indian gov has started international air communication scheme

 1. पर्यटनार्थ आंतरराष्ट्रीय भ्रमंती खिशाला परवडणारीजोगी व्हावी म्हणून भारत सरकारच्या ‘उडे देश का आम नागरिक (UDAN)' योजनेचा विस्तार करणारी आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क योजना (International Air Connectivity -IAC) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. केंद्राने या योजनेचा एक मसुदा तयार केला आहे, जो उड्डाणासाठी हवाई मार्ग ओळखण्याचा राज्य सरकारांना ज्यांसाठी चालवली जाईल.
 3. ही योजना 2027 सालापर्यंत आंतरराष्ट्रीय तिकिटांची संख्या 20 कोटींपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य समोर ठेवून तयार करण्यात आली आहे.
 4. एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या UDAN (उडे देश का आम नागरिक) या नावाच्या प्रादेशिक जोडणी योजना (RCS) अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
 5. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50% भाडे केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.


president appointed new governors to 7 states

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच देशातल्या पुढील सात राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

1)राज्यपाल राजवट लागू असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये एन एन व्होरांच्या जागी
सत्यपाल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2)बिहारच्या राज्यपालपदी उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते
लालजी टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

3)हरियाणाचे राज्यपालपदी बिहारचे भाजपचे नेते
सत्यदेव नारायण आर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

4)त्रिपुराच्या राज्यपालपदी
कप्तानसिंह सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

5)मेघालयच्या राज्यपालपदी
तथागत रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

6)सिक्कीमच्या राज्यपालदी
गंगाप्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

7)उत्तराखंडच्या राज्यपालपदी
बेबी रानी मोर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


isro mission completed to play tennis in space

 1. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा) चे अंतराळवीर कमांडर अँड्र्यू फेस्टेल आणि सहकाऱ्यांचा अंतराळात टेनिस खेळण्याचा प्रयोग 22 August ला(अमेरिकन वेळेनुसार)  यशस्वी झाला.
 2. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) त्यांनी हा इतिहास घडवला. भूतलापासून सुमारे अडीचशे मैल उंचीवरच्या या सामन्याचे यूएस टेनिस असो. च्या नेटजेनरेशन या ऑनलाईन चॅनेलने आणि आर्थर स्टेडियमजवळच्या युनीस्फिअरवर प्रक्षेपण करण्यात आले.
 3. टेनिसची दुनिया कशी सीमापार पोहाचून ताऱ्यांच्या विश्वात पोहचू शकते हे दाखविण्यासाठी हा प्रयोग होता. त्यासाठी आयएसएसवर तात्पुरते टेनिस कोर्ट तयार करण्यात आले होते आणि गुरुत्वाकर्षणाच्या अभावात काम करणारी खेळाची साधने पोहचविण्यात आली होती.
 4. त्यात छोट्या रॅकेट, पिवळे नेट आणि फोमच्या चेंडूंचा समावेश होता. या ऐतिहासिक प्रयोगासाठी खेळाच्या नियमांतही बदल करण्यात आला होता. त्यात तरंगणारे चेंडू आयएसएसचे तळ, छत आणि नेटखालून मारण्याची मूभा होती.
 5.  टेनिसच्या प्रचार आणि प्रसारासाठी यूएस टेनिस असो.चा हा प्रयत्न होता, असे यूएसटीएचे सीईओ गॉर्डन स्मीथ यांनी म्हटले आहे.
 6. अंतराळातील या पहिल्या टेनिस सामन्यासाठी नासाच्या मोहिम 56 चे कमांडर फेस्टेल यांना आघाडीचा टेनिसपटू युआन मार्टिन डेल पौत्रोने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे टीप्स दिल्या होत्या. टेनिसच नव्हे तर क्रीडा जगतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या प्रयोगाचे 'वन स्मॉल एस फॉर मॅन, वन जायन्ट लीप फॉर टेनिस' असे वर्णन करण्यात येत आहे.


ठळक मुद्दे-

टेनिसची दुनिया कशी सीमापार पोहाचून ताऱ्यांच्या विश्वात पोहचू शकते हे दाखविण्यासाठी हा प्रयोग होता. त्यासाठी आयएसएसवर तात्पुरते टेनिस कोर्ट तयार करण्यात आले होते.


shane warner book - no spin

 1. ऑस्ट्रेलियाचा स्पिनर शेन वॉर्न याने ‘नो स्पिन' या शीर्षकाखाली आपली आत्मकथा लिहिलेली आहे.
 2. एबरी प्रेस हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
 3. 1992 मध्ये आपल्या उत्कृष्ट कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच 2013 च्या खेळाच्या सर्व स्वरूपांतून निवृत्त होण्याच्या दृष्टीने शेन वॉर्न आपल्या अविश्वसनीय गोष्टी सांगण्यास इच्छुक होता.

