The sale of 'election bond' will start from March 1

 1. निवडणूक निधीच्या व्यवस्थेला पारदर्शी बनविण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या निवडणूक बंध (Electoral Bonds) योजनेंतर्गत बंधच्या पहिल्या श्रृंखलेची विक्री 1 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.
 2. सन 2018 च्या पहिल्या तिमाहीसाठी, निवडणूक बंधांची पहिली विक्री 1 मार्चपासून 10 मार्च 2018 पर्यंत सुरु राहणार आहे.
 3. निवडणुकीसाठी जमा केल्या जाणार्‍या निधीत स्वच्छता आणि पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारने एक पुढाकार घेतला आहे.
 4. वित्तमंत्रालयाने राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी एक नवी ‘निवडणूक बंध’ योजना 2 जानेवारीला जाहीर केली होती.
 5. निधीदात्याला हे बंध भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शाखांमार्फत खरेदी करता येणार. यामार्फत प्राप्त होणारी रक्कम संबंधित पक्षाच्या अधिकृत बँक खात्यात जमा होणार आहे.
 6. सुरुवातीला SBI ने नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमधील मुख्य शाखांमध्ये निवडणूक बंध सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

‘निवडणूक बंध’ बाबत

 1. दात्याला बंध खरेदी करताना KYC नियमांचे पालन करावे लागणार, जेव्हा की बंधांवर दात्याचे नाव नसणार. हे बंध प्रॉमिसरी नोटप्रमाणेच एक बँकिंग दस्तऐवज असणार. मात्र यावर कोणत्याही प्रकारचे व्याज देय केले जाणार नाही.
 2. बँकेत रु. 1000, रु. 10000, रु. 1 लक्ष, रु. 10 लक्ष आणि रु. 1 कोटी या मूल्याचे बंध खरेदी केले जाऊ शकतात. निवडणूक बंधांची वैधता फक्त 15 दिवसांची असणार.
 3. जनप्रतिनिधित्व कायदा-1951 अन्वये मान्यताप्राप्त कोणत्याही पक्षाला दान केले जाऊ शकते.
 4. बंधची विक्री वर्षातले चार महीने – जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर – यांमध्ये 10 दिवसांसाठी होणार. या कालावधीतच बंध खरेदी केले जाऊ शकते.
 5. सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षात बंधांच्या खरेदीची सुविधा 30 दिवसांसाठी असणार.
 6. मागील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये 1% हून अधिक मते मिळवलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षचं बंधांमार्फत निधी प्राप्त करू शकतात.
 7. बंध प्रदान करणारी बँक दात्याच्या निधीची तोपर्यंत कस्टडियन (जपून ठेवणारे) राहणार, जोपर्यंत संबंधित पक्षाच्या खात्यामधून दात्याला रक्कम वापस मिळत नाही.
 8. वर्तमान परिस्थितीत निवडणुकीसाठी लागणारा पैसा हा रोकड आणि गुप्तदानामार्फत प्राप्त होत होता. नव्या नियमांनुसार राजकीय पक्षाला दात्याकडून प्राप्त होणार्‍या रोख निधीची मर्यादा 20000 रुपयांवरून कमी करत 2000 रुपये केलेली आहे.


$ 84 million loan agreement with India's ADB for water supply in Bihar

 1. भारत सरकार आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात बिहारच्या भागलपुर आणि गया शहरांमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्याचा विस्‍तार करण्यासाठी $84 दशलक्षचा ऋण करार झाला आहे.
 2. प्रकल्पाविषयी:-
  1. गुणवत्‍तापूर्ण आणि सतत पाणी पुरवठ्यामधून कार्यक्षम पाणी व्यवस्थापनस प्रोत्साहन मिळणार, परिणामस्‍वरूप दोन्ही शहरांमध्ये दररोज 135 लीटर प्रती व्यक्ती पाण्याची 24 तास पुरवठा अबाधित ठेवला जाऊ शकणार आहे.
  2. शिवाय, 400 शहरी स्थानिक विभागाच्या कर्मचार्‍यांना पाणी पुरवठा प्रणालीचे व्यवस्थापन, संचालन आणि देखरेख याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 3. पार्श्वभूमी:-
  1. ADB ने सन 2012 मध्ये बिहारच्या भागलपुर, गया, दरभंगा आणि मुजफ्फरपुर या चार शहरांमध्ये सतत शहरी पायाभूत सुविधा आणणी सेवा प्रदान करण्यासाठी प्रकल्प प्रस्तावाला मंजूरी दिली होती.
  2. दोन टप्प्यात वितरित केले जाणारे हे कर्ज बिहार शहरी विकास गुंतवणूक कार्यक्रमासाठी असलेल्या $200 दशलक्षच्या बहु-श्रृंखला वित्‍तीय सुविधा (MFF) चा एक भाग आहे.


