‘राष्‍ट्रीय क्रीडा पुरस्‍कार – 2017’ जाहीर

दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2017 जाहीर केले आहे. हे पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. 

यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र आणि सरदार सिंह यांना दिला जाणार आहे. शिवाय सात जणांना द्रोणाचार्य पुरस्कार तर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. ध्यानचंद पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना निवडण्यात आले आहेत.

पुरस्कारांचे वितरण 29 ऑगस्ट 2017 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

क्रीडा पुरस्कार:-

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार:-  रु. 7.5 लाख रोख सह हा पुरस्कार चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक आणि सर्वात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूला दिला जातो.

अर्जुन पुरस्कार:- रु. 5 लाख रोख सह हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात चार वर्षे सातत्याने उत्कृष्ठ कामगिरीसाठी दिला जातो.

द्रोणाचार्य पुरस्कार:- रु. 5 लाख रोख सह हा पुरस्कार प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्यांना प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकांना दिला जातो.

ध्यानचंद पुरस्कार:- रु. 5 लाख रोख सह हा पुरस्कार क्रीडा विकासामध्ये संपूर्ण जीवनभर योगदान दिल्याबद्दल दिला जातो.

पुरस्कारासाठी निवड झालेल्यांची यादी:

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार:-

पुरस्कार प्राप्तकर्त्याचे नाव               क्रीडा प्रकार

देवेंद्र

पॅरा-ऍथलिट

सरदार सिंह

हॉकी

द्रोणाचार्य पुरस्कार:-

पुरस्कार प्राप्तकर्त्याचे नाव

क्रीडा प्रकार

स्‍वर्गीय डॉ. आर. गांधी

ऍथलेटिक्स

हीरा नंद कटारिया

कबड्डी

जी. एस. एस. वी. प्रसाद

बॅडमिंटन (जीवनगौरव)

ब्रिज भूषण मोहंती

मुष्टियुद्ध (जीवनगौरव)

पी. ए. राफेल

हॉकी (जीवनगौरव

संजय चक्रवर्ती

नेमबाजी (जीवनगौरव)

रोशन लाल

कुस्ती (जीवनगौरव)

अर्जुन पुरस्कार:-

पुरस्कार प्राप्तकर्त्याचे नाव

क्रीडा प्रकार

वी.जे. सुरेखा

तिरंदाजी

खुशबीर कौर

ऍथलेटिक्स

अरोकिया राजीव

ऍथलेटिक्स

प्रशांति सिंह

बास्‍केट बॉल

सूबेदार लैशराम दे‍बेन्‍द्रो सिंह

मुष्टियुद्ध
चेतेश्‍वर पुजारा क्रिकेट

हरमनप्रीत कौर

क्रिकेट

ओइनम बेम्‍बम देवी

फूटबॉल

एस.एस.पी. चौरसिया

गोल्‍फ

एस.वी. सुनील

हॉकी

जसवीर सिंह

कबड्डी

पी.एन. प्रकाश

नेमबाजी

ए. अमलराज

टेबल टेनिस

साकेतमिनेनी

टेनिस

सत्‍यवर्त कादियान

कुस्ती
मरियप्‍पन पॅरा-ऍथलीट
वरुण सिंह भाटी पॅरा-ऍथलीट

ध्यानचंद पुरस्कार:-

सुमाराई टेटे

हॉकी

सैयद शाहिद हकीम

फूटबॉल

भूपेन्‍द्र सिंह

ऍथलेटिक्स


सर्वोच्च न्यायालयाने ‘तिहेरी तलाक’ प्रथेला घटनाबाह्य ठरवले

भारताचे प्रधान न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह न्या. कुरिअन जोसेफ, रोहिंटन नरीमन, यू. यू. ललित आणि एस. अब्दुल नझीर या न्यायाधीशांच्या खंडपीठाने ‘तिहेरी तलाक’ प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिला आहे.

निर्णयानुसार, घटस्फोट घेण्याकरिता मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असलेली ‘तिहेरी तलाक’ प्रथा ही घटनाबाह्य आहे.

