पंतप्रधान वय वंदना योजना

 1. ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान वय वंदना योजनेचा (पीएमव्हीव्हीवाय) २१ जुलै रोजी शुभारंभ केला.
 2. ही एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) असून, ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
 3. ही योजना भारतीय जीवन वीमा अर्थात एलआयसीकडून ऑफलाईन तसेच ऑनलाईनेही खरेदी करता येणार आहे.
 4. ही योजना १० वर्षाला ८ ते ८.३ टक्के प्रतिवर्ष दराने पेन्शन सुनिश्चित करते. तसेच या योजनेला सेवा कर आणि जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
 5. १० वर्षाच्या या योजनेअंतर्गत मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक कालावधीत पेन्शन मिळू शकणार आहे.
 6. ही पेन्शन फक्त पुढील १० वर्षांकरिता गॅरेटेंड मिळणार असून, ही पेन्शन स्कीम ४ मे २०१७ ते ३ मे २०१८ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आहे.
 7. आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि ‘एलआयसी’ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.
 8. व्याजदरांची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.
 9. दहा वर्षांच्या कालावधी संपताना विमाधारकाला संपूर्ण रक्कम व निवृत्तिवेतनाचा शेवटचा हफ्ता मिळेल.
 10. या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शन खरेदीची पूर्ण रक्कम कुठलीही वजावट न करता लाभार्थ्यांने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळेल.
 11. पेन्शन चालू असताना पैशांची गरज लागल्यास तीन वर्षांनंतर पेन्शन खरेदीच्या ७५ टक्के इतकी रक्कम कर्ज मिळू शकते अर्थात त्याकरिता लागू असलेला व्याजदर द्यावा लागेल.
 12. याशिवाय मुदतीआधीही या योजनेतून बाहेर पडता येऊ शकते. त्या स्थितीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ९८ टक्के रक्कम परत मिळेल.
 13. या योजनेत पूर्ण कुटुंबाकरिता पेन्शन खरेदीची कमाल मर्यादा ७.५० लाख रुपये ही आहे. यात पती/पत्नी (ज्येष्ठ नागरिक) व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश आहे.
 14. थोडक्यात एकाच कुटुंबात पती-पत्नी दोघांना पेन्शन पाहिजे असेल पती ३.५० लाख तर पत्नी ४ लाख रुपये गुंतवू शकते.
 15. दरमहा १ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी १.५० लाख, तर ५ हजार रुपये मिळविण्यासाठी ७.५० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.


डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार

 1. इबोला, झिका यांसारख्या नवीन विषाणुजन्य रोगांचे संशोधन करणारे डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना प्रतिष्ठेचा आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. त्यांनी वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधून निदान करण्याच्या शोधलेल्या चाचणीसाठी त्यांना आफ्रिकेचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार देण्यात आला.
 3. त्यांच्या या चाचणीद्वारे अवघ्या एक तासात विषाणू कुठल्या रोगाचा आहे ते समजते.
 4. ही चाचणी सोपी व कमी खर्चीक आहे.
 5. आफ्रिकेसारख्या अप्रगत देशांतील दूरस्थ भागातील लोकांसाठी या चाचणीचा वापर केला जात आहे.
 6. त्यांच्या या विषाणूशोधन चाचणीचा व्यावसायिक वापर सुरू होईल, तेव्हा ती रोगनिदानातील मोठी क्रांती असेल.
 7. बर्लिनमधील हुम्बोल्ट विद्यापीठातून न्यान यांनी वैद्यक शाखेची पदवी घेतली.
 8. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या संस्थेतून त्यांनी वैज्ञानिक म्हणून प्रशिक्षण घेतले. संसर्गजन्य रोगातील निदानात ते निष्णात मानले जातात.
 9. रक्तातील संसर्गातून एचआयव्ही, हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी, हेपॅटिटिस इ, डेंग्यूचा विषाणू, नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू पसरतात. ते सगळे विषाणू ओळखण्याची एकच सर्वसमावेशक चाचणी त्यांनी शोधून काढली.
 10. त्यांनी हेपॅटिटिस बी विषाणूच्या निदानावर केलेले संशोधन ‘क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
 11. लायबेरियात इबोलाचा उद्रेक झाला तेव्हा तेथील इबोला आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे ते प्रमुख होते.
 12. आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनद्वारे आफ्रिकेतील नवप्रवर्तक संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार देण्यात येतो.
 13. स्वित्झर्लंडमधील दानशूर उद्योजक जीन क्लॉद बॅस्टॉस द मोराइस यांनी आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली.


