डेविड ग्रासमन यांना मॅन बुकर पुरस्कार

 1. १४ जून २०१७ रोजी मॅन बुकर फाउंडेशनकडून लंडन (ब्रिटन) येथे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार डेविड ग्रासमन यांना दिला गेला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले इस्रायली लेखक आहेत.
 2. डेविड ग्रासमन यांना हा पुरस्कार ‘ए हॉर्स वॉक्स इनटू ए बार’ (A Horse Walks into a Bar) या कांदबरीसाठी दिला गेला.
 3. या कांदबरीचे अनुवादक जेसिका कोहेन (अमेरिका) आणि प्रकाशक जोनाथन केप आहेत. लेखक आणि अनुवादक या दोघाना प्रत्येकी २५,००० पौंड अशी पुरस्काराची रक्कम विभागून देण्यात आली

मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१७साठी निवड झालेल्या इतर कांदबऱ्या :-

 1. कम्पास (Compass) ( लेखक: मेथियॉस एनार्ड (फ्रांस))
 2. द अनसीन (The Unseen) (लेखक: रॉय जैकबसन (नॉर्वे))
 3. मिरर, शोल्डर, सिग्नल (Mirror, Shoulder, Signal) (लेखक: डॉर्थी नॉर्स (डेनमार्क))
 4. जुडॉस (Judas) (लेखक: अमोस ओज (इस्राइल))
 5. फीवर ड्रीम (Fever Dream) (लेखक: सामंता श्वेबलिन (अर्जेंटीना))

मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार:-

 1. जागतिक स्तरावर सृजनात्मक लेखन करणाऱ्या लेखक व लेखिकेचा गौरव करण्यासाठी २००५ सालापासून दर २ वर्षानी हा पुरस्कार देण्यात येतो.
 2. २०१६ या वर्षापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार लेखकाबरोबरच त्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादकालाही देण्यात येतो.
 3. २०१६ मध्ये हा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या हॉन-कांग यांना द वेजेटेरियन (The Vegetarian) या पुस्तकासाठी दिला गेला होता.
 4. या पुस्तकाचे अनुवादक डेबोराह स्मिथ हे होते.


NFS कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिशानिर्देशकांना रद्द करण्यास न्यायालयाची मान्यता

 1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा (NFS) कायदा, 2013 अंतर्गत असलेल्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असलेल्या दिशानिर्देशकांना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे.
 2. निर्देशकांचे पालन ही एक किचकट बाब असल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.
 3. न्या. मदन बी. लोकुर आणि एन. व्ही. रामन यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव यांना 31 ऑगस्टपर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित सचिवांसह बैठका घेण्यास सूचित केले.

न्यायालयाने सुचविलेल्या शिफारसी:-

 1. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत कायद्याची अंमलबजावणी सध्याच्या नियमांनुसार करणे आवश्यक आहे.
 2. कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेसाठी उचित नियम सुचविण्यासाठी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाला सूचित करण्यात आले आहे.
 3. जिल्हा तक्रार निवारण अधिकारीच्या नियुक्तीसाठी विचार करावा.
 4. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वर्षाच्या अखेरपर्यंत कायद्याअंतर्गत पूर्णतः कार्यरत राज्य अन्न आयोग स्थापन करण्यास निर्देश द्यावे.
 5. वार्षिक अहवाल तयार करण्यासह राज्य अन्न आयोगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कर्मचारी पुरविण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्याची राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी खात्री करावी.
 6. कायद्यांन्वये कर्तव्ये आणि जबाबदार्या निभावण्यासाठी वरशाच्या अखेरपर्यंत कायद्याच्या कलम 29 अन्वये प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनांना दक्षता समिती स्थापन करण्यास आग्रह करावा.
 7. सामाजिक अंकेक्षण यंत्रणा कायद्यानुसार ठरवली जाण्याचे सुनिश्चित करावे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा:-

 1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अमंलबजावणी देशात 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात येत आहे.
 2. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये सवलतीच्या दराने नागरिकांना हक्काचे अन्नधान्य मिळत आहे.
 3. पात्र लाभार्थ्यांमध्ये सध्याच्या अंत्योदय अन्न योजनेचे व दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थ्यांचा समावेश आहे.