न्यायालयाचा निर्णय:-

 1. तिहेरी तलाक प्रथेवर आजपासून बंदी असणार आहे. मात्र याविषयी संसदेला सहा महिन्यात कायदा करावा लागणार.
 2. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाक प्रथेवर बंदी कायम असेल.
 3. तोंडी तलाक दिल्यास ते घटनाबाह्य असून अवैध असेल.
 4. ‘तिहेरी तलाक’ वर कायदा करताना केंद्र सरकार 'शरिया कायदा' व मुस्लिम संघटनांची मते विचारात घ्यावीत.
 5. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम धर्मात रुजलेली तिहेरी तलाक पद्धतीसंबंधित दाखल होणार्‍या याचिकेवर निर्णय घेण्याकरिता पाच न्यायाधीशांचे संवैधानिक खंडपीठ बसविलेले होते. या खंडपीठाने तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि मुस्लीम धर्मातील बहूपत्नीकत्व अश्या मुद्द्यांवर विस्तृतपणे अभ्यास केला.

 

पार्श्वभूमी:-

मुस्लिम धर्मामध्ये तलाक-ए-बिदत नावाने घटस्फोट पद्धती रुजलेली आहे. आधी आपण तलाक-ए-बिदत संबंधी जाणून घेऊयात.  

तलाक-ए-बिदत:-

 1. तलाक-ए-बिदत म्हणजे एका तूहर (दोन पाळीच्या दरम्यानचा काळ) मध्ये एकापेक्षा जास्त वेळा तलाक उच्चारून किंवा संभोग नंतर तूहर मध्ये, किंवा एकाच वेळी निश्चित समकालीन घटस्फोट उच्चारून मुस्लिम पुरुष आपल्या बायकोला घटस्फोट देतो.
 2. या पद्धतीविरोधात, वर्ष 2016 मध्ये शायरा बानो यांनी बहूपत्नीकत्व, तिहेरी तलाक आणि निकाह हलाला ला मान्यता आणि प्रमाणित करण्यासाठी असलेल्या मुस्लिम व्यक्तीगत कायदा (शरियत) उपयोगिता कायदा, 1937 च्या कलम 2 च्या घटनात्मक मुद्द्यांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. याचिकादारचे कुटुंब अतिरिक्त हुंडा मागणी पूर्ण करण्यात अक्षम असल्याने तिच्या पतीने तिला घटस्फोट दिलेला आहे.
 3. याचिकादार शायरा बानू ही एक मुस्लिम महिला नागरिक आहे, जिच्या पतीने त्यांच्या लग्नानंतर तिच्यावर वारंवार क्रूर कृत्य करून नंतर तिला बेकायदेशीरपणे घटस्फोट दिला.
 4. ही याचिकादार मुस्लिम वैयक्तिक कायद्यांतर्गत तलाक-ए-बिदत (समकालीन तिहेरी-तलाक), निकाह हलाला (दुसर्‍या पुरुषासह एक मध्यस्थीमुळे लग्न न होता घटस्फोटीत पती सह पुनर्विवाह विरुद्ध अडथळा) आणि बहूपत्नीकत्व या रुजलेल्या पद्धती या बेकायदेशीर, घटनाबाह्य, आणि संविधानाच्या कलम 14, 15, 21 आणि 25 चे उल्लंघन करणारे आहेत म्हणून त्या स्पष्ट करण्याकरिता प्राधिलेख किंवा आदेश किंवा मार्गदर्शन इच्छिते.
 5. यावर सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला मुस्लिम्स सह विविध धार्मिक अल्पसंख्यांक मध्ये रुढलेल्या विवाह, घटस्फोट आणि ताबा संबंधित वैयक्तिक कायदाच्या (Personal Law) पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी समितीकडून अहवाल मागवला होता.
 6. मुस्लिम धर्माचा अभ्यास करणार्‍या विविध प्रसिद्ध विद्वानांनी देखील तलाक-ए-बिदत चा पवित्र कुराण मध्ये कोणताही पाया नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय आव्हान देण्यासारख्या सराव पद्धती, ज्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहारात स्त्रियांना पुरुषांची जंगम मिळकत म्हणून त्यांच्यासोबत गैरव्यवहार करणे हे मानवाधिकार आणि लिंग समानता यांच्या आधुनिक तत्वांच्या विरुद्ध तर आहेच, तसेच इस्लामिक विश्वासाचा अविभाज्य भाग सुद्धा नाही, असे स्पष्ट केले आहे.
 7. खरं तर, सौदी अरेबिया, पाकिस्तान, इराक यासारख्या अनेक मुस्लिम राष्ट्रांनी अश्याप्रकारच्या पद्धतीवर बंदी घातली आहे किंवा मर्यादित केले आहे.
 8. भारतीय मुस्लिम समुदाय हे स्वतः सुधारणेसाठी आणि इस्लाम किंवा पवित्र कुराण मध्ये कोणताही पाया नसलेल्या त्रासदायक पद्धती वर बंदी घालण्याची मागणी करत आहे.


