12 initiatives drawing out to make Vast and profitable Agriculture from Vice President

 1. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी बंगळुरुमध्ये इंस्टीट्यूट फॉर सोशल अँड इकनॉमिक चेंज येथे आयोजित 14 व्या डॉ. व्ही. के. आर. व्ही. स्मृती व्याख्यानादरम्यान शेती व्यवहार्य आणि फायदेशीर करण्यासाठी 12 पुढाकार रेखांकीत केले आहेत.
 2. भारत सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, ई-NAM आणि मृदा आरोग्य कार्ड या सारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यास आणि शेती फायदेशीर करण्यास मदत होत आहे.
 3. या पुढाकारांमध्ये 12 बाबींचा समावेश आहे.
उपराष्ट्रपतींनी रेखांकीत केलेल्या 12 बाबी
 1. उत्तम बियाणांचा वापर करणे, जेणेकरून उत्पादकतेमध्ये 15-20% वृद्धी होऊ शकणार आहे.
 2. कृषी उत्पादकथेट वाढ करण्यासाठी खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे.
 3. मर्यादित भू-मालक आणि छोट्या शेतकर्‍यांद्वारा अभिनवता बाळगण्याच्या दिशेनी सामायिक संस्थात्मक कर्ज मुख्य भूमिका निभवते.
 4. अतिरिक्त उत्पन्नासाठी पशुपालन, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन अश्या शेतीपूरक व्यवसायांची कास धरने आणि विस्तार करणे.
 5. भारतात कृषी-यांत्रिकीकरणास चालना देणे.
 6. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषीसंबंधी कार्यांना वेग देणे आणि फलोत्पादन शेतीकडे वळणे आणि पहाडी क्षेत्रात कृषी-यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणे.
 7. कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देत त्यासंबंधित उद्योग पर्यावरणास मजबूत करणे.
 8. पाण्याच्या संवर्धित वापरासाठी उत्तम प्रयत्नांसाठी जागृती करणे.
 9. शेतकर्‍यांना ग्राहक मूल्याच्या मोठ्या भागास समजून घेणे.
 10. भुमीसंबंधी धोरणांमध्ये मूलभूत सुधारणांवर लक्ष्य केंद्रीत करणे.
 11. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी-संबंधी कार्यांना विकसित करणे.
 12. ज्ञानाला सामायिक करण्याच्या प्रक्रियांना सुधारित करणे.


Cyber ​​Secure India Campaign, Ministry of Information Technology

 1. ‘डिजिटल इंडिया’ च्या पार्श्वभूमीवर भारतात सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्रीय इलेक्‍ट्रोनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून राष्‍ट्रीय ई-प्रशासन विभाग (NEGD) आणि उद्योग जगताच्या सहकार्याने 19 जानेवारी 2018 रोजी ‘सायबर सुरक्षित भारत’ अभियानाचे अनावरण केले गेले.
 2. ‘सायबर सुरक्षित भारत’ अभियानाची संकल्पना सर्व शासकीय विभागांमध्ये मुख्‍य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) व अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा उपाय प्रदान करण्यासाठी क्षमता निर्माण करणे आणि सायबर गुन्ह्यांसंबंधी जागृती फैलावने ही आहे.
 3. हे अभियान जागृती, शिक्षण आणि सक्षमता या तीन सिद्धांतांवर चालविले जाणार आहे.
 4. अधिकार्‍यांना सायबर सुरक्षा हेल्‍थ टूल किट्स प्रदान केल्या जाणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. ‘सायबर सुरक्षित भारत’ ही पहिली-वहिली सार्वजनिक-खाजगी भागीदारी आहे.
 3. ज्यात सायबर सुरक्षेसंबंधी माहिती तंत्रज्ञान उद्योगांमधील विशेषज्ञतेचा लाभ करून घेतला जाणार आहे.
 4. यात मायक्रोसॉफ्ट, इंटेल, विप्रो, रेडहॅट आणि डायमेंशन डाटा अश्या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असेल.
 5. या व्यतिरिक्‍त ज्ञान भागीदारीत सर्ट-इन, NIC, NASSCOM, FIDO अलायंस तसेच डेलॉयट व EY या सल्लागार कंपन्यांचा समावेश आहे.


