Six MoUs to strengthen Indo-Canada bilateral relations

 1. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून कॅनडाचे पंतप्रधान डॉ. जस्टीन ट्रूडो हे आपल्या प्रतिनिधीमंडळासोबत 18-24 फेब्रुवारी 2018 या काळात भारत दौर्‍यावर आले आहेत.
 2. जस्टीन ट्रूडो यांनी यापूर्वी 1983 साली तत्कालीन पंतप्रधान पियर ट्रूडो (त्यांचे वडील) यांच्यासमवेत भारताचा दौरा केला होता.
 3. दौर्‍यादरम्यान झालेल्या द्विपक्षीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली गेली.
 4. बैठकीमध्ये दहशतवाद आणि अतिरेकी करवायांच्या समस्येसंदर्भात विविध मुद्दे तसेच व्यापार, शिक्षण आणि संरक्षण यांच्यातील संबंध दृढ करण्यावर सहमती दर्शविण्यात आली.
 5.  भारत-कॅनडा द्विपक्षीय सहा सामंजस्य करार:- 
  1. माहिती, संपर्क तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  2. भारत-कॅनडा मंत्रीस्तरीय ऊर्जा संवाद यासाठी संदर्भांकीत अटी
  3. क्रीडा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  4. बौद्धिक संपदा अधिकार क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  5. उच्च शिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  6. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
 6. दहशतवादाविरोधात सहकार्यासंबंधी कार्यचौकट:-
  1. बैठकीत दोन्ही देशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था आणि सुरक्षा संस्था यांच्यातील चालू सहकार्याचा आढावा घेतला गेला आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे संवाद मंडळाच्या पर्यवेक्षणाखाली आपल्या द्विपक्षीय सहकार्याचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे संवाद हे दहशतवादाविरोधातील एक संयुक्त कार्यदल आहे.
  2. यासंदर्भात आराखडीत कार्यचौकटीत भारत आणि कॅनड यांच्या दरम्यान संस्थात्मक सहकार्य व्यवस्था आणि दोन्ही देशांदरम्यान नियमित विनिमय आणि समन्वय साधणे. यासाठी संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संवाद मंडळाकडून मार्गदर्शन लाभणार.

दोन्ही देशांकडून मान्य करण्यात आलेल्या बाबी

 1. शांती स्थापनेच्या क्षेत्रात सहकार्य बळकट करण्यासोबतच तिसर्‍या देशांमध्ये क्षमता बांधणी या विषयावरही विशेष लक्ष देण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.
 2. दोन्ही देशांनी सौर तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दोन्ही देशात संशोधन संस्था आणि उद्योग यासाठी आग्रह केला.
 3. नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी त्यांनी एकत्र काम करण्याचे मान्य केले. दीर्घकालीन गुंतवणूक आणि स्वच्छ तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेसाठी प्रदर्शी व अंदाजित संकेत प्रदान करण्याविषयी महत्त्वाला मान्य केले आणि परवडणारी, विश्वसनीय आणि आधुनिक ऊर्जा सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश निश्चित करण्यासाठी जागतिक पातळीवर काम करण्याचे मान्य केले.
 4. दोन्ही देशांनी कॅनडा-इंडिया मंत्रीस्तरीय ऊर्जा संवाद मंडळाचा विस्तार करण्यासाठी वीज, ऊर्जा कार्यक्षमता आणि नवीकरणीय उत्पादने यांचा समावेश करण्यात सहमती दर्शवली आणि सन 2018 मध्ये कॅनडात याची चौथी बैठक आयोजित करण्यास मान्यता दिली.
 5. दोन्ही देशांनी स्त्रिया, मुली आणि लहान मुलांवरील सर्व प्रकारचा हिंसाचार आणि शोषण याविरोधात लढण्याकरिता असलेल्या वचनबद्धतेवर जोर दिला.
 6. दोन्ही देशांनी सायबर सुरक्षा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याचे मान्य केले.
 7. दोन्ही देशांनी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ देण्याच्या लाभाबाबतही सहमती दर्शवली तसेच शैक्षणिक संस्था आणि वैचारिक संस्था यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे मान्य केले.