अमेरिकेकडून ६ अपाचे हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी

 1. भारतीय संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून सहा लढाऊ ‘एएच-६४ ई अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ४,१६८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
 2. याआधी भारताने २२ हेलिकॉप्टर्स च्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मात्र आता आणखी ६ हेलिकॉप्टर्सची स्वतंत्र खरेदी केली जाणार आहे.
 3. संरक्षण मंत्रालयातील सर्वोच्च निर्णायक संस्था असलेल्या संरक्षण संपादन परिषदेने (डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिल) या खरेदीला मंजुरी दिली आहे.
 4. भारतीय सैन्याकडून ११ हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आली होती. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय समितीने ६ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली.
 5. याआधी सप्टेंबर २०१५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने २.२ अब्ज डॉलर्सचा करार करत २२ अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली होती.
 6. या लढाऊ हेलिकॉप्टर्समुळे हलाई दलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे. ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात केली जाणार आहेत. 
 7. भारत या अपाचे हेलिकॉप्टर्ससोबतच त्यासंबंधीची उपकरणे, सुटे भाग आणि दारुगोळादेखील खरेदी करणार आहे.
 8. बोईंग एएच-६४ अपाचे दोन टर्बोशाफ्ट इंजिन हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर रात्रीच्या अंधारातही उड्डाण करु शकते.
 9. या हेलिकॉप्टरने ३० सप्टेंबर १९७५ मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. जगात या हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर केला जातो.
 10. डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलचे अध्यक्ष : संरक्षणमंत्री अरुण जेटली


कॉल ड्रॉप झाल्यास १० लाखांपर्यंत दंड

 1. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत.
 2. नव्या नियमांनुसार कोणत्याही दूरसंचार सर्कलमध्ये एकूण कालावधीच्या ९० टक्के काळात, ९८ टक्के कॉल्स सुरळीतपणे होणे आवश्यक आहे.
 3. त्यामुळे एकूण कॉल्सपैकी दोन टक्क्यांहून अधिक कॉल्स ड्रॉप झाल्यास कंपनीकडून दंड आकारला जाऊ शकतो.
 4. सर्वाधिक व्यस्त असलेल्या दिवसांमध्ये एका दूरसंचार सर्कलमधील ९० टक्के मोबाईल टॉवरवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण ३ टक्क्यांहून अधिक असता कामा नये.
 5. दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या एखाद्या कंपनीला सलगच्या तिमाहींमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येईल.
 6. तर लागोपाठ तीन महिन्यांमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अयशस्वी ठरल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.
 7. दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीकडून कॉल ड्रॉप रोखण्यासाठीच्या नियमांचा लागोपाठ ३ महिने भंग झाल्यास सर्वाधिक म्हणजेच १० लाखांचा दंड आकारला जाईल.
 8. ट्रायचे अध्यक्ष: आर. एस. शर्मा


Top

Whoops, looks like something went wrong.