5. डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
 6. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.

 


Insurance companies can now establish an IFSC-SEZ center

 1. भारताच्या विमा नियामक IRDAI ने ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालये (IIO) याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत.
 2. ज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
 3. 21 डिसेंबरला जाहीर केलेल्या ‘भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालयाची नोंदणी आणि कार्ये) मार्गदर्शक तत्त्वे-2017’ अन्वये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO) म्हणजे थेट विमा व्यवसाय किंवा पुनर्विमा व्यवसाय चालविण्यासाठी IRDAI कडून परवानगी असलेले एक शाखा कार्यालय होय.
 4. ही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय आणि परदेशी विमा कंपन्या आणि पुनर्विमा अश्या दोन्ही कंपन्यांना लागू होणार आहे.  
 5. त्याअंतर्गत होणारा व्यवहार पुर्णपणे परदेशी चलनात होणार आहे.
 6. जीवन विमा आहेत; सामान्य विमा; आरोग्य विमा आणि पुनर्विमा हे नोंदणीकृत IIO मध्ये परवानगी असलेल्या विमा व्यवसायांची वर्ग किंवा उप-वर्गवारी आहेत.

 

हे तुम्हाला माहित आहे का?
 1. भारतीय विमा विनियमन व विकास प्राधिकरण (IRDAI) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे.
 2. जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते.
 3. हे ‘विमा विनियमन व विकास प्राधिकरण अधिनियम-1999’ अन्वये स्थापन करण्यात आले.
 4. याचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे.
 5. IRDAI च्या संरचनेत एक अध्यक्ष, पाच पूर्णवेळ आणि चार अंशकालिक सदस्य असतात जे भारत सरकारकडून नियुक्त केले जातात.


Shrikant Deshmukh, Sujata Deshmukh, Sahitya Akademi Award

 1. प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१७ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 2. याबरोबरच प्रसिध्द अनुवादक सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला !’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 3. रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
 4. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली.
 5. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.
 6. सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
 7. मराठी साहित्यातील अनुवादित पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक अनुराधा पाटील, मकरंद साठे आणि डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश होता.
 8. अनुवादीत पुस्तकाच्या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असून पुढीलवर्षी(२०१८) साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
कवी श्रीकांत देशमुख
 1. प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
   
 2. ‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे.
 3. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे.
 4. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत.
 5. ६८ कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे.
 6. या संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
 7. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगितले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडया, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात.
 8. माती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते.
 9. ‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं.
 10. उंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळ्यांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.

 

 

सुजाता देशमुख
 1. सुजाता देशमुख अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. विक्रम संपथ लिखित ‘माय नेम इज गौहर जान’ या इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे.
 3. ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा अत्यानंद झाला आहे. लेखक हा पुरस्काराची अपेक्षा न करता लिहीत असतो.
 4. साहित्य अकादमीचा पुरस्कार ही माझ्या अनुवादासाठी मोठी पावती असून यानिमित्ताने ‘गौहर जान म्हणतात मला’ हे पुस्तक पुन्हा वाचकांसमोर येणार आहे.’ अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 5. एक साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे.
 6. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या.
 7. ’मिळून सार्‍याजणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं.
 8. ’गौहरजान म्हणतात मला!’, ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्‍हाड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र), दहशतीच्या छायेत’ यांसह आदी अनुवादित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.


Top