‘टार्गेट इंडिया’ च्या अॅक्सलरेटर प्रोग्रामसाठी आठ कंपन्यांची निवड

 1. अमेरिकेमधील किरकोळ क्षेत्रातली ‘टार्गेट इंडिया’ या भारतीय कंपनीने त्याच्या टार्गेट अॅक्सलरेटर प्रोग्रामसाठी पाचवा गट निवडण्यात आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गट आहे.
 2. अभिनव तंत्रज्ञान उपाययोजना विकसित करण्यासाठी या गटात आठ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

या कंपन्या

 1. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI),
 2. मशीन लर्निंग,
 3. कंप्युटर व्हिजन,
 4. नॅच्युरल लॅंगवेज प्रॉसेसिंग,
 5. विश्लेषणात्मक आणि डिजिटल अनुभव

अश्या क्षेत्रांमध्ये कार्य करतील.

निवडलेल्या आठ कंपन्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :-

 1. कॉगनीट (बंगळुरू):- कंपनीने चित्रवाणीमधील संदर्भ ओळखणारे आणि या सामग्रीचा एक मजकूर तयार करण्यास सक्षम असे एक उपाय तयार केला आहे.
 2. हायपरवर्क्स (अमेरिका):-  कंपनीने सध्या कॅमेराद्वारे निर्माण होणारी ताजी सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी हार्डवेअरसह एकाग्रित करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
 3. मूनराफ्ट (बंगळुरू):-  कंपनी ही ट्रायल रूमधील कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम खरेदी सहाय्यकासह असलेले एक डिझाइन सल्लागार आहे.
 4. कॉग्निटिफाई:-  कंपनी प्रत्यक्ष आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या मिळालेल्या चित्रवाणीचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे.
 5. लाइट इन्फर्मेशन सिस्टम (पुणे):-  कंपनीची ग्राहक सहाय्यता कार्यांसाठी लागू केल्या जाऊ शकण्यासाठी नॅच्युरल लॅंगवेज प्रॉसेसिंग क्षेत्रात क्षमता आहे.
 6. व्हीफ्रेज (vPhrase) (मुंबई):-  कंपनी संरचित माहितीपासून नॅच्युरल लॅंगवेजमध्ये अंतर्दृष्टी निर्माण करू शकते.
 7. स्ट्रेअमोइड (बंगळुरू):-  कंपनी वैयक्तिक उत्पादनांसाठी शिफारसी आणि नॅच्युरल लॅंगवेजमधून शोध घेण्यास सक्षम आहे.
 8. जम्पर.एआय (Jumper.ai):-  ‘#’ द्वारे सामाजिक माध्यमांवरुन खरेदी करण्यास सक्षम करते.

कार्य करण्यामध्ये प्रोत्साहन मिळावे म्हणून निवडलेल्या कंपन्यांना चार-महिन्यांच्या कठोर कार्यक्रमामधून जावे लागणार आहे.

यादरम्यान त्यांना टार्गेट इंडिया यांच्याकडून तांत्रिक सहाय्य आणि प्रायोगिक समाधान देण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.


संजय कोठारी नव्या राष्ट्रपतींचे सचिव

 1. देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव म्हणून ‘पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्शन बोर्डा’चे अध्यक्ष संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची तर वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे.
 4. कोठारी हे १९७८ च्या आयएएस बॅचचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत.
 5. त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवरदेखील विविध पदांवर काम केले आहे.


वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आठ भारतीयांना पात्रता

 1. बॅडमिंटनमध्ये महाशक्ती होण्याच्या दिशने वाटचाल करीत असलेल्या भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष व महिला एकेरीमध्ये चार पात्रता स्थान मिळाले आहेत.
 2. भारताने महिला एकेरीचे सर्व चारही कोटा स्थान मिळविले आहेत.
 3. राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दास व तन्वी लाड यांच्यासह पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी कोटा स्थान मिळविले आहेत.
 4. भारत, चीन व जपान याच देशांना महिला एकेरीमध्ये चार कोटा स्थान मिळाले आहेत.
 5. पुरुष एकेरीत सैयद मोदी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मासह अजय जयराम, किदाम्बी श्रीकांत व साई प्रणीत यांनी पात्रता मिळविली आहे.
 6. चीन, डेन्मार्क व हाँगकाँग यांनीही चार पात्रता स्थान मिळविली आहेत.

चीनचा संघ:-

 1. चेन लोंग,
 2. लिन डॅन,
 3. शी युकी
 4. तियान हुवेई 

डेन्मार्क संघ :-

 1. एंडर्स एंटोंसेन,
 2. व्हिक्टर एक्सेलसन,
 3. यान ओ योर्गेंसेन  
 4. हँस ख्रिस्टयन व विटिंगुस 

बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप ग्लास्गोमध्ये 21 ते 27 ऑगस्ट या कालावधीत खेळल्या जाणार आहे.


Top