The prestigious Wolf Prize for Mathematician Vladimir Drinfeld

 1. प्रसिध्द गणितज्ञ व्लादिमीर गेरशोनोविच ड्रिनफेल्ड यांना गणितातील प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार मिळाला आहे.
 2. एक लाख डॉलर्सचा हा पुरस्कार इस्रायलच्या वुल्फ फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जातो. ज्यांना आधी वुल्फ पुरस्कार मिळाला अशा अनेकांना नंतर नोबेलही मिळाले आहे.
 3. ड्रिनफेल्ड यांचे गणितातील संशोधन हे अंकीय सिद्धांत, थिअरी ऑफ अ‍ॅटॉमॉर्फिक फॉम्र्स, बीजगणितीय भूमिती, एलिप्टिक मोडय़ुल, थिअरी ऑफ लँग्लांड्स कॉरस्पाँडन्स या विषयांमध्ये आहे.
 4. पुंज समूहाची संकल्पना त्यांनी व मिशियो जिंबो यांनी एकाच वेळी मांडली. त्यातून गणितीय भौतिकशास्त्रात मोठी भर पडली. थिअरी ऑफ सॉलिटॉन्समध्ये ड्रिनफेल्ड-सोकोलोव्ह यांनी अनेक सुधारणा केल्या.
 5. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लँग्लांड्स काँजेक्सर्स फॉर जीएल २ हा कूटप्रश्न सोडवला. एलिप्टिक मोडय़ुल्स म्हणजे ड्रिनफेल्ड मॉडय़ुल्सची कल्पना त्यांनी मांडली होती. 
 6. गणितात युरी मॅनिन हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी यांग-मिल्स इन्स्टँटनच्या मॉडय़ुलाय स्पेसची संकल्पना मांडली. ती नंतर मिखाइल अतिया व निगेल हिचीन यांनी स्वतंत्रपणे सिद्ध केली.
 7. क्वांटम ग्रूप हा शब्दप्रयोगही त्यांनीच प्रथम वापरला. त्यांचा संबंध यांग बॅक्सटर समीकरणाशी जोडून त्यांनी या संशोधनास नवी दिशा दिली.
 8. व्हर्टेक्स बीजगणितीय सिद्धांत त्यांनी अ‍ॅलेक्झांडर बेलीनसन यांच्यासमवेत नव्याने विकसित केला.
 9. ड्रिनफेल्ड यांनी समकालीन गणिताच्या विकासात मोठा हातभार लावला असून अनेक नवीन सिद्धांतांना त्यांचे नाव नंतर देण्यात आले.
 10. सूत्र सिद्धांतासह, भौतिकशास्त्राच्या अभ्यासात पायाभूत असलेले अनेक गणिती सिद्धांत त्यांनी विकसित केले आहेत.
व्लादिमीर गेरशोनोविच ड्रिनफेल्ड
 1. परिचय:-
  1. युक्रेनमध्ये जन्मलेल्या ड्रिनफेल्ड यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी बुखारेस्ट येथे गणित ऑलिम्पियाडमध्ये रशियाचे प्रतिनिधित्व केले होते.
  2. १९७८मध्ये मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली.
  3. स्टेकलोव इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथॅमेटिक्स या संस्थेतून त्यांनी विज्ञानातील डॉक्टरेट मिळवली.
  4. १९८१ ते १९९९ या काळात त्यांनी व्हेरकिन इन्स्टिटय़ूट फॉर लो टेम्परेचर फिजिक्स अँड इंजिनीअरिंग या संस्थेत काम केले.
  5. १९९९मध्ये त्यांनी शिकागो विद्यापीठात काम सुरू केले.


Public Debt Plan for NBFCs

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या (NBFCs) ग्राहकांसाठी लोकआयुक्त योजना अधिसूचित करण्यात आली आहे.
 2. लोकआयुक्त योजना (ombudsman scheme) मार्फत NBFC च्या ग्राहकांसाठी एक तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्यात येत आहे.
 3. ही योजना या महिन्याच्या शेवटी सुरू होण्याचे अपेक्षित आहे.
 4. सुरूवातीला या योजनेला सर्व ठेव स्वीकारणार्‍या NBFC साठी लागू केले जाणार.
 5. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934 च्या कलम 45(ल) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून RBI ने ही योजना सादर केली आहे.
 6. RBI येथील अधिकारी (महाव्यवस्थापक श्रेणीच्या खालील नसावा) लोकआयुक्त म्हणून RBI कडून नियुक्त केला जाणार.
 7. त्यांचा निर्दिष्ट कार्यकाळ तीन वर्षांहून अधिक नसणार आणि आवश्यक असल्यास तो कमी केला जाईल.