Silvassa - First in the fourth round of National Smart Cities Challenge

 1. गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाकडून राष्‍ट्रीय स्‍मार्ट सिटी शहरे आव्हानाच्या चौथ्या फेरीतल्या विजेता शहरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
 2. विजेत्या शहरांच्या यादीत दादरा-नगर हवेलीची राजधानी सिल्वासा हे पहिले ठरले आहे.
 3. सिल्वासानंतर, 9 विजेत्यांमध्ये इरोड (तामिळनाडू), दीव (दमन-दीव), बिहारशरीफ (बिहार), बरेली (उत्तरप्रदेश), इटानगर (अरुणाचल प्रदेश), मुरादाबाद (उत्तरप्रदेश), सहारनपुर (उत्तरप्रदेश) आणि कावारट्टी (लक्षद्वीप) या शहरांचा समावेश आ हे.
 4. विजेत्या शहरांनी 12,824 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्‍तावित केली आहे,
 5. ज्यामध्ये 10,639 कोटी रुपये क्षेत्र आधारित विकास (ABD) मध्ये गुंतविण्यात येणार आणि 2185 कोटी रुपये संपूर्ण शहराशी संबंधित उपक्रमात वापरले जातील. या शहरांमध्ये जवळपास 409 प्रकल्प आहेत.
 6. यासोबतच 99 शहरांची निवड स्‍मार्ट शहरांच्या रूपात पूर्ण करण्यात आलेली आहे. स्‍मार्ट शहरे अभियानाच्या 99 शहरांमध्ये प्रस्‍तावित गुंतवणूक एकत्रितपणे 2,03,979 कोटी रुपये असणार आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. स्मार्ट शहरे अभियान हा भारत सरकारच्या केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचा 2015 साली सुरू करण्यात आलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
 3. या उपक्रमामधून देशात 100 स्मार्ट शहरे तयार केली जाणार आहेत.
 4. संपूर्ण देशात एकूण 90 शहरांना स्मार्ट शहरांसाठी निवडलेले आहे.
 5. रांची हे देशातले प्रथम हरित क्षेत्र स्मार्ट शहर असणार आहे.


TRAI recommends allowing the use of mobile, internet services during travel by plane

 1. भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण (TRAI) कडून भारतीय हवाई क्षेत्रात विमानातून प्रवासादरम्यान मोबाइल संपर्क वापरण्यास आणि इंटरनेट सेवा वापरण्यास परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 2. काही ठळक शिफारसी :-
  1. भारतीय सीमा क्षेत्रात 3000 मीटर ऊंचीपर्यंतच या सेवांचा लाभ दिला जावा.
  2. प्रवासी विमान, बिजनेस जेट्स, एक्झिक्युटिव्ह विमान आदींचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या विमानांसाठी या सेवा लागू करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्रात उड्डाणादरम्यान कनेक्टिव्हिटी (IFC) सेवांसाठी एक आराखडा तयार करण्यात यावा.
तुम्हाला हे माहित आहे का?

पार्श्वभूमी:-

 1. IFC सेवा प्रदाताला एकतर INSAT (भारतीय उपग्रह प्रणाली किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या परदेशी उपग्रह क्षमता) किंवा भारतीय हवाई क्षेत्रात INSAT प्रणाली बाहेरील परदेशी उपग्रह वापरण्याची परवानगी दिली जावी.
 2. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) हे भारतामधील दूरसंचार क्षेत्राचे नियामक आहे.
 3. दूरसंचार क्षेत्रात न्यायपूर्ण आणि पारदर्शक वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने याची स्थापना 20 फेब्रुवारी 1997 रोजी झाली.
 4. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
 5. TRAI एका सचिवाच्या अध्यक्षतेखाली सचिवालयाच्या माध्यमातून चालवले जाते.


India's own automatic pollution monitoring system will be operational by April 2018

 1. महासागरामधील प्रदूषणाची पातळी जाणून घेण्याकरिता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरिता ‘भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा’ (INCOIS) एप्रिल 2018 पर्यंत आपले स्वयंचलित सुविधा केंद्र कार्यान्वीत करणार आहे. 
 2. अंदाजे 100 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे भारत सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाला कार्यान्वित केले जाईल.
 3. या प्रणाली अंतर्गत समुद्रातल्या पाण्याचे नमुने गोळा करून आणि नंतर त्यांचे विश्लेषण करून प्रदूषणाच्या पातळीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
 4. भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा (INCOIS) ही भारतीय भूविज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे.
 5. ESSO-INCOIS ची स्थापना 1999 साली हैदराबाद येथे झाली.
 6. ही संस्था सागरी हवामान संदर्भात माहिती प्रदान करते आणि सल्लागार संस्था म्हणून देखील कार्य करते.


Ethiopia's Solomon Deccasissa - winner of the Mumbai Marathon

 1. इथियोपियाचा लांब पल्ल्याचा धावक सोलोमन डेकसिसा याने 15 व्या ‘मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद पटकावले आहे.
 2. इथियोपियाच्याच अमाने गोबेना हिने महिला गटात विजेतेपद पटकावले.
 3. भारतीय पुरुष गटात गोपी थोनाकल आणि महिला गटात सुधा सिंह यांनी विजय प्राप्त केला.
 4. इथियोपियाच्या 22 वर्षीय धावक डेकसिसाने 2 तास 9 मिनट 34 सेकंदात पूर्ण मॅरेथॉन पार केले.
 5. या गटात दुसर्‍या स्थानी इथियोपियाच्या सुमेत अकालनाव तर तिसर्‍या स्थानी केनियाचा जोशुआ किपकोरिर यांनी शर्यत पूर्ण केली.
 6. पूर्ण मॅरेथॉनमध्ये महिला गटात दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी अनुक्रमे केनियाची बोर्नेस किटुर आणि इथियोपियाची शुको गेनोमो या होत्या.


Top

Whoops, looks like something went wrong.