प्रसिध्द गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन

 1. फिल्डस मेडल हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला व प्रसिध्द इराणी-अमेरिकन गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन झाले.
 2. स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
 3. मिर्झाखानी यांचे १४ जुलै २०१७ रोजी ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.
 4. मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला.
 5. हॉर्वर्ड विद्यापीठाने २००४ मध्ये त्यांना पीएचडी प्रदान केली होती.
 6. त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ऑलंपियाडमध्ये २ सुवर्ण पदकांनी गौरवण्यात आले होते.
 7. १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिर्झाखानी गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जाणाऱ्या फिल्ड्स मेडल या सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
 8. भौमितिक व गतिकी प्रणालीच्या संशोधनासाठी कोरियात सेऊल येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमेटिशियन्स या अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 9. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला (एकमेव) आणि पहिल्या इराणी नागरिक आहेत.

फिल्ड्स मेडल:-

 1. फिल्ड्स मेडल गणितातले संशोधन आणि त्या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दिले जाते.
 2. गणितातले नोबेल अशी या पुरस्काराची ओळख असून १९३६पासून ते प्रदान केले जातात. आतापर्यंत ५२ गणितज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे.
 3. यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे असून दर ४ वर्षानी दोन, तीन अथवा चार गणितज्ञांना हे पुरस्कार जाहीर केले जातात.
 4. भारतीय वंशाच्या डॉ. मंजूल भार्गव यांनी २०१४ मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहेत.


पाकिस्तान दहशतवाद्यांचा आश्रयदाता

 1. अमेरिकी परराष्ट्र खात्याने प्रकाशित केलेल्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात पाकिस्तानचा समावेश दहशतवाद्यांच्या आश्रयदाता देशांच्या यादीत करण्यात आला आहे.
 2. पाकिस्तान व्यातिरिक्त अफगाणिस्तान, सोमालिया, विस्तीर्ण सहारा, सुलू, सुलावेसी, दक्षिण फिलिपिन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लिबिया, येमेन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे देशही दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत आहेत.

अहवालातील ठळक मुद्दे:-

 1. २०१६मध्ये पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांनी मोठय़ा प्रमाणात प्रशिक्षण शिबिरे चालवली, तसेच विविध मार्गानी निधीसंकलनही केले पाकिस्तानातील सरकारने मात्र त्याकडे सोयिस्करपणे डोळेझाक केली.
 2. पाकिस्तानने अफगाण तालिबान किंवा हक्कानी गटाविरोधात परिणामकारक कारवाई करण्यास टाळाटाळ केली.
 3. पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा वर बंदी घातली असली तरी जमात-उद-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांच्या माध्यमातून ही संघटना आपला निधीसंकलनाचा उपक्रम राबवत आहे.
 4. लष्कर आणि जैश या दोन्ही संघटनांनी भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या असून २०१६मध्ये पठाणकोट आणि उरी या ठिकाणी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत या संघटनांचा सहभाग होता.
 5. लष्करचा म्होरक्या हाफीज सईद याच्या कारवायांकडेही पाकिस्तानी सरकारने काणाडोळा केला आहे.
 6. पाकिस्तानी लष्कराने तेहरीक-ए-तालिबानसारख्या संघटनांवर कारवाई केली, परंतु त्याला मर्यादित स्वरूप होते.
 7. अल कायदा, आयसिस, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमची डी-कंपनी यांच्याविरोधात संयुक्तपणे लढा देण्याचा भारत आणि अमेरिकेचा निर्धार असून त्यासाठी अमेरिका सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.


चीनने तिबेटमध्ये पाठवली लष्करी सामुग्री

 1. सिक्कीम जवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीनने तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.
 2. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी भर पडणार आहे.
 3. पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे.
 4. पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते.
 5. चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नथू-ला खिंडीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे.
 6. चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून ७०० किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात.
 7. डोकलाम भाग भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर आहे.
 8. भूतानमध्ये येणारे डोक्लाम म्हणजे आपल्या डोंगलाँग प्रांताचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे.
 9. त्यामुळे येथे भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय सैन्य मागे हटायला तयार नसल्याने चीनकडून युद्धाची भाषा केली जात आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.