PM KISSAN SAMMAN YOJNA

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे 75 हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ होणार आहे. जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार


 2. रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

  त्यानंतर आणखी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवसांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

 3. केंद्र सरकारने 2019-20 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सदर योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टर जमीन असलेल्या 12 कोटी छोटय़ा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हप्त्यांत वर्षांला सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते.

 4. तर सदर योजना चालू आर्थिक वर्षांपासून अमलात आणण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता मार्चपूर्वीच मिळणार आहे.

 5. तसेच उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह 14 राज्यांमधील शेतकऱ्यांना आज पहिला हप्ता मिळणार आहे.


APURVI CHANDELA SHOOTER


 1. नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

  तर अपुर्वीने 252.9 गुणांसहीत केला विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

 2. तसेच दोन फेऱ्या शिल्लक असताना 0.8 गुणांची आघाडी घेतली होती. चिनच्या झाओ रौझोने त्यानंतर 10.5 चा निशाणा साधला, परंतु अपुर्वीने त्याला 10.8च्या निशाण्याने प्रत्युत्तर देताना आघाडी 1.1 अशी वाढवली.

 3. अखेरच्या फेरीत अपुर्वीने 10.5 गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला.

 4. तर तिनो झाओच्या नावावर असलेला विक्रम मोडताना भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.


SURESH RAINA

 1. भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना याचे वर्ल्ड कप संघातील पुनरागमनाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.


 2. मात्र, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धुमाकूळ घालण्यासाठी रैना सज्ज आहे आणि त्याने त्याची झलक

  सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात दाखवून दिली.

 3. तसेच त्याने 35 चेंडूंत नाबाद 54 धावा करताना उत्तर प्रदेश संघाला सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 मालिकेत इ गटात हैदराबादविरुद्ध सहा विकेट राखून विजय मिळवून दिला आहे.


 4.  खेचणारा रैना दुसरा300 षटकारतर रैनाने या सामन्यात एक भीमकाय पराक्रम केला. त्याने ट्वेंटी-20 क्रिकेट कारकिर्दीत 300 षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. सिक्सर किंग रोहित शर्मा याच्यानंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 

  भारतीय फलंदाज ठरला आहे.


DIN VISHESH

 1. 24 फेब्रुवारी 1670 मध्ये राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.

 2. जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे 24 फेब्रुवारी 1822 मध्ये उद्‍घाटन झाले.

 3. इस्टोनिया देशाला 24 फेब्रुवारी 1918 मध्ये रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

 4. 24 फेब्रुवारी 1920 मध्ये नाझी पार्टीची स्थापना झाली.

 5. व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण 24 फेब्रुवारी 1942 मध्ये सुरू झाले.

 6. कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात 24 फेब्रुवारी 1952 मध्ये झाली.

 7. 24 फेब्रुवारी 1961 मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.


Top

Whoops, looks like something went wrong.