February 24: World Printing Day

 1. कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन २४ फेब्रुवारीला झाला. हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
 2. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला, त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि पद्धती यामध्ये झाली आहे.
 3. चीनमध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा यांचा समावेश होता.
 4. मुद्रण प्रतिमा कोरून तयार केलेल्या पृष्ठांची असे. बौद्ध धर्मातील काही विचार, मजकूर म्हणून संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवलेले असत.
 5. जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत.
 6. यातूनच चीनमध्ये मुद्रण प्रतिमेद्वारे मुद्रणाचे तंत्र सापडले. सहाव्या शतकानंतर या संगमरवरी दगडाच्या जागी लाकूड आले. दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणे अधिक जास्त सोपे आणि सोयीस्कर होत.
 7. इ. स. १०४१-४८ दरम्यानच्या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी किमयागाराने मुद्रणासाठी खिळ्यांची संकल्पना आणण्याचा प्रयत्न केले. इसवी सन १४३४-१४३९ या कालखंडात जर्मनीतील ऱ्हाइनलँडमध्ये योहानेस गुटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण प्रकाराचा शोध लावला आणि तोच मुद्रण कलेतील मोलाचा दगड ठरला.
 8. गुटेनबर्ग यांनी मुद्रा, मातृका आणि शिशाचा एकत्रित वापर करून टिकाऊ अशी सुटी अक्षरे तयार केली. या सुट्या अक्षरांचा सामूहिक संच वापरून मुद्रणाचे तत्र त्यांनी निर्माण करून, गुटेनबर्ग यांनी ४० पानांचे बायबल छापले. गुटेनबर्ग यांनी पुढे योहान फुस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला.
 9. १४५५ मध्ये गुटेनबर्ग यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावून मुद्रण कालावधीत घट करण्यात यश मिळवले. १८८० नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले.
 10. 1870मध्ये अलिबागमध्ये ‘सत्यसदन’ नावाचा पहिला छापखाना सुरू झाला. त्यात शिलामुद्रण पद्धतीची कामे होत असत. १९१६ मध्ये तो छापखाना बंद पडला.
 11. इ. स. १९५४ मध्ये तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात एकूण १० मुद्रणालये होती. ३१ मार्च १९८१च्या सरकारी नोंदी प्रमाणे जिल्ह्यात ९३ छापखाने होते. त्यातील सर्वाधिक ३० छापखाने हे अलिबागमध्ये होते.


Photo of Jejuri's Khandoba Yatra, the world's best photo

 1. विकिपीडिया च्या जागतिक वारसा छायाचित्र स्पर्धेत मिळाला बहुमान
 2. नवी दिल्ली - विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात  मोठ्या छायाचित्र स्पर्धेत पी.खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. 
 3. विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांचे छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.
 4. १० हजार छायाचित्रकारांचा सहभाग:-
  1. या स्पर्धेसाठी जगभरातून २ लाख ४५ हजार छायाचित्रे प्राप्त झाली होती, तर जगातल्या १० हजार छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
  2. आग्रा ते इटली पर्यंत अनेक वारसा स्थळांची  २ लाखाहून अधिक छायाचित्रे या स्पर्धेसाठी पाठविण्यात आली, यापैकी विकिपीडियाने ४८९ छायाचित्रे पुरस्कारासाठी पात्र ठरविली व अंतीमतः यातून १५ छायाचित्रे पुरस्कारासाठी निवडण्यात आली. 
 5. खंडोबाच्या भंडारा यात्रेच्या छायाचित्रात हळदीचा सुगंध:-
  1. विकिपीडियाने जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या भंडारा यात्रेचे छायाचित्र जगातील सर्वोत्तम छायाचित्र म्हणून निवड केल्यानंतर या छायाचित्राचे वर्णनही अप्रतिम केले आहे.
  2. इतिहास, रंग व भक्तिभाव याचा अपूर्व संगम या छायाचित्रात पाहायला मिळतो व यातून हळदीचा (भंडारा) सुगंध अनुभवता येतो, असे विकिपीडियाने नमूद केले आहे. 
  3. जगातील इटली, बांग्लादेश, थायलंड, इटली, जर्मनी,इराण,इजिप्त, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया या देशातील  छायाचित्रांनी ही पहिल्या १५ पुरस्कारात स्थान पटकाविले आहे.


Top