Center "Integrated Scheme for the Development of Silk Industry"

 1. “रेशीम उद्योगाच्या विकासासाठी एकात्मिक योजने”ला सन 2017- 18 ते सन 2019-20 या तीन वर्षासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अर्थ विषयक समितीने मंजूरी दिली आहे.
 2. महिला उद्योजकतेला या योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार असून अनुसूचित जाती आणि जमातींना तसेच समाजातल्या इतर दुर्बल घटकांना  चरितार्थ चालवण्याचे साधन मिळणार आहे.
 3. 2020 सालापर्यंत उत्पादक रोजगार 85 लाखांवरून 1 कोटीपर्यंत वाढायला या योजनेमुळे मदत होणार आहे.
 4. निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे:-
  1. 2020 सालापर्यंत रेशीम उत्पादनात स्वयंपूर्णता साध्य करणे.
  2. संशोधन आणि विकास उपक्रमातून रेशीम उत्पादन आणि दर्जा उंचावणे.
  3. सन 2020 पर्यंत 4A ग्रेडचे रेशीम उत्‍पादन तुतीच्या उत्‍पादनाच्या वर्तमान 15% वरून वाढवून 25% करणे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

 1. संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान हस्तांतरण, बियाणे संस्था आणि शेतकरी विस्तार केंद्रे, बियाणे, सुत आणि रेशीम यांसाठी  बाजारपेठ  आणि सहकार्य, दर्जा प्रमाणन यंत्रणा हे या योजनेचे चार भाग आहेत.
 2. योजनेच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालावधीत 2161.68 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 3. सिल्क मार्क (रेशीम चिन्ह) द्वारे दर्जा प्रमाणपत्र माध्यमातून भारतीय रेशीम ब्रॅंडची केवळ देशांतर्गत नव्हे, तर निर्यात बाजारपेठेत  प्रसिद्धी केली  जाईल.
 4. सन 2016-17 मधील 30348 मेट्रिक टन रेशीम उत्पादनांवरून सन 2019-20 पर्यंत 38500 मेट्रिक टनांपर्यंत वाढ करण्याचे लक्ष ठेवून त्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन आणि विकास, बाजारपेठेची  मागणी पूर्ण करण्यासाठी दर्जेदार रेशीम उत्पादनासाठी सुधारित रिलिंग मशीन यासारखे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
 5. सन 2020 पर्यंत आयातीच्या पर्यायी रूपात दरवर्षी 8,500 मेट्रिक टन बायव्होल्टाइन रेशीमचे उत्‍पादन घेतले जाणार आहे.
 6. सन 2019-20 च्या शेवटपर्यंत रेशीमचे उत्‍पादन वर्तमान हेक्टरी 100 किलोग्रामवरून 111 किलोग्रामपर्यंत वाढविण्यासाठी संशोधन व विकास केले जाईल.
 7. रोग-रोधी रेशीम किडे, जीवधारी झाडात सुधारणा, उत्‍पादकता वाढविण्यासंबंधी साधन व रीलिंग आणि सूत कातण्यासाठी सामुग्री आदी संबंधित संशोधन व विकास प्रकल्पांचे कार्य विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी व मनुष्यबळ विकास मंत्रालयांच्या सहकार्याने केले जाणार आहे.
 8. अंडा क्षेत्रांतर्गत अंडा उत्‍पादन सयंत्रांना मजबूत बनवले जाणार, जेणेकरून वाढलेल्या रेशीम उत्‍पादनाचे लक्ष्‍य साध्य करण्यासाठी उत्‍पादकतेला वाढविण्यासोबतच उत्‍पादन नेटवर्कमध्ये गुणवत्‍तापूर्ण मानकांना स्‍थापित केले जाऊ शकणार आहे.
 9. सीड (रेशीम किड्यांचे अंडे) कायद्यांतर्गत नोंदणीची प्रक्रिया आणि अंडा उत्‍पादन केंद्रांद्वारे अहवालाचे प्रस्तुतीकरण, मूलभूत सीड फार्म, विस्‍तार केंद्रांना संकेतस्थळ आधारित सॉफ्टवेयर विकसित करून स्वयंचलीत बनविले जाणार आहे.


