Maharashtra's first cyber university in Maharashtra

 1. सायबर सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सायबर विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. या पार्श्‍वभूमीवर ‘सेंटर ऑफ एक्सलन्सी सायबर सिक्युरिटी’ या नावाचे देशातील पहिले केंद्र शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
 3. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने यासाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
 4. या केंद्राकडून बनवण्यात येणारा अभ्यासक्रम देशातील सर्वच विषयांतील अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असणार आहे.
 5. या विद्यापीठात ३००० व्यावसायिकांना प्रशिक्षित केले जाईल. ते सायबर हल्ले थांबविण्याचे तसेच इंटरनेट गुन्हेगारी आणि सायबर फोरेंसिकची तपासणी करण्याचे कार्य करतील.
 6. हे सायबर विद्यापीठ इंटरनेट व्यावसायिकांना मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड प्रोफेशनल प्रोग्रामप्रमाणे प्रशिक्षित करेल.
 7. या विद्यापीठात, डेटा अॅनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजंस), क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचॅन, सायबर फोरेंसिक आणि तपासणीशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध असतील.
 8. याशिवाय, इतर १५ इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) संबंधित प्रशिक्षणदेखील प्रदान केले जाईल.
 9. भारतात सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या सायबर हल्ल्यांशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी सुमारे ३० लाख सायबर व्यावसायिकांची आवश्यकताआहे.
 10. सध्या देशात केवळ १० लाख सायबर व्यावसायिक आहेत. या विद्यापीठाच्या मदतीने कुशल सायबर व्यावसायिक तयार केले जातील.


India is the first country to create a cooling action plan

 1. जागतिक ओझोन दिनी (१६ सप्टेंबर) केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘मोंट्रियल प्रोटोकॉल – इंडियाज सक्सेस स्टोरी’ आणि भारताच्या कूलिंग अॅक्शन प्लॅनच्या मसुद्याचे अनावरण केले.
 2. यामुळे कूलिंग अॅक्शन प्लॅन तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
 3. या मसुद्यामध्ये ज्या क्षेत्रांमध्ये कुलिंगच्या सुविधेची आवश्यकता आहे  अशा विविध क्षेत्रांची सविस्तर माहिती गोळा करण्यात आली आहे.
 4. याशिवाय अशा प्रक्रिया ज्यामध्ये कुलिंगची मागणी कमी केली जाऊ शकते अशा प्रक्रियांची यादीही तयार करण्यात आली आहे. यामुळे प्रदूषकांच्या उत्सर्जनात घट येईल.
 5. ध्येय:
  1. २०३७-३८पर्यंत रेफ्रिजरंटच्या मागणीत २५-३० टक्के घट करणे.
  2. २०३७-३८पर्यंत कूलिंगच्या मागणीत २०-२५ टक्के घट करणे.
  3. २०३७-३८पर्यंत कूलिंगसाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या मागणीमध्ये २५-४० टक्के घट करणे.
  4. २०२२-२३पर्यंत सर्विसिंग सेंटरमधील तंत्रज्ञास प्रशिक्षण प्रदान करणे.


7th UNWTO Global Summit Summit

 1. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान ७व्या यूएनडब्लूटीओ वैश्विक शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
 2. या शिखर परिषदेचा मुख्य विषय ‘ए २०३० विजन फॉर अर्बन टूरिज्म’ हा होता.
 3. या संमेलनाचे आयोजन जागतिक पर्यटन संघटना आणि दक्षिण कोरियाच्या पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती मंत्रालयाच्या मदतीने करण्यात आले होते.
 4. यामध्ये शहरी पर्यटनाच्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाली. याशिवाय शहरी पर्यटनासाठी नवकल्पना, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वतता यांच्यावर चर्चेची चर्चा झाली.
 5. जागतिक पर्यटन संघटना:-
  1. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (स्थापना वर्ष: १९७५)
  2. ही संयुक्त राष्ट्रांची पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचा उद्देश जागतिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आहे.
  3. १५६ देश या संस्थेचे सदस्य आहेत. यात खाजगी पर्यटन क्षेत्र आणि स्थानिक पर्यटन प्राधिकरण यांचादेखील समावेश आहे.
  4. या संस्थेचे मुख्यालय स्पेनच्या राजधानी माद्रिद येथे आहे. ही संस्था शाश्वत आणि विश्वासार्ह पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.


Anil Kumar Chaudhary appointed as Chairman of SAIL

 1. अनिल कुमार चौधरी यांची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 2. अनिल चौधरी यापूर्वी 2011 सालापासून SAILचे संचालक (वित्त) होते.
 3. भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) ही पोलाद बनविणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे.
 4. देशाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातल्या सात महारत्नांपैकी एक आहे.
 5. भिलाई येथे SAILचा सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि तो प्रमुख उत्पादक आहे.


Nomination for Assamese film Oscar for 'Village Rockstars'

 1. 2019 अकॅडेमी (ऑस्कर) पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून रिमा दास निर्मित ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ या आसामी भाषेतल्या चित्रपटाचे नामांकन देण्यात आले आहे.
 2. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीमध्ये अंतिम पाच नामांकनामध्ये आतापर्यंत पोहचलेले तीन भारतीय चित्रपट म्हणजे -
  1. मदर इंडिया (1957) 
  2. सलाम बॉम्बे! (1988)
  3. लगान (2001) 
 3. 11 मे 1927 रोजी अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेची स्थापना करण्यात आली.
 4. 1929 सालापासून अमेरिकेमधील या संस्थेकडून ऑस्कर पुरस्कार दिला जात आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.