mrutyunjay mahapatra made Syndicate Bank MD and CEO

 1. केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली.
 2. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियात (एसबीआय) कार्यरत पाच उपव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे.
 3. सिंडिकेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मृत्युंजय महापात्रा यांची निवड करण्यात आली.
 4. इंडियन बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पद्मजा चंद्रू यांची निवड करण्यात आली. हे दोघेही सध्या एसबीआयमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आहेत.
 5.   याचबरोबर एसबीआयमधील उपव्यवस्थापकीय संचालक पल्लव महापात्रा, जे. पॅकिरीसामी आणि कर्नाम शेखर यांची अनुक्रमे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आंध्र बॅंक आणि देना बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
 6. अलाहाबाद बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांची निवड करण्यात आली आहे.
 7. अतुल कुमार गोयल आणि एस. हरिशंकर यांची अनुक्रमे युको बॅंक आणि पंजाब अँड सिंध बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे.
 8. युनायटेड बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अशोक कुमार प्रधान यांना बढती देण्यात आली आहे.
 9. बॅंकांचे नवे प्रमुख:-
  1. इंडियन बॅंक : पद्मजा चुंद्रू सेंट्रल
  2. बॅंक ऑफ इंडिया : पल्लव महापात्रा
  3. आंध्र बॅंक : जे. पॅकिरीस्वामी
  4. सिंडिकेट बॅंक : मृत्युंजय महापात्रा
  5. अलाहाबाद बॅंक : एस. एस. मल्लिकार्जुन राव
  6. बॅंक ऑफ महाराष्ट्र : ए. एस. राजीव
  7. युको बॅंक : अतुल कुमार गोयल
  8. पंजाब अँड सिंध बॅंक : एस. हरिशंकर
  9. देना बॅंक : कर्नाम शेखर
  10. युनायटेड बॅंक ऑफ इंडिया : अशोक कुमार प्रधान


There will be grocery war in the country

 1. "वॉलमार्ट'पाठोपाठ "ई-कॉमर्स'मधील महाकाय कंपनी असलेलल्या "ऍमेझॉन'ने आदित्य बिर्ला समूहाचे "मोअर' सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे.
 2. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या "रिटेल' व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या विद्यमान रिटेलर्स तसेच ऑनलाईन किराणा विक्रेत्यांना आव्हान मिळेल.
 3. त्यामुळे किराणामालासह सौंदर्य प्रसाधने, कपडे, चैनीच्या आणि घरगुती वापराच्या वस्तूंच्या खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सवलती, एका वस्तूच्या खरेदीवर दुसरी मोफत सारख्या घोषणांद्वारे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सुपरमार्केट्‌स दरम्यानचे व्यापार युद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे.
 4. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना स्वकमाईला (मार्जिन) कात्री लावून सवलतींचीही खैरात करावी लागेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचाच फायदा होणार आहे.
 5. छापील किंमतींपेक्षाही कमी किंमत, फेस्टिव्हल ऑफर्स, होम डिलेव्हरी, लॉयल्टी बोनस यासारख्या सवलत योजनांमुळे सुपर मार्केट्‌समधून महिनाभराचा किराणा भरणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढत आहे.
 6. सणासुदीला सुपरमार्केट्‌समधील उलाढाल कोट्यावधींनी वाढत असल्याने वॉलमार्टपाठोपाठ ऍमेझॉननेही "रिटेल'कडे मोर्चा वळवला आहे.
 7. ऑनलाईन मंचावर मोठ्या सवलतींच्या दरात वस्तूंची विक्री करण्यात ऍमेझॉनचे वर्चस्व आहे. तर किराणा व्यवसायात वॉलमार्ट अमेरिकेतील बडे प्रस्थ समजले जाते.
 8. "वॉलमार्ट"ने नुकतीच फ्लिपकार्टवर ताबा मिळवत- ई-कॉमर्समधील दावेदारी मजबूत केली होती. या पार्श्वभूमीवर ऍमेझॉनने "मोअर' खरेदी करून रिटेल व्यवसायात धडक दिली आहे.
 9. ऍमेझॉनने सामारा कॅपिटलच्या सहाय्याने "मोअर'ची 4 हजार 200 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. "मोअर"ची देशभरात जवळपास 500 दालने असून त्यावर यापुढे ऍमेझॉन ताबा असेल. पुढील वर्षात आणखी 100 स्टोअर्स सुरू करण्याचा ऍमेझॉनचा मानस आहे.
 10. रिटेल उद्योगाची भरभराट:-
  1. देशात ऑनलाईन ग्रॉसरी (किराणा) व्यवसायाची 2017 मध्ये एक अब्ज डॉलरपर्यंत गेली.
  2. 2020 पर्यंत ती पाच अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे जाणकारांचे मत आहे.