Approval of 'Ayushman Bharat - National Health Protection Campaign'

 1. ‘आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान’ या ‘आयुष्मान भारत अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.
 2. ग्रामीण भागात कच्च्या भिंती आणि छप्पर असलेले एकच खोली असलेले घर, 16 ते 59 या वयोगटातला एकही सदस्य नसलेले कुटुंब, अनुसुचित जाती अनुसूचित जमाती कुटुंब, दिव्यांग आणि कुटुंबात शारीरिक सक्षम व्यक्ती नसलेले कुटुंब अशा वेगवेगळ्या श्रेणीतील कुटुंबे तर शहरी भागात 11 श्रेणीतली कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
 3. SECC माहितीवर आधारित गरीब आणि वंचित 10 कोटींहून अधिक कुटुंबाना याचा लाभ मिळणार आहे.
 4. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, राष्ट्रीय पातळीवर ‘आयुष्मान भारत - राष्ट्रीय संरक्षण अभियान संस्था’ कार्यान्वित केली जाईल. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी राज्य आरोग्य संस्थांद्वारे योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 5. या योजनेमुळे दर्जेदार आरोग्य सुविधा आणि औषधोपचार मिळण्यास मदत होणार आहे.
 6. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ज्या आरोग्य गरजा आणि उपचार केले जात नव्हते त्यांना आता आर्थिक पाठबळ मिळेल.
 7. यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने आरोग्य सुधारणा, रुग्णांचे समाधान, कार्यक्षमतेत वाढ आणि रोजगार निर्मिती झाल्याने जीवनमान उंचावण्यासाठी मदत लाभणार आहे.
आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान
 1. अभियानाची वैशिष्ट्ये:-
 2. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लक्ष रुपयांचे आरोग्य कवच दिले जाणार. रुग्णालय पूर्व आणि नंतरचा खर्चही या योजनेत समविष्ट आहे. विशिष्ट वाहतूक खर्चही लाभार्थीला देण्यात येणार आहे.
 3. यामध्ये द्वितीय आणि तृतीय सुविधांचा समावेश आहे. कोणतीही व्यक्ती विशेषतः स्त्री, बालके आणि वृद्ध व्यक्ती वंचित राहू नयेत यासाठी कुटुंबाचा आकार आणि वय यांची मर्यादा ठरविण्यात आलेली नाही.
 4. केंद्र पुरस्कृत सध्याच्या ‘राष्ट्रीय आरोग्य विमा योजना’ आणि ‘जेष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना’ या योजनांना या अभियानात समाविष्ट करण्यात येतील.
 5. संपूर्ण देशात कुठेही हा लाभ घेता येणार आहे. देशातल्या सुचीबद्ध कोणत्याही खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात रोकड रहित या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
 6. लाभार्थी सूचीबद्ध सरकारी किंवा खाजगी रुग्णालयाचा लाभ घेऊ शकतो. ही योजना लागू करणाऱ्या राज्यातली सर्व सरकारी रुग्णालये या योजनेंतर्गत येतील.
 7. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचाराचा खर्च पॅकेज दरानुसार केला जाईल. उपचाराशी सबंधित सर्व खर्चाचा यात समावेश असेल. लाभार्थीसाठी हा रोकड विरहीत आणि कागद विरहीत व्यवहार असेल.
 8. राज्य सरकार या योजनेचा विस्तार करू शकतात, अंमलबजावणीच्या शक्यता निवडण्याचे राज्यांना स्वतंत्र राहणार. राज्य सरकारे, विमा कंपन्या अथवा विश्वस्त/सोसायटी मार्फत थेट याची अंमलबजावणी करू शकतात.
 9. केंद्र आणि राज्य यांच्यातले  सहकार्य गतिमान करण्यासाठी आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण प्रशासकीय मंडळ स्थापण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री याचे अध्यक्ष असतील.
 10. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याकडे राज्य आरोग्य संस्था असणे आवश्यक आहे. विद्यमान ट्रस्ट, राज्य मध्यवर्ती संस्था अथवा नवे ट्रस्ट, सोसायटी स्थापन करण्याचा पर्याय राज्याला खुला असेल.
 11. निधी वेळेत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारकडून राज्य आरोग्य संस्थांना थेट विशिष्ट खात्यात निधी जमा केला जाईल.
 12. NITI आयोगासमवेत भागीदारी करून आधुनिक, प्रमाणित माहिती तंत्रज्ञान व्यासपीठ कार्यान्वित केले जाईल. त्याला तक्रार निवारण यंत्रणेची जोड दिली जाणार आहे.


