Mr. PRIYANKA KANOONGO appointed chairperson of National Commission for Protection of Child Rights (NCPCR)

 1. प्रियंक कानूनगो यांची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्कळ ३ वर्षांचा असेल.
 2. १६ सप्टेंबर २०१८ रोजी स्तुति कक्कड यांचा कार्यकाल संपल्यापासून हे पद रिक्त होते. स्तुति यांची जागा आता प्रियंक घेतील.
 3. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग:-
  1. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. हा आयोग भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
  2. बालसुरक्षा, त्या संबधित तक्रारी आणि सूचना यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
  3. या आयोगाची स्थापना २००५मध्ये करण्यात आली, परंतु या आयोगाने मार्च २००७पासून कार्य करण्यास सुरवात केली.
  4. २००७मध्ये बालहक्क संरक्षण कायदा २००५अंतर्गत संसदेच्या अधिनियमाद्वारे या आयोगाची स्थापना करण्यात आली.
  5. भारताचे संविधान आणि संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या बाल अधिकार सुनिश्चित करणे या आयोगाचे कार्य आहे.
  6. तसेच समाजाच्या विभिन्न विभागांतील मुलांच्या अधिकारांचा व साक्षरतेचा प्रचार करणे आणि त्यांच्यासाठी असलेल्या या अधिकारांच्या सुरक्षा उपायांची त्यांना जाणीव करून देण्याचे कार्यही हा आयोग पार पडतो.


Start the 'Ask direction' chatbot from IRCTC

 1. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) ‘आस्क दिशा’ नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजेंसयुक्त चॅटबॉट सुरु केला आहे.
 2. हा चॅटबॉट वापरकर्त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तसेच मानवी-कर्मचाऱ्यांच्या मदतीविना तो वापरकर्त्याशी संवाद साधू शकतो. 
 3. हा चॅटबॉट आयआरसीटीसी वेबसाइटवर कार्यरत झाला असून, लवकरच तो आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅन्ड्रॉइड अॅपवरही उपलब्ध होणार आहे.
 4. आस्क दिशा:-
  1. हा आयआरसीटीसीचा उपक्रम आहे. हा चॅटबॉट रेल्वे प्रवाशांना विविध सेवांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असेल.
  2. यामध्ये भविष्यात आवाज ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि अनेक प्रादेशिक भाषाही समाविष्ट केल्या जाणार आहेत.
  3. आस्क दिशा अतिशय अल्प काळात वापरकर्त्यांच्या समस्यांची उत्तर देऊ शकते. त्यामुळे चौकशीसाठी होणारा वेळेचा अपव्यय टळणार आहे. 


Prema Gopalan Social Entrepreneur Award

 1. ‘स्वयं-शिक्षण प्रयोग’च्या संस्थापिका प्रेमा गोपालन यांना ‘इंडिया सोशल इंटरप्रेन्योरशिप ऑफ द ईयर’ (सामाजिक उद्योजकता) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात आजीविका निर्मिती याकरिता केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 3. इंडिया सोशल इंटरप्रेन्योरशिप ऑफ द ईयर या पुरस्काराची स्थापना २०१०मध्ये जुबिलेंट भारतीय फाउंडेशन आणि श्वाब फाउंडेशन फॉर सोशल इंटरप्रेन्योरशिप यांनी संयुक्तपणे केली आहे.
 4. श्वाब फाउंडेशन फॉर सोशल इंटरप्रेन्योरशिप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी सलग्न संस्था आहे.
 5. या पुरस्काराद्वारे अशा उद्योजकांना पुरस्कृत करण्यात येते, ज्यांच्या कार्याचा समाजावर चांगला प्रभाव पडतो.
 6. प्रेमा गोपालन:-
  1. प्रेमा गोपालन सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. १९८४मध्ये त्यांनी SPARC (सोसायटी फॉर द प्रोमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर)ची स्थापना केली.
  2. त्यानंतर १९९३मध्ये त्यांनी ‘स्वयं-शिक्षण प्रयोग’ची स्थापना केली. सध्या देशातील ६ राज्यांमध्ये स्वयं-शिक्षण प्रयोग कार्यरत आहे.
  3. स्वयं-शिक्षण प्रयोगात ५०० स्वयं मदत गटांचा समावेश आहे. या प्रयोगाच्या मदतीने आतापर्यंत १.४५ लाख महिलांना त्यांचे उद्योग सुरू करण्यास मदत मिळाली आहे.


Suraj Panwar gave India the first medal in athletics

 1. अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या Youth Olympics स्पर्धेत भारताच्या खात्यात आज अॅथलेटिक्स क्रीडाप्रकारातील पहिले पदक जमा झाले.
 2. सूरज पनवार या धावपटूने भारताला ५ हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून दिली. त्याच्या या पराक्रमामुळे भारताच्या खात्यात आता ११ पदके झाली.
 3. सुरजने ५ हजार मीटर चण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक कमावले. त्याने दोन टप्प्यात २०.३५.८७ आणि २०.२३.३० अशा वेळा नोंदवल्या. मात्र इक्वेडोरचा ऑस्कर पॅटीन याला मागे टाकणे त्याला शक्य झाले नाही.
 4. सुरजने ही स्पर्धा दुसऱ्या क्रमांकावर संपवली. चीनच्या चीन वांग याला आपली रेषा सोडून दुसऱ्याच्या पट्ट्यात शिरल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आले.
 5. त्यामुळे भारताच्या खात्यात रौप्यपदकाही भर पडली. मात्र ऑस्करने ही स्पर्धा ४०.५१.८६ इतक्या वेळेत पूर्ण केली होती.
 6. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करूनही सूरजला एकूण स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ४०.५९.१७ एवढा वेळ लागला. पोर्टो रिकोचा जॅन मोरी याने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
 7. या विजयाबाबत बोलताना सूरज म्हणाला की आता माझे पुढील लक्ष्य हे ऑलिम्पिक, राष्टकुल आणि आशियाई स्पर्धांसाठी स्वतःला सज्ज करणे आणि देशाला पदक मिळवून देणे हे आहे.
 8. तसेच यापुढे भारताकडून प्रतिनिधित्व करणारे खेळाडू यांनी आपल्या देशाला पदके मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.
 9. दरम्यान, या विजयामुळे भारताने या स्पर्धेत एकूण ११ पदके मिळवली आहेत. यात ३ सुवर्ण आणि ८ रौप्य पदके आहेत.


Khayyam received the Hridaynath Mangeshkar Lifetime Achievement Award

 1. संगीतकार, लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना २०१८चा हृदयनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
 2. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८१व्या जन्मदिनी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 3. खय्याम यांनी १९४३साली वयाच्या १७व्या वर्षी लुधियाना येथे आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.
 4. त्यांनी संगीत दिग्दर्शक शर्माजी-वर्माजी यांच्यासह ‘हीर रांझा’ (१९४८) या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
 5. १९६१मध्ये ‘शोला और शबनम’ या चित्रपटातील संगीत दिग्दर्शनामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
 6. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. ‘उमराव जान’ (१९८१) या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कार प्राप्त झाला.
 7. हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार:-
  1. हृदयनाथ आर्ट या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ २०११मध्ये हा पुरस्कार सुरू केला.
  2. विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापूर्वी लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, हरिप्रसाद चौरसिया, ए. आर. रहमान यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  3. हृदयनाथ हे प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांचे पुत्र तसेच लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे बंधू आहेत.


Top