MoU between AYUSH Ministry and CSIR to promote traditional medicines

 1. पारंपरिक वैद्यकीय पद्धती आणि आधुनिक विज्ञानाशी त्याचे एकात्मिकरण या क्षेत्रात संशोधन आणि शिक्षणात सहकार्यासाठी भारत सरकारचे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR, नवी दिल्ली) यांच्यादरम्यान सामंजस्य करार झाला आहे.
 2. ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (TKDL) मंचाद्वारे भारतीय वैद्यकीय पद्धतींविषयीच्या पारंपारिक ज्ञानाचे जतन आणि संरक्षण करण्यात सहकार्य करणे.
 3. आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय मानदंड तयार करणे; औषधी वनस्पती, अन्नपदार्थांसंबंधी माहिती गोळा करणे, अशी विविध कार्ये या कराराच्या माध्यमातून केली जातील.
 4. AYUSH मंत्रालय:-
  1. भारतात औषधोपचार क्षेत्रात पारंपरिक वैद्यकीय पद्धतींचा विकास, शिक्षण आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने दिनांक 9 नोव्हेंबर 2014 रोजी स्थापन करण्यात आलेले आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालय ही एक सरकारी संस्था आहे.
 5. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR):-
  1. ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनात्मक कार्ये करणारी एक स्वायत्त संस्था आहे.
  2. त्याची स्थापना दिनांक 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली.
  3. त्याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 प्रादेशिक केंद्रे आहेत.


'RTS, S': The world's first vaccine on malaria

 1. मलावीत मलेरियावरची जगातली पहिली लस उपलब्ध झाली
 2. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) मलेरियावर तयार करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या लसीला मान्यता दिली आहे.
 3. आफ्रिका खंडाच्या मलावी या देशात ती लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 4. या लसीला ‘RTS,S’ हे नाव देण्यात आले आहे.
 5. मलावीत ही लस प्रायोगिक तत्वावर दोन वर्षाखालील मुला-मुलींना दिली जात आहे.
 6. या लसीमुळे हजारो जीव मलेरिया या आजारापासून सुरक्षित ठेवण्याचे अपेक्षित आहे.
 7. मलेरिया हा ‘प्लाझमोडियम' या जातीच्या डासांच्या चावण्यामुळे होणारा आजार आहे.
 8. ‘प्लाझमोडियम वायवॅक्स’ या विषाणूमुळे हा आजार होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागात जास्त आहे. मलेरिया हा मृत्यूस कारणीभूत ठरणारा जगभरातला प्रमुख आजार आहे.
 9. या आजारामुळे दर दोन मिनिटाला एक मृत्यू होतो.
 10. आफ्रिकेत दरवर्षी या आजाराने 250,000 पेक्षा जास्त जीव जातात आणि जगभरात दरवर्षी 4,35,000 लोक मरतात.


Tripura celebrates 'Garia' festival

 1. त्रिपुरा राज्यात दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी गारिया सणाचा शुभारंभ करण्यात आला.
 2. गारिया नृत्याचे याप्रसंगी प्रदर्शन केले गेले आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 3. गारिया हा त्रिपुरी आणि इतर काही काकबोरोक भाषा बोलणार्‍या समुदायाकडून साजरा केला जाणारा एक सण आहे.
 4. वैशाख महिन्याच्या (म्हणजेच एप्रिल महिन्यात) सातव्या दिवशी हा सण आयोजित केला जातो.


The United States will impose restrictions on Iran because it does not stop import of crude oil from Iran

 1. इराणकडून कच्च्या तेलाची आयात न थांबविल्यामुळे अमेरिकेच्या सरकारने भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, तैवान, ग्रीस आणि इटली या देशांवर पुन्हा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. अण्वस्त्र कार्यक्रम न थांबवल्यामुळे अमेरिकेनी इराणवर 2015 साली आर्थिक निर्बंध लादले.
 3. त्याचबरोबर इराणची कोंडी करण्यासाठी इराणकडून तेल आयात थांबवावी, असे 2018 साली आठ देशांना बजावले होते. थेट निर्बंध न लादता आयातदार देशांना 180 दिवसांची सुट दिली होती.
 4. ही मुदतवाढ आता 2 मे 2019 रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेनी ताठर भूमिका घेत इराणकडून तेल आयात न करण्याचे निर्बंध लादले आहेत.
 5. अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे आता या आठ देशांना इराणऐवजी सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशांचा पर्याय आहे.
 6. त्याचबरोबर अमेरिकाही आता तेल उत्पादन क्षेत्रात उतरल्यामुळे अमेरिकेनेही तेल आयातीसाठी अमेरिका, सौदी अरब आणि UAE असे तीन पर्याय या देशांसमोर ठेवले आहेत.
 7. भारत हे इराण, इराक आणि सौदी अरबकडून तेल आयात करते. त्यात इराण हा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे.


The United Patrol guards will be deployed on the Iran-Pakistan border

 1. सीमा सामायिक करणार्‍या पाकिस्तान आणि इराण या दोन शेजारी देशांनी सीमेवर होणार्‍या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक संयुक्त सीमा सुरक्षा दल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांना भुसुरुंगाने उडवण्यात आले.
 3. तसेच पाकिस्तानाच्या जैश अल-अदल या दहशतवादी गटाने किमान 27 इराणी सैनिकांना मारले. अश्या विविध घटना सीमेवर घडत आहेत. त्या रोखण्यासाठी हा निर्णय घेतला गेला.
 4. इराण हा मध्यपूर्व प्रदेशातला एक देश आहे.
 5. या देशाची राजधानी ‎तेहरान हे शहर आहे.
 6. या देशात अधिकृत भाषा म्हणून ‎फारसी वापरली जाते. इराणी रियाल हे या देशाचे राष्ट्रीय चलन आहे.
 7. पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे.
 8. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत.
 9. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
 10. हा देश इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचा (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना/OIC) जनक राष्ट्र आहे.


Definition of $ 5 billion with a higher premium for another dollar for the RBI dollar swap bid

 1. भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) त्याच्या दुसर्‍या डॉलर-रुपया स्वॅप लिलावासाठी अपेक्षित प्रीमियमपेक्षा अधिक दरासह एक मर्यादा निश्चित केली आहे.
 2. तीन वर्षांसाठी खरेदी-विक्री स्वॅप लिलावासाठी हा प्रीमियम 8.38 रुपये एवढा निश्चित केला आहे. प्रीमियम 7.80 रुपये एवढा असावा असे अपेक्षित होते.
 3. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डॉलर-रुपया स्वॅपच्या दुसर्‍या लिलावात त्याच्या पाच अब्ज डॉलरच्या निश्चित लिलावाच्या तुलनेत तीन पट अधिक बोली लावण्यात आली आहे.
 4. याप्रकाराच्या दुसर्‍या लिलावात RBI ला पाच अब्ज डॉलरच्या तुलनेत 18.65 अब्ज डॉलरचे योगदान मिळाले आहे.
 5. याआधी RBI ने 26 मार्चला याप्रकारचा लिलाव झाला होता. बाजारात रोख संदर्भातली तफावत भरून काढण्यासाठी RBI या प्रक्रियेची मदत घेते,
 6. ज्यामध्ये ते बँकांकडून तीन वर्षासाठी डॉलर खरेदी करतात आणि त्याबदल्यात त्यांना  रुपये देतात.
 7. जागतिक बाजारपेठेत रुपयाची किंमत वधारण्यासाठी अश्याप्रकारचे पाऊल उचलले गेले आहे. 


Top

Whoops, looks like something went wrong.