Expansion of restrictions on Russia increased

 1. अमेरिकेने रशियावरील दबाव वाढविताना, आणखी निर्बंध जारी केले आहेत.
 2. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्बंधांच्या कार्यकारी आदेशावर सही करत, निर्बंधांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
 3. रशियाने या निर्बंधांवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, अमेरिका आगीशी खेळत असल्याचे म्हटले आहे. तर, अमेरिकेने चीनलाही रशियाकडून शस्त्रास्त्रे विकत घेण्याविषयी इशारा दिल्यामुळे, चीननेही अमेरिकेवर टीका केली आहे.
 4. रशियाकडून लढाऊ विमाने व हवाई संरक्षण यंत्रणेच्या खरेदीमुळे या निर्बंधांमध्ये चीनवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
 5. अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव काही महिन्यांपासून कायम आहे.
 6. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आणि सायबर हल्ले केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. तर, रशियाने या आरोपांचा इन्कार केला आहे.
 7. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या २०१७च्या अमेरिकेच्या शत्रूंवरील निर्बंध कायद्यानुसार (सीएएटीएसए) ट्रम्प यांनी हा आदेश काढला आहे.
 8. या आदेशानुसार, अर्थ मंत्रालयाला परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लामसलतीनंतर आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा आणि 'सीएएटीएसए' या कायद्यांनुसार रशियावर निर्बंध लादण्याचे अधिकार असतील, असे व्हाइट हाऊसने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 9. हे आदेश जारी होताच, परराष्ट्रमंमत्री माइक पोम्पिओ यांनी रशियाच्या ३३ व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध लादले आहेत. या व्यक्ती आणि संस्था रशियाच्या संरक्षण आणि गुप्तचर विभागांशी संबंधित आहेत.
 10. रशियाने युक्रेनमध्ये केलेले आक्रमण, गिळंकृत केलेला क्रायमिया, सायबर हल्ले आणि २०१६च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेप यांसह अन्य कारवायांसाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हिथर नौअर्ट यांनी नमूद केले.
 11. या आधी अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने 'सीएएटीएसए' कायद्यांतर्गत रशियाच्या पाच संस्था व १९ व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये संरक्षणाशी संबंधित संस्था असून, लष्करी गुप्तचर संस्थेतील अधिकारी आहेत. तसेच, सेंट पीटर्सबर्गवरील इंटरनेट संशोधन संस्थेशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.
 12. अमेरिका हे निर्बंध लादत आगीशी खेळ करत आहे, अशी टीका रशियाने करत या निर्बंधांचा विरोध केला आहे. 'अमेरिका-रशिया यांच्यातील तणाव अविचाराने वाढविण्यात येत असून, जागतिक स्थैर्य नावाची एक संकल्पना असते, ही गोष्टही त्यांनी लक्षात ठेवले, तर चांगले होईल.
 13. हा आगीशी खेळ असून, ती गोष्ट खूपच धोकादायक असेल,' अशी प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्जेई रायबकोव्ह यांनी दिली आहे.
 14. अमेरिकेने २०११पासून रशियाविरोधात ६०वेळा पावले उचलली असून, अशा कोणत्याही निर्बंधांचा परिणाम रशियाच्या मनोधैर्यावर झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
 15. चीनवरही कारवाईची टांगती तलवार:-
  1. रशियावर निर्बंध लादतानाच अमेरिकेने यामध्ये चीनलाही कारवाईचा इशारा दिला आहे. चीन रशियाकडून सुखोई-३५ आणि एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणाही विकत घेत आहे.
  2. हा संरक्षण व्यवहार 'लक्षणीय' असल्याचे सांगत, चीनवरही निर्बंध लादण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. तर, यातून, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाची व्याप्ती वाढेल आणि अमेरिकेला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे.
  3. अमेरिकेने निष्कारण ही कारवाई केली असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय संबंधांतील मुलभूत संकेतांचा भंग केला असून, दोन्ही बाजूकडील देश-देश व लष्कर-लष्कर संबंधांची हानी केली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.
  4. चीन-रशिया यांच्यातील सामरिक संबंध यापुढेही सुरूच राहतील, असेही त्यांनी सुचित केले.


