indian navy will get 111 new helicopters

 1. संरक्षण मंत्रालयाकडून नौदलासाठी 111 बहुद्देशीय हेलिकॉप्टर्सना मंजूरी देण्यात आली आहे.
 2. यासाठी 21,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर 24,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम अन्य गरजांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
 3. तर यांपैकी 3,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम 150 स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी देखील देण्यात येणार आहे.
 4. संरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे (डीएसी) देण्यात आलेल्या या एकूण 46,000 कोटी रुपयांच्या निधीमुळे नौदल आजच्या तुलनेत अधिक सशक्त होणार आहे.
 5. गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने नौदलाच्या आगाऊ युद्ध सामग्रीसाठी 9 अॅक्टिव्ह टोड ऐरे सोनार सिस्टिमच्याखरेदीसाठी 450 कोटी रुपयांच्या प्रस्तावासाठी मंजूरी दिली होती.


tajinderpal singh gold medal in asian games

 1. आशियाई खेळांच्या स्पर्धेत सातव्या दिवसाच्या खेळात भारताने गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
 2. गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग याने भारताला ही सुवर्णकमाई करून दिली. त्याने 20.75 मीटरची विक्रमी फेक केली.
 3. त्याआधी स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकल हिने कांस्यपदकाची कमाई करत आपले खाते उघडले होते. त्यापाठोपाठ जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनीही भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली होती.
 4. तजिंदर पाल याने सर्वप्रथम 19.96 मीटरची फेक केली होती.


indian hockey team has created record

 1. भारतीय हॉकी संघाने जपानवर 8-0 ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.
 2. तसेच जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.
 3. 1982 साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती.
 4. तर झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 45 गोलची नोंद केली होती आणि यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 51 गोलची नोंद केली आहे.


Defense Minister's Scientific Adviser Satish Reddy became the Chairman of DRDO

 1. प्रतिष्ठित वैज्ञानिक जी सतीश रेड्डी यांना शनिवारी संरक्षण अनुसंधान, विकास संघटनेचे (डीआरडीओ) अध्यक्ष नियुक्त केले. 
 2. रेड्डी रक्षा मंत्रीचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. 
 3. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की डीआरडीओचे अध्यक्ष पद दोन वर्षे त्यांच्या नियुक्त्यासाठी गेले आहेत. 
 4. या काळात संरक्षण अनुसंधान आणि विकास विभाग (डीओडीआरडी) च्या सचिवांनाही मे मध्ये एस क्रिस्टोफर च्या निवृत्ती नंतर ते पद गेल्या तीन महिने रिक्त आहे.
 5. संरक्षण सचिव संजय मित्रा यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेलक्रिस्टोफर मागील वर्षी मे मध्ये एक वर्ष सेवा विस्ताराची आहे त्यांच्या कार्यकाळात 28 मे रोजी संपले. 
 6. ते मे 2015 मध्ये दोन वर्षांसाठी डीआरडीओचे महासंचालक नियुक्त केले होते. 
 7. क्रिस्टोफर त्या वेळी विशिष्ट वैज्ञानिक आणि कार्यक्रम संचालक (एअरबर्न अर्ली वार्निंग अँड कंट्रोल सिस्टम) आणि डीआरडीओ मध्ये सेंटर फॉर एअर बॉर्न सिस्टम, संचालक म्हणून काम करीत आहे. 
 8. याची स्थापना 1958 साली झाली आणि याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
 9. “बलस्य मूलं विज्ञानम्” हे याचे घोषवाक्य आहे.


Lalchand Rajput: Head coach of the Zimbabwean cricket team

 1. भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वे टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे.
 2. याआधी मेमध्ये झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० ट्राय सीरिज आणि झिम्बाब्वे पाकिस्तानच्या वनडे सीरिजसाठी लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 3. प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यामुळे मी आनंदी आहे. नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे, असं लालाचंद राजपूत यांनी पीटीआयला सांगितलं.
 4. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं राजपूत यांच्याशी ३ वर्षांचा करार केला असला तरी या कराराचं प्रत्येक वर्षी नुतनीकरण होणार आहे.
 5. भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी लालचंद राजपूत भारतीय टीमचे व्यवस्थापक होते.
 6. तसंच २००८ साली धोनीच्याच नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियात वनडे ट्रायसीरिज जिंकली. तेव्हाही राजपूत भारतीय टीमचा भाग होते.
 7. २०१६ साली लालचंद राजपूत यांची अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. राजपूत यांच्या कारकिर्दीत अफगाणिस्तानला चांगलं यश मिळालं.
 8. जून महिन्यामध्ये अफगाणिस्ताननं भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या टीमचे प्रशिक्षकही राजपूत होते.
 9. मागच्या रणजी मोसमामध्ये राजपूत यांनी आसामचं प्रशिक्षकपद भुषवलं. मुंबई प्रिमिअर लीगमध्ये राजपूत एका टीमचे सल्लागारही होते. तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही राजपूत यांनी पदं भुषवली आहेत.
 10. लालचंद राजपूत यांनी भारताकडून २ टेस्ट मॅच आणि ४ वनडे मॅच खेळल्या आहेत. तसंच रणजी ट्रॉफीमध्ये राजपूत मुंबईकडून खेळायचे. 


Top