World Bank will give $ 30 billion worth of money

 1. जागतिक बँकेने भारतासोबतच्या महत्त्वाकांक्षी पंचवार्षिक आराखड्यास मंजुरी दिली असून, त्यानुसार बँकेकडून भारताला २५ ते ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे.
 2. यामुळे कनिष्ठ-मध्यम उत्पन्न गटातून उच्च-मध्यम उत्पन्न देशांच्या गटात जायला मदत होईल.
 3. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बँकेने भारतासाठी ‘कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क’ला मंजुरी दिली आहे. भारताला उच्च-मध्यम उत्पन्न देश बनविण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल.
 4. त्याद्वारे भारताला संसाधन कार्यक्षम व एकात्मिक वृद्धी, रोजगारनिर्मिती व मनुष्यबळ भांडवल उभारणी अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील समस्यांवर मार्ग काढता येईल.
 5. या आराखड्यानुसार, विविध आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून भारताला २५ ते ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे.
 6. या वित्तसंस्थांत आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक (आयबीआरडी), आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (आयएफसी) आणि बहुविध गुंतवणूक हमी संस्था (मिगा) यांचा समावेश आहे.
 7. जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागप्रमुख हार्टविग शाफेर यांनी सांगितले की, सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने गेल्या दशकात सर्वाधिक लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढले आहे. भारत २0३0 पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न देश बनेल.
 8. पाच वर्षे एकत्र काम करणार:-
  1. जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की, हा भारतासोबतचा जागतिक बँकेचा पहिला भागीदारी आराखडा आहे.
  2. याअंतर्गत आम्ही पाच वर्षे एकत्र काम करू. गेल्या अनेक दशकांपासून भारताने प्राप्त केलेल्या अतुलनीय वृद्धीची जागतिक बँकेने दखल घेतली आहे. त्यानुसार, हे अर्थसाह्य देण्यात येत आहे.


Survival of the Ayushman Yojana; 10 thousand hospitals network

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी आयुष्यमान योजनेचा उद्या शंख फुंकला जाणार असून जगातील सर्वात मोठी योजना असल्याचे सांगितले जात आहे.
 2. 30 राज्यांतील 445 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात आहे. मोदी रांची येथून या योजनेचे उद्घाटन करतील.
 3. गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.
 4. यासाठी देशातील 10 कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच पुरविण्यात येणार आहे.
 5. या योजनेद्वारे 10 हजार सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी 2.65 लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 6.  यामध्ये केवळ सरकारच्या पॅनलमध्ये सहभागी झालेल्या हॉस्पिटलचा समावेश असणार आहे.


'Mahabiz 2018' business council held in dubai

 1. दिनांक 12 आणि 13 ऑक्टोबर 2018 रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) दुबई शहरात भारताच्या महाराष्ट्र राज्य शासनाची ‘महाबीज 2018’ (MahaBiz 2018) ही परिषद भरविण्यात येणार आहे.
 2. मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेची यावर्षीची ही तिसरी आवृत्ती आहे.
 3. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सरकार आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) प्रदेश यांच्यातर्फे आयोजित केला गेला आहे.
 4. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) प्रदेश हा सहा मध्यपूर्व देशांचा राजकीय आणि आर्थिक समूह आहे.
 5. यात सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात (UAE), कुवैत, ओमान, बहरीन आणि कतार यांचा समावेश आहे.
 6. याची स्थापना 25 मे 1981 रोजी झाली असून रियाध (सौदी अरब) येथे याचे मुख्यालय आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.