India, after Afghanistan and Iraq, is the worst hit of terrorism

 1. मागील वर्षी जगभरात झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे केवळ पाच आशियाई देशांमध्ये झाल्याचे अमेरिकेच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या पाच देशांमध्ये भारत व पाकिस्तानसह अफगाणिस्तान, इराक आणि फिलिपिन्सचा समावेश आहे.
 2. सलग दुसऱ्या वर्षी भारत दहशतवादाची झळ बसणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इराक आणि अफगाणिस्थान अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
 3. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. २०१५ मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता.
 4. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे.
 5. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इस्लामिक स्टेट (आयएस), तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे. भारतामध्ये ५३ टक्के हल्ले हे सीपीआय-माओवादी या अंतरग्त संघटनाकडून होतात.
 6. २०१७ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दहशतवादी हल्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संखेत तब्बल ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 7. २०१७ मध्ये भारतात एकूण ८६० दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामधील २५ टक्के दहशतवदी हल्ले एकट्या जम्मू काश्मीरमध्ये झाले आहेत. अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अहवालात दिली आहे.
 8. सन २०१७मध्ये भारतातील जम्मू काश्मीर, ईशान्येकडील राज्ये यांना दहशतवादाची झळ बसली आणि मध्य भारतात माओवाद्यांच्या हिंसाचाराचा फटका बसला, असा उल्लेख अहवालात आहे.
 9. आपल्या सीमेच्या आत दहशतवादी शोधणे, त्यांचा बीमोड करणे आणि दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्याचे भारताचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
 10. ‘भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची योजना पाकिस्तानमधून आखली जाते. आणि या हल्ल्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असतो.
 11. पाक यंत्रणा आणि त्यांचं लष्कर या हल्ल्यांना प्रोत्साहन देतं. मात्र पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारताचा हात नसतो.’असं भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं म्हटलं.


Bank assurance Partnership in ICICI-Saraswat

 1. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व सारस्वत सहकारी बँक यांच्यात विविध आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने भागिदारी झाली आहे.
 2. या भागीदारीद्वारे, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश व कर्नाटक येथील सारस्वत बँकेच्या अंदाजे 280 शाखा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफची सर्व संरक्षण व बचत उत्पादने उपलब्ध करणार आहेत.
 3. सारस्वत सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता सांधणे म्हणाल्या, या सहयोगामुळे ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची तसेच त्यांच्या संरक्षण व बचतीच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी आयुर्विमा उत्पादने देणे शक्मय होणार आहे.
 4. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. कन्नन म्हणाले, आमच्या ग्राहककेंद्री उत्पादनांमुळे बँकेच्या ग्राहकांना जीवनातील अनिश्चितता हाताळण्यासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षेची तरतूद करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
 5. काही प्रमुख संरक्षण उत्पादनांमध्ये 34 गंभीर आजारांपासून संरक्षण देणारा पहिलावहिला टर्म प्लान आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट व विविध प्रकारचे हृदयाचे रोग व कॅन्सर यांचा समावेश करणारा हेल्थ इन्शुरन्स प्लान आयसीआयसीआय प्रु हार्ट/ कॅन्सर प्रोटेक्ट यांचा समावेश आहे.


Anushka Sharma gets 'Smita Patil' award

 1. प्रियदर्शनी अकॅडमी आपला ३४ वा वार्षिक जागतिक पुरस्कार वितरण सोहोळा साजरा करीत आहे.
 2. या पुरस्कार वितरण सोहळ्यातील यंदाची स्मिता पाटील पुरस्काराची विजेती अभिनेत्री अनुष्का शर्मा ठरली.
 3. स्मिता पाटील यांच्या नावाने हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जातो.
 4. “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी प्रियदर्शनीची आभारी आहे.
 5. माझ्या यशात संवाद लेखक, दिग्दर्शक व सह कलाकार यांचाही मोठा वाटा आहे.
 6. जेष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे” अशा शब्दांत अभिनेत्री अनुष्का शर्माने आपले मनोगत व्यक्त केले.


Prabhakar Karandikar, a veteran artist in the theater stage

 1. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे  निधन झाले.  
 2. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन विवाहित मुली आहेत. त्यांच्या पत्नी सुधा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता वैकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 3. अगदी लहानपणापासून संगीत शिक्षण घेतलेल्या करंदीकरांनी शास्त्रीय संगीताची तालीम यशवंतबुवा मराठे व नंतर छोटा गंधर्व यांच्याकडे घेतली होती.
 4. त्यानंतर भरत नाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी, मराठी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले होते.
 5.  संगीत सौभद्र, संगीत मंदार माला, संगीत स्वयंवर, संगीत संशयकल्लोळ, संगीत वैरीण झाली सखी, शाहीर प्रभाकर, संगीत अभोगी या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या.
 6. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला होता.
 7. पुणे महानगरपालिकेने मानाचा बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.
 8. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरूभाऊ लिमये यांच्या नंतर भरत नाट्य संशोधन, मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.
 9. त्यापूर्वी ही त्यांनी त्या संस्थेमध्ये अनेक पदे भूषविली. गेले काही महिने त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यातच पत्नीच्या निधनाचा धक्का ते सहन करू शकले नाहीत.


Top

Whoops, looks like something went wrong.