 4. या पुस्तकात वॉर्नने क्रिकेटमधील त्याच्या विलक्षण कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा केला आहे.


pakistan new pm imran khan

 1. तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांनी पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान म्हणून १८ ऑगस्ट रोजी शपथ घेतली.
 2. पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांना १७६ मते मिळाली.
 3. त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रतिस्पर्धी उमेदवार शहाबाज शरीफ यांचा पराभव केला. शहाबाज शरीफ यांना ९६ मते मिळाली.
 4. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू इस्लामाबादमध्ये हजर होते.
 5. इम्रान खान यांनी प्रचारावेळी नवाज शरीफ यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता.
 6. निवडून आल्यानंतरच्या भाषणात त्यांनी देशामध्ये वेगाने विकास होईल असे आश्वासन दिले होते. तसेच देशाबाहेर गेलेल्या संपत्तीला परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
 7. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी २७२ उमेदवार थेट जनतेमधून निवडले जातात. तर बाकीच्या ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.
 8. पाकिस्तानात जुलै २०१८मध्ये २७२ पैकी २७० जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
 9. मात्र ११६ जागा जिंकत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याप्रमाणात त्यांना आणखी ३३ राखीव (२८ महिला व ५ अल्पसंख्यांक) जागा मिळाल्याने पक्षाची सदस्यसंख्या १४९वर पोहोचली होती.
 10. या निवडणुकीत शहाबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने ६४ जागा तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीने ४३ जागा जिंकल्या. त्यांना अनुक्रमे १८ व ११ राखीव जागा मिळाल्या होत्या.
 11. पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी इम्रान खान यांना १७२ मतांची आवश्यकता होती आंनी १७६ मते मिळवत ये आय पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान बनले आहेत.

इम्रान खान-

 • खान यांचा जन्म लाहोर येथे ५ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. त्यांचे वडील पश्तुन म्हणजे पठाण वंशाचे व नियाझी जमातीचे होते.
 • लाहोरमधील अचिन्स कॉलेज येथे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यानंतर इंग्लंडमधील वुर्सेस्टर येथे रॉयल ग्रामर स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले.
 • ऑक्सफर्डच्या कीबल कॉलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र या विषयांतून १९७५मध्ये पदवी घेतली.
 • अष्टपैलू खेळाडू असलेलेया खान यांनी १९७१ ते १९९२ दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघात मोठी कामगिरी केली. १९९२मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिला क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
 • १९८२ ते १९९२ या कालावधीत त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या सर्वाधिक यशस्वी खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते.
 • टेस्ट क्रिकेटमध्ये ३००पेक्षा अधिकबळी मिळविणाऱ्या जगातील ८ अष्टपैलू खेळाडूंपैकी ते एक आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी ३६२ बळी घेतले आहेत.
 • २०१०मध्ये त्यांचा मानाच्या आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. याशिवाय त्यांना १९९२साली हिलाल ए इम्तियाझ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
 • क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी १९९६साली पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना केली.
 • तेहरिक ए इन्साफ याचा अर्थ न्यायासाठी चळवळ असा आहे.
 • सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे त्यांच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही.
 • मात्र २०१३साली खैबर पख्तुनवा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा इम्रानला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते.
 • इम्रान खान हे पाकमधील कट्टरतावादी गटांची कायम पाठराखण करत आले आहेत. इम्रान यांच्या कार्यकाळात पाकमधील कट्टरपंथी शिरजोर होण्याची भीती आहे.
 • इम्रान यांच्या या भूमिकांमुळे पाकच्या उदारमतवादी वर्तुळात त्यांना ‘तालिबान खान’ या नावानेही ओळखले जाते.


dr.amit samarth completed trans cyberian extream race

 1. नागपूरमधील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किमी) रेस पूर्ण करत इतिहास रचला.
 2. मॉस्को येथे २४ जुलै रोजी फ्लॅग ऑफ झालेल्या या रेसचे २५ दिवसात १५ टप्पे पूर्ण करायचे आव्हान होते.
 3. ही शर्यत पूर्ण करणारे डॉ. समर्थ हे भारतातील पहिले सायकलपटू ठरले. डॉ. अमित समर्थ यांच्यासह इतर तीनच सायकलपटूंनी हे आव्हान पूर्ण करू शकले.
 4. अमित समर्थ यांनी ३४७ तास १६ मिनिटे १७ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करीत चौथे स्थान पटकावले.
 5. पीटर बिश्चॉप (३१५.४५.२८), मायकल कनूडसेन (३३३.१३.०४) आणि मार्सिलो फ्लोनटिनो सोरेस (३४६.१९.००) यांनी अनुक्रमे पहिली तीन स्थाने मिळविली.
 6. गेल्यावर्षी पाच हजार किलोमीटर अंतराची रेस अक्रॉस अमेरिका ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिट वेळेत पूर्ण केल्यापासून डॉ. अमित समर्थ चर्चेत आले होते. ही शर्यत पूर्ण करणारेही ते पहिले भारतीय आहेत.
 7. यापूर्वी त्यांनी इन्स्पायर इंडियातर्फे आयोजित डेक्कन क्लिफहँगर २०१७ (पुणे ते गोवा ६४३ किलोमीटर अंतर) रेस २५ तास २८ मिनिट वेळेत पूर्ण करीत जेतेपद मिळविले होते.
 8. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर २०१६मध्ये (३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे) रेस पूर्ण करीत पूर्ण आयर्नमॅनचा किताबही त्यांनी पटकावला होता.


Top