1. स्वित्झरलेंड मधील प्रमुख बिजनेस स्कूल IMD द्वारा वैश्विक प्रतिभा सूचकांक (World Talent Ranking)) प्रकाशित केला आहे. या प्रतिभा क्रमवारीमध्ये ६३ देशांचा समावेश केला आहे. भारताचे स्थान ३ स्थानांनी उंचावत ५१ व्या क्रमांकावर पोहचले आहे.
  2. प्रथम स्थानी स्वीत्झर्लंड पुन्हा एकदा कायम आहे. या क्रमवारीत प्रथम दहामध्ये स्वीत्झर्लंड नंतर अनुक्रमे ऑस्ट्रिया, फिनलँड, नेदरलँड, नॉर्वे, जर्मनी, स्वीडन आणि लक्जमबर्ग या देशांचा समावेश आहे.
  3. यूरोप प्रांतातील स्वीत्झर्लंड, डेनमार्क आणि बेल्जियम हे देश या बाबतीत प्रतिस्पर्धी आहेत. यूरोपची भक्कम शिक्षण प्रणाली स्थानिक प्रतिभाचा विकास तसेच परदेशी प्रतिभा आणि उच्च कुशल व्यवसायिकांना आकर्षित करण्याची क्षमता प्रदान करते.
  4. IMD टॅलेंट रँकिंग हा प्रतिभांना आकर्षित व विकसित करण्यात आणि त्यांना आपल्या येथे सतत कामावर ठेवण्यामध्ये देशांच्या प्रयत्नांना प्रदर्शित करते.


  1. देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्याने घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये 101.077 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 64 टक्के जलसाठा आहे.
  2. या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 157.799 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
  3. पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 27.07 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 19.63 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 73 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
  4. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा असेलेली राज्ये -हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू.
  5. कमी पाणीसाठा असेलेली राज्ये – राजस्थान, झारखंड, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा.


Top