World gender gap / divergence index released 2018, Iceland tops the list, India at 108th position

 1. जागतिक आर्थिक मंचाच्या 2018च्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index 2018) नुसार भारताचा क्रमांक 149 देशांमधून 108वा आहे.
 2. 2017 सालच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांकानुसार यावर्षी 2018 साली भारताच्या निर्देशांकात प्रगती दिसून आलेला नाही, 2017 साली भारत 108व्या स्थानी होता.
 3. हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री-पुरुष समानतेची निश्चिती करतो. अशा कामासाठी मजुरी समानतेत सुधारणा झाली असून पहिल्यांदाच तिन्ही बाबींत लैंगिक अंतर कमी केले आहे.
 4. WEFच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018च्यानुसार, 85.8 % हून अधिक लिंग अंतर असलेले आइसलँड या यादीमध्ये शीर्ष स्थानी आहे.
 5. 149 देशांच्या यादीत नॉर्वे आणि स्वीडन क्रमशः द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत. 
 6. WEF संस्थापक आणि अध्यक्ष - क्लाउस श्वाब 
 7. WEF मुख्यालय - स्वित्झर्लंड


 India’s 1st Railway University! Piyush Goyal dedicates to nation unique Indian Railways institution

 1. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारले असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे.
 2. रशिया, चीननंतर भारतातील हे तिसरे अशाप्रकारचे विद्यापीठ आहे. बडोद्यातील ‘द नॅशनल रेल्वे अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट‘ने सुरू केलेल्या या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात झाली.
 3. यात दोन पदवी अभ्यासक्रम पूर्णवेळ व निवासी असून, पहिल्या तुकडीत 20 राज्यांतील 103 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.
 4. यात 17 मुली व 86 मुले आहेत.बीबीएसाठी 41, तर 62 विद्यार्थ्यांनी बीएस्सी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
 5. वाहतूक तंत्रज्ञानासाठी बीएस्सीची व वाहतूक व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी बीबीए पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 6. ‘ट्रान्सपोर्टेशन अँड सिस्टिम्स डिझाईन’, ‘ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स इंजिनिअरिंग’ व ‘ट्रान्सपोर्ट पॉलिसी अँड इकॉनॉमिक्स’ या विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम 2019-20 मध्ये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
 7. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 421 कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी मंजूर केले आहेत.
 8. बडोद्यातील वाघोदिया तालुक्यातील पिपलिया गावात दहा एकरावर हे विद्यापीठ वसणार आहे.


Jay Kawali as president of Maharashtra Boxing Association

 1. राज्यभरात बॉक्सिंगचे जाळे विणण्यात मोलाची भूमिका बजावणारे तसेच महाराष्ट्रातील बॉक्सिंगचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जय कवळी’ यांची महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
 2. महासंघाच्या कार्यकारिणीची निवडणूक 30 डिसेंबर रोजी कल्याण येथे होत असून महासचिव, सचिव आणि खजिनदार या तीन पदांसाठी चुरस रंगणार आहे. 
 3. कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील व पुण्याचे रमेशदादा बागवे यांच्यासह मराठवाडय़ातील माजी आमदार श्रीकांत जोशी तसेच परभणीचे आमदार राहुल पाटील हे उपाध्यक्षपदी असतील.
 4. खेळाडू या नात्याने माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे, कॅप्टन शाहू बिराजदार तसेच कॅप्टन गोपाल देवांग आणि गुरुप्रसाद रेगे हे उपाध्यक्षपदी कार्यरत असतील.
 5. तर याव्यतिरिक्त रिझवी एज्युकेशन सोसायटीचे जावेद रिझवी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवरा सैनिक स्कूलचे कर्नल दिलीप परब, सांगलीचे माजी उपमहापौर मुन्ना कुरणे, देवगड एज्युकेशन बोर्डाचे जितेंद्र तावडे, नागपूरमधील सज्जाद हुसेन, चंद्रपूरमधील डॉ. भगवानदास प्रेमचंद यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.


US Defense Minister James Matisse resigns

 1. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राजीनामा दिलाआहे.
 2. भारत व अमेरिका लष्करी संबंधाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. संघर्षग्रस्त सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पेंटॅगॉनमध्ये सर्वानाच धक्का बसला होता.
 3. मॅटिस व ट्रम्प यांच्यात  समेट न घडून येणारे मतभेद या धोरणबदलांवर झाले होते. 
 4. ट्रम्प प्रशासनातून सोडून जाणारे मॅटिस हे अलीकडच्या काळातील सर्वात मोठे अधिकारी आहेत.
 5. अध्यक्ष ट्रम्प यांना पाठवलेल्या पत्रात मॅटिस यांनी म्हटले आहे, की त्यांनी आता त्यांच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत अशा व्यक्तीची नेमणूक करावी.
 6. मॅटिस यांनी राजीनामा दिल्याचे ट्रम्प यांनी दोन ट्विट संदेशातून सूचित केले होते.
 7. मॅटिस हे फेब्रुवारीअखेर पद सोडतील असेही त्यांनी त्यात म्हटले  होते.


RBI's restrictions on the Peytm

 1. पेटीएमच्या डिजिटल पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. पेटीएम डिजिटल पेमेंट बँकेत आणि ई वॉलेटवर नवीन खाती सुरु करण्यास ऑगस्ट महिन्यापासून निर्बंध लादण्यात आले आहेत.
 2. पेटीएमने खातेदारांच्या केवायसीसंबंधी (नो यूवर कस्टमर) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. 
 3. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या पेमेंट बँकेसंबंधित नियमांचे पेटीएमकडून उल्लंघन करण्यात आले आहे. पेमेंट बँकेत एका खात्यात जास्तीत जास्त एक लाखांची रक्कम ठेवता येते.
 4. बँकेला शंभर कोटी रुपयांचे नेटवर्थ राखणे देखील गरजेचे आहे. शिवाय पेटीएमचे प्रवर्तक विजयशेखर शर्मा यांचा बँकेतील हिस्सा 51 टक्क्यांवर पोचला आहे.
 5. तर इतर भांडवल इतर काही कंपन्या आणि 97 कम्युनिकेशन्सकडे आहे. मात्र त्यात देखील शर्मा यांची हिस्सेदारी असल्याने अप्रत्यक्षरीत्या बँकेतील त्यांच्या हिस्सा अधिक आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.