 Messa, who was put on anganwadi Sevikas, was finally canceled

 1. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
 2. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेसहित विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती.
 3. राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाडय़ा असून या अंगणवाडय़ांमधून २ लाख अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील ७३ लाख बालकांना पोषण आहार दिला जातो.
 4. गेली अनेक वर्षे ५ हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील २ लाख अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीसाठी गेल्या वर्षी संप पुकारला होता.
 5. २६ दिवसाचा या संपानंतर सरकारने त्यांच्या मानधनात १५०० रुपये वाढ केली. त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१८ पासून ५ टक्के मानधनवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.
 6. तथापि ५ टक्केवाढीचा आदेश अद्यापपर्यंत काढण्यात आला नसून सरकारने अंगणवाडय़ांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 7. अंगणवाडी सेविका संपकाळात बाल मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणुन देत राज्य सरकारने त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला होता.
 8. अंगणवाडी सेविका आणि कमर्चाऱ्यांना मेस्मा कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय हा त्यांच्या संप करण्याच्या हक्कावर गदा आणणारा आहे.
 9. त्यामुळे या कायद्यावर सर्व स्तरातून टीका होत होती.


 There is a plan to connect Nepal's Sharda River with Yamuna River

 1. भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करारांतर्गत नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडण्याची योजना भारत आणि नेपाळ आखत आहे.
 2. ही योजना तसेच देशातील प्रमुख पर्यावरण पर्यटन योजनांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
 3. तसेच दिल्लीसह उत्तराखंडला ही या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.
 4. या योजनेमुळे डोंगराळ भागात वीज, पाणी आणि रोजगाराबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही वाढणार आहे.
 5. या योजनेचा आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला असून, त्यावर दोन्ही देशांतील तज्ञांची टीम अध्ययन करते आहे.
 6. दोन दशकांपूर्वी महाकाली पाणी कराराच्या माध्यमातून भारत व नेपाळने शारदा नदीवर पंचेश्वर बांध योजनेचे काम सुरू केले होते.
 7. पंचेश्वर बांध तयार झाल्यानंतर यमुना नदीला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. यमुनेच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीचे पाणी स्वच्छदेखील होणार आहे. त्यामुळे दिल्लीला स्वच्छ पाण्याचा पुरवठाही वाढणार आहे.
 8. ही योजना अस्तित्वात येण्यासाठी जवळपास ३३,१०८ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. त्यातील ६२.३ टक्के खर्च भारत देणार असून, उर्वरित खर्च नेपाळ करणार आहे.
 9. यामुळे ५,०५० मेगावॉट विजेचे उत्पादन होणार आहे. तसेच ४.३ लाख हेक्टर क्षेत्रही ओलिताखाली येणार आहे.
 10. भारतातल्या जवळपास २.६ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.


 Poetry Kusumagraj Poetry Award 2018

 1. ज्येष्ठ कवी-विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा प्रतिष्ठेचा कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 2. अकरा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 3. मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
 4. १९६० पासून डॉ. मनोहर हे गंभीर कवितालेखन करीत आहेत. त्यांच्या उत्थानगुंफा, काव्यभिमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगांतर, युगमुद्रा, बाबासाहेब! हे दहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 
 5. 'तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता' हा त्यांचा अकरावा कवितासंग्रह लवकरच येत आहे. 
 6. 'उत्थानगुंफा'ला राज्य शासनाचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार लाभला. जीवनायन' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र फाऊन्डेशन, पद्मश्री विखे पाटील, इंदिरा संत काव्यपुरस्कार मिळाले. 
 7. स्वप्नसंहिता या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत काव्यपुरस्कार मिळाला आहे.
 8. याशिवाय मारवाडी फाऊन्डेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दिवकरराव जवळकर, सुगावा, गवळी प्रतिष्ठान आदी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
 9. त्यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. 
 10. कुसुमाग्रज पुरस्कार निवड समितीत अनुराधा पाटील, आसाराम लोमटे आणि श्रीधर नांदेडकर यांना समावेश होता.


 The year 2018 is the "National Year of Jowar-Bazari": Government of India

 1. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी 22 मार्चला सन 2018 हे “ज्वारी-बाजरीचे राष्ट्रीय वर्ष (National Year of Millets)” घोषित केले आहे.
 2. पोषणविषयक गरजा आणि सुरक्षा साध्य करण्यासाठी एक अभियान म्हणून ज्वारी, रागी व बाजरी यासारख्या धान्यांची लागवड करण्यास भारत सरकार प्रोत्साहन देत आहे.
 3. यावर्षी कडधान्य योग्य दरात खरेदी केले जाणारआहे.
 4. त्यांचा ‘मध्यान्ह भोजन’ योजनेत तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (PDS) समावेश करण्यात येत आहे.


The Importance of Today's Day in History 23 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
  2. १६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
  3. १८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.
  4. १९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
  5. १९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
 2. जन्म:-
जन्म
 1. १९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै१९७१)
 2. १९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)
 3. १९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.
 4. १९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०)
 2. १८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)
 3. १९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)
 4. २००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी१९१३)


Top

Whoops, looks like something went wrong.