ravina tondon appointed as brand ambassador of sanjay gandhi national park

 

  1. हिंदी चित्रपट अभिनेत्री रविना टंडन यांना मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  2.  मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 274 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात.
  3. तेथे प्राण्यांच्या 35 आणि वनस्पतींच्या 1100 पेक्षा अधिक प्रजाती आहेत.


zulan goswami has declared retirement from international t 20 cricket

  1. भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
  2. झुलनने आतापर्यंत 68 टी-20, 168 वन-डे आणि 10 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
  3. भारतीय संघाची सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून झुलन गोस्वामीची ओळख होती. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना झुलनने, बीसीसीआय व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत. 
  4. महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात झुलनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे.
  5. 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकातही झुलनने महत्वाची कामगिरी बजावली होती. 
  6. 2007 साली झुलनने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कारही पटकावला होता. याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यासारखे मानाचे पुरस्कार झुलन गोस्वामीच्या खात्यात आहेत.


Top