INSV Tarini completed her historic journey

 1. भारतीय नौदलाच्या स्वदेशी INSV तारिणी या जहाजाने गोव्यात परतले आणि आपला ऐतिहासिक असा यशस्वी जगप्रवास पूर्ण केला केला आहे.
 2. 10 सप्टेंबर 2017 रोजी गोवा येथे "नाविका सागर परिक्रमा" कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण जगाला जलमार्गे प्रदक्षिणा घालण्यात आली आहे. प्रवासादरम्यान फ्रीमेनटेली (आस्‍ट्रेलिया), लाइटलेटन (न्‍यूजीलँड), पोर्टसिडनी (फॉकलँड्स) आणि केपटाउन (दक्षिण अफ्रीका) या चार ठिकाणी विश्रांती घेतली गेली.
 3. INSV तरिणी हे 55 फुट लांबीचे महासागरातले गस्त जहाज आहे. INSV तारिणी हे दिवर, गोवा येथे अक्वेरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बांधले गेलेले एक डोलकाठी असलेले छोटे जहाज आहे. भारतीय नौदलाच्या INSV तरिणी जहाजावर संपूर्णताः महिला दल कार्यरत आहे. यावरील दल लेफ्टनेंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या हाताखाली आहे.
INSV तारिणी
 1. आयएनएसव्ही तारिणी ही भारतीय नौदलाची एक शिडाची नौका आहे. या नौकेचे नाव ओडिशातील प्रसिद्ध तारातारिणी मंदिराचे नावावरून ठेवण्यात आले आहे. तारिणी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ (पाण्यातून) तारून दुसऱ्या तीरावर पोहोचवणारी असा होतओ.
 2. या नौकेत इंजिन नसून फक्त शिडावर चालते तरीही निळ्या समुद्रात जाऊ शकते. या नौकेचे बांधकाम गोव्याच्या ॲक्वेरियस शिपयार्डमध्ये करण्यात आले. ते बांधकाम हॉलंडच्या टोंगा-५६ या नौकेच्या धर्तीवर करण्यात आले.
 3. याचे बांधकामासाठी फायबर ग्लास अॲल्युमिनियम व स्टील यांचा वापर करण्यात आला आहे. या नौकेची लांबी सुमारे ५६ फूट असून वजन सुमारे २३ टन इतके आहे.
 4. तारिणीवर आधुनिक सॅटेलाईट यंत्रणा बसविण्यात आलेली आहे व त्या यंत्रणेमार्फत, जगातील कोणत्याही भागात संपर्क साधता येतो.

 


Indian Sikh woman first time cabinet minister in Malaysia

 1.  मलेशियात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीची निवड झाली आहे. गोविंद सिंग देव असे त्यांचे नाव असून मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातील मंत्री होणारे ते पहिलेच मंत्री आहेत.
 2. देव हे 45 वर्षांचे असून त्यांच्याकडे कम्युनिकेशन आणि मल्टिमीडिया हे खाते देण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच नव्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या आणखी एका व्यक्तीची मंत्रिमंडळात निवड झाली आहे.
 3. एम. कुलसेहरन हे डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे सदस्य असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे. गोविंद सिंग देव पुचोंग मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचे वडिल करपाल सिंग हे मलेशियात वकिल आणि राजकीय नेते होते.
 4.  देव यांना काल नॅशनल पॅलेस येथे शपथ देण्यात आली. या सोहळ्य़ात जगातील निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ओळखले जाणारे आणि मलेशियाचे नवे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि इतर कॅबिनेट सदस्यांनीही शपथ घेतली.
 5. 2008 साली देव पहिल्यांदा मलेशियाच्या संसदेत खासदार झाले. त्यानंतर वाढीव मताधिक्याने 2013 साली ते पुन्हा निवडून गेले. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते 47 हजार 635 मतांनी विजयी झाले आहेत.
 6. देव यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबी समुदायाने आनंद व्यक्त केला आहे. मलेशियात साधारणपणे 1 लाख शीख लोक राहातात.


Successful test of BrahMos missile to increase the service time

 1. भारताने ओडिशाजवळ चाचणी क्षेत्रात ‘ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी DRDOच्या नेतृत्वात यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
 2. सेवा जीवन विस्तार कार्यक्रमाचा भाग म्हणून ही चाचणी DRDO आणि टीम ब्रह्मोस यांच्याद्वारा प्रथमच भारतात विकसित या तंत्रज्ञानाची पुष्टी करण्यासाठी केली गेली. हे तंत्रज्ञान यावेळी प्रथमच भारतात विकसित केले गेले आहे.
 3. ब्रह्मोस कॉरपोरेशनचे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संबंधातून विकसित करण्यात आले आहे. ‘ब्रह्मोस कॉरपोरेशन’ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPO मशीनोस्त्रोयेनिशिया यांचा एक संयुक्त उपक्रम (JV) आहे.
 4. ब्रह्मोस (BrahMos) हे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे. ब्रह्मोस जवळपास 300 किलोचे विस्फोटक वाहून नेण्यास सक्षम आहे. ब्रह्मोसच्या नावावर सर्वाधिक गतिमान सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा जागतिक विक्रम आहे. याची गती ताशी सुमारे 3400 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
 5. भारतीय सेवेत ब्रह्मोस 2006 सालापासून आहे. हे एयर लॉंच्ड क्रुज क्षेपणास्त्र (ALCM) जल-थल-वायू अश्या तीनही परिस्थितीत भारतीय सेवेत आहे.
ब्राह्मोस 
 1. ब्राह्मोस हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था, या दोहोंच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. याचा पल्ला ३०० किलोमीटर अंतरापर्यंत आहे.
 2. ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा, आणि रशियातील मोस्कवा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र मॅक २.५ ते २.८ चा वेग गाठते. अमेरिकेच्या हार्पून (क्षेपणास्त्र) या सबसॉनिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. प्रयोगशाळेत याचा वेग मॅक ५.२६ असा नोंदला गेला आहे.
 3. हे क्षेपणास्त्र बहुपयोगी असून जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरूनही डागता येण्याची क्षमता यात असल्यामुळे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे.

 


Top