The child is still born with lethal conditions in poor countries: UNICEF

 1. UNICEF ने नवजाताचा मृत्युदर याविषयी प्रसिद्ध केलेल्या 'एव्हरी चाइल्ड अलाइव्ह' अहवालानुसार, जगातल्या सर्वाधिक दरिद्री देशांमध्ये जन्माला आलेले बाळ, त्यामध्ये सर्वाधिक आफ्रिकेत, आजही मृत्युच्या "अत्याधिक चिंताजनक" धोक्यांचा सामना करत आहे. हे धोके सर्वात श्रीमंत देशाच्या तुलनेत 50 पटीने अधिक असू शकते.
 2. जगभरात दरवर्षी 10 लाख नवजात बालकांचा त्याच्या जन्माच्या पाहिल्याच दिवशी मृत्युमुखी पडतो.
ठळक बाबी
 1. जपान, आइसलँड आणि सिंगापुर या देशांना जन्मासाठी सर्वात सुरक्षित देश ठरविण्यात आले आहे, जेथे जन्माला आलेल्या पहिल्या 28 दिवसांमध्ये प्रत्येक हजार बाळांमध्ये मृत्युचे केवळ एक प्रकरण समोर येते.
 2. नवजात मृत्युदरात सर्वाधिक कमतरता जपानमध्ये आहे. त्यानंतर आइसलँड, सिंगापुर, फिनलँड, एस्टोनिया, स्लोवेनिया, सायप्रस, बेलारूस, दक्षिण कोरिया, नार्वे आणि लेक्समबर्ग या देशांचा क्रमांक लागतो. या देशांमध्ये प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची संख्या अपेक्षेत अधिक आहे.
 3. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सरासरी नवजात मृत्युदर प्रत्येक हजार जन्मामध्ये 3 एवढा आहे, तर कमी उत्पन्न श्रेणीतील देशांमध्ये हे प्रमाण 27 एवढे आहे.
 4. जपान, आइसलँड आणि सिंगापुर या देशांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या वाचण्याच्या संधी अधिक असतात, जेव्हा की पाकिस्तान, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक आणि अफगानिस्तान या देशांमधली परिस्थिती अगदी उलट आहे.
 5. सन 2016 मध्ये भारतात प्रत्येक 1,000 जिवंत जन्मांमध्ये नवजात मृत्युदर 25.4 होता. श्रीलंकेत हा दर 127, बांग्लादेशात 54, नेपाळमध्ये 50, भुटानमध्ये 60 आणि पाकिस्तानमध्ये 45.6 असा होता.
 6. बांग्लादेश, इथियोपिया, गिनी-बिसाऊ, भारत, इंडोनेशिया, मालावी, माली, नायजेरिया, पाकिस्तान आणि टांजानिया या देशांना बाळाच्या जन्मावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार्‍या देशांमध्ये ठेवण्यात आले आहे. या दहा देशांमध्ये जगभरात नवजात बाळांच्या मृत्युची अर्ध्याहून अधिक प्रकरणे समोर येतात.
 7. 184 देशांमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, 80% बाळांच्या मृत्युचे कारण कोणतेही गंभीर बिमारी नसते. बहुतेक बाळांच्या मृत्युचे कारण म्हणजे वेळेआधी जन्म, प्रसव दरम्यान जटिलता, बिमारीला योग्यरित्या प्रतिबंध न झाल्यास आणि न्यूमोनिया होणे.
 8. माता आणि बाळाला चांगल्या सुविधा देऊन मृत्युदर कमी करता येऊ शकतो. यामध्ये स्वच्छ पाणी, जन्माच्या पहिल्या तासात स्तनपान, माता-बाळ यांचा संपर्क अश्या बाबी आवश्यक ठरतात. जन्मानंतर 28 दिवस नवजाताच्या जिवंत राहण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवतात.
 9. सर्वाधिक मृत्युदर असणार्‍या 10 देशांमध्ये आफ्रिकेमधील आठ देश आणि दोन दक्षिण आशियामधील देशांचा समावेश आहे.
 10. या 10 देशांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर मध्य आफ्रिका प्रजासत्ताक तर अफगानिस्तान आणि सोमालिया अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
 11. या देशांमध्ये संघर्ष, नैसर्गिक आपत्ती, अस्थिरता आणि कुशासन या सारख्या समस्यांचा प्रभाव आरोग्य प्रणालीवर नेहमीच पडतो आणि धोरण निर्माता प्रभावी धोरण तयार करण्यास अपयशी ठरलेत.
 12. जगभरात जवळजवळ 26 लक्ष बाळांचा जन्म एका महीन्याच्या आत होतो. तर जवळजवळ 26 लक्ष बाळांचा जन्मच मृत होतो. जगभरात दररोज जवळजवळ 7000 नवजातांचा मृत्यू होतो.
 13. त्यामध्ये 80% प्रकरणे प्रशिक्षित डॉक्टर, परिचारक यांच्यामार्फत स्वस्त, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा प्रदान करून, प्रसवाआधी माता आणि प्रसवानंतर बाळाचे पोषण, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत उपाययोजनांनी बाळाचे जीवन वाचवले जाऊ शकते.

 

अहवालात भारत
 1. सन 2016 मधील आकड्यांचा तुलनेत पाहता नवजात मृत्युदरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
 2. भारतात मागील वर्षात 6,40,000 नवजातांचा मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. हा नवजात मृत्युदर प्रत्येक हजारामध्ये 25.4 एवढा होता.
 3. याप्रमाणे जगभरात जन्म झाल्यानंतरचा काही काळ किंवा दिवसांमध्ये मृत्युचे प्रमाण 24% एवढे होते. आकड्यांनुसार याबाबतीत पाकिस्तान दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 4. कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये नवजात मृत्युदरात पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे.
 5. भारत यामध्ये 12 वा आहे. मात्र केनिया, बांग्लादेश, भुटान, मोरक्को आणि कांगो हे देश या बाबतीत भारत आणि पाकिस्तानहून अधिक चांगल्या स्थितीत आहेत.


Vaccination will be mandatory for admission to the school in Kerala

 1. केरळ राज्य शासनाने नव्या आरोग्य धोरणाचा मसुदा सादर केला, ज्यामध्ये शाळेमधील मुलांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रस्तुत करणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे.
 2. तसेच उच्च प्राथमिक पातळीच्या शाळांमध्ये नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि सॅनेटरी निर्वासन सुविधा असणे अनिवार्य होणार आहे.
 3. नवे धोरण पुढील सत्रापासून लागू करण्याचे नियोजित आहे.
अन्य महत्वपूर्ण बाबी
 1. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये ट्रान्सजेन्डर वैद्यकीय केंद्रे उभारण्यात येतील.
 2. केरळमधील 2% लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत आणि 12.8% मुले मानसिक विकारांचा सामना करत आहेत आणि त्यामुळे सरकारी क्षेत्रातील सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये मानसिक रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा केंद्रांची संख्या वाढवण्यात येतील.
 3. प्रतिजैविकविषयक धोरण तयार करण्यासाठी एक प्रतिजैविक दिशानिर्देशक समिती स्थापन केली जाईल.
 4. नवा केरळ सार्वजनिक आरोग्य कायदा तयार केला जाणार. जैव-वैद्यकीय कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी एक मध्यवर्ती बायोमेडिकल कचरा उपचार आणि विल्हेवाट व्यवस्था उभारली जाईल.
 5. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर 10 किमीच्या अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येतील.
 6. अखिल केरळ कर्करोग नोंदणी तयार केली जाईल. वैद्यकीय निदान व तंत्रज्ञान मंडळ स्थापन केले जाईल. 


India has hosted the first International Solar Combine Conference

 1. भारतात 11 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) च्या प्रथम शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.
 2. ठिकाण:- दिल्ली.
 3. या परिषदेत 121 प्रकल्पांना करारबद्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, जे दोन टप्प्यांत केले जाऊ शकते.
 4. पहिला टप्पा11 मार्चला 50
 5. दूसरा टप्पा 20 एप्रिलला अन्य 71 करार होण्याचे अपेक्षित आहे.
आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA)
 1. पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
 2. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे.
 3. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. ISA 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे.
 5. आतापर्यंत 19 देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि 48 देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.


American women win Ice Hockey Olympics gold

 1. अमेरिकेच्या महिला आइस हॉकी संघाने 9-25 फेब्रुवारी या काळात IOC च्या वतीने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलंपिक 2018 मध्ये आइस हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.
 2. अमेरिकेच्या संघाने 20 वर्षांमध्ये प्रथमच महिला आइस हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकलेले आहे.
 3. अंतिम लढतीत अमेरिकेने कॅनडाचा पराभव केला.
 4. आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे.
 5. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे.
 6. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
 7. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.


Arun Sanyal and Parthik Naidu nominated Science Award

 1. अरुण जे सन्याल आणि पार्थिक नायडू या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 2. जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या एकूण सहाजणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 3. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी २०१८च्या आऊटस्टॅंडिग स्टेम (STEM) पुरस्कारांसाठी ही नावे निवडली आहेत.
 4. स्टेम (STEM) म्हणजेच, विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics).
 5. पुरस्कारासाठी निवड झालेल्या सन्याल यांनी यकृत रोग निदान आणि उपचार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले आहेत.
 6. सन्याल हे ‘फॅटी लिव्हर डिजिसेस’ (NASH)मधील तंत्र आणि त्याचे परिणाम यावर आणि मेटॅबोलिक सिंड्रोमची वाढती व्याप्ती आणि जागतिक परिणामांची ओळख करण्याचे निरीक्षण करत आहेत.
 7. या निरीक्षणाबद्दल यापूर्वी त्यांची व्हर्जिनियातील ‘आऊटस्टँडिंग साइंटिस्ट’ या पुरस्कासाठीही निवड करण्यात आली आहे.
 8. स्टँडफर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या १८ वर्षीय पार्थिक नायडूने कर्करोगाच्या ३-डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे.
 9. हे सॉफ्टवेअर सध्या वापरात असलेल्या उपकरणांपेक्षा कर्करोगजन्य डीएनएच्या जैव पध्दतींचे वेगवान, कमी खर्चिक आणि अचूक विश्लेषण करते.
 10. या संशोधनाबद्दल त्याची स्टेम आऊटस्टँडिंग पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पार्थिक सध्या कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.


Top