World Water Day: March 22

 1. पाणी (जल) म्हणजे जीवनाचा स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात साजरा केला जातो.
 2. यावर्षी हा दिवस “नेचर फॉर वॉटर” या विषयाखाली साजरा केल्या जात आहे.
 3. आज 663 दशलक्षहून अधिक लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही, शिवाय उपलब्धही नाही.
 4. प्रदुषित पाण्याचा वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो. या 21 व्या शतकाच्या पाण्यासंबंधीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपण निसर्गाचा कसा उपयोग करू घेऊ शकतो याला दर्शविणारी ही संकल्पना आहे.
 5. ब्राझीलच्या रियो द जेनेरियोमध्ये 1992 साली आयोजित पर्यावरण व विकास विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत (UNCED) जागतिक जल दिनासाठी पुढाकार घेतला गेला.
 6. 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेकडून अधिकृतपणे 22 मार्चला ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास घोषित करण्यात आले.
 7. प्रथम जागतिक जल दिन 1993 साली साजरा केला गेला होता.

पाण्यासंदर्भात भारतीय दृष्टीकोण 

 1. भारतात पाण्यावरून अनेक घटना घडलेल्या आहेत. शिवाय याविषयी अनेक तथ्ये देखील उदाहरणात आली आहेत, जे की पुढीलप्रमाणे आहेत- 
  1. मुंबईत रोज फक्त गाडी धुण्यासाठी 50 लक्ष लीटर पाणी वापरले जाते.
  2. दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या महानगरांमध्ये नळासंबंधी व्याधीमुळे दररोज 17-44% पाणी विनाकारण वाहून जाते.
  3. मागील 50 वर्षांमध्ये पाण्यासाठी 37 भीषण हत्याकांड झालेत. शिवाय पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.
  4. आणि अश्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
 2. भारतात पाडलेल्या वर्षावाचा केवळ 1% भारतात वापरात आणला जातो. पिण्यासाठी मानवाला दर दिवशी 3 लीटर आणि जनावरांना 50 लीटर पाण्याची आवश्यकता असते. 1 लीटर गायीचे दूध मिळविण्यासाठी 800 लीटर पाणी खर्च करावे लागते, तर 1 किलो गहू उगविण्यासाठी 1 हजार लीटर आणि 1 किलो भात उगविण्यासाठी 4 हजार लीटर पाण्याची आवश्यकता भासते. याप्रकारे भारतात 83% पाणी शेती आणि सिंचनासाठी उपयोगात आणले जाते.
 3. सध्या देशात भूजल उपसा करण्यावर कुठलेही कायदेशीर नियंत्रण नसून फक्त अप्रत्यक्ष असे प्रशासकीय नियंत्रण आहे. जसे, वित्तीय संस्थांनी कर्ज पुरवठ्यासाठी संबांधित राज्यस्तरीय भूजल यंत्रणांकडून भूजल उपलब्धी व उपशा बाबत तांत्रिक मान्यता अनिवार्य केलेली आहे; त्याच बरोबर नाबार्ड कडून होणाऱ्या कर्जपुरवठ्यासाठी विहिरींमधील अंतराचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत, विहिरींवरील पंपांसाठी बँकांद्वारे घ्यावयाच्या कर्जासाठी विद्युतपुरवठा नाकारणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश आहे. परंतु कायद्याअभावी सधन शेतकऱ्यांना भूजल उपशाच्या संवेदनाशील क्षेत्रात विहिरी खोदण्यापासून परावृत करणे प्रशासकीय नियंत्रणाद्वारे शक्य होत नाही. त्यामुळे सधन शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून अधिक क्षमतेच्या विहिरी करतात व त्याचा विपरीत परिणाम जवळच्या उथळ विहिरींवर होतो.
 4. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तरतूदींचा समावेश असलेल्या कायद्याचा मसुदा केंद्र शासनाने सर्व राज्यांना सन 1968 मध्ये देऊ केला होता. भूजल वापराच्या विविध बाबी, त्याच्या उपलब्धतेसंबंधी तांत्रिक, शास्त्रीय आणि सुयोग्य विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा स्रोत संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम-1993’ तयार केला.
 5. 1993 सालच्या या कायद्याचा मुलभूत हेतू पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर आधारित स्त्रोत सुरक्षित ठेवणे हा आहे. म्हणजेच भूजल साठयांचे संरक्षण करणे आणि त्याच्या विविक्षित परिसरातील भूजलाच्या अतिउपशामुळे स्रोतांवर होणारे विपरीत परिणाम थांबविणे हा आहे.


India's NCAA - the world's first certified digital repository

 1. संस्‍कृती मंत्रालयाचा राष्ट्रीय सांस्कृतिक दृक-श्राव्‍य अभिलेखागार (National Cultural Audiovisual Archives -NCAA) प्रकल्पाला जगातला पहिला विश्वासनीय डिजिटल भांडार याचे प्रमाणपत्र प्राप्‍त झाले आहे.
 2. इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र (IGNCA) कडून संचालित या प्रकल्पाला ब्रिटनच्या प्रायमरी ट्रस्‍टवर्दी डिजिटल रिपॉजिटरी ऑथरायझेशन बॉडी लिमिटेड (PTAB) या संस्थेकडून ISO 16363:2012 चे प्रमाणपत्र दिले गेले.
 3. NCAA दृक-श्राव्‍य सामुग्रीच्या रूपात विद्यमान भारताच्या सांस्‍कृतिक वारसाची ओळख पटवणे आणि त्यास डिजिटल माध्‍यमातून सुरक्षित करणे या उद्देशाने आहे.
 4. देशभरातील 25 शहरांमध्ये केल्या जाणार्‍या सर्वेक्षणाच्या आधारावर पुढील 5 वर्षांमध्ये या भांडारात 3 लाख तासांची दृक-श्राव्‍य सामुग्री एकात्मिक केली जाणार.
 5. मार्च 2018 पर्यंत 30,000 तासांच्या अप्रकाशित आणि बिगर-व्‍यवसायीकृत दृक-श्राव्‍य सामुग्रीला NCAA च्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्‍ध करून दिले जाणार.
 6. NCAA डिजिटल भांडाराची स्‍थापना डिजिटालय (DIGITALAYA) याच्या सहयोगाने केली गेली आहे, ज्याला सी-डेक, पुणे संस्थेनी विकसित केले आहे. याचे कार्यसंचालन ओपन आर्चिव्हल इंफॉरमेशन सिस्‍टम (OAIS) संदर्भ मॉडेल ISO 14721:2012 च्या दिशानिर्देशांतर्गत केले गेले आहे.
इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र (IGNCA)
 1. पार्श्वभूमी:-
 2. भारत सरकारच्या इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र (IGNCA) याची स्‍थापना 1985 साली करण्यात आली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे.
 3. मानवी व सांस्‍कृतिक वारसा क्षेत्रात डेटा बँक बनविण्यासाठी ही एक केंद्रीय संस्था म्हणून कार्य करते.
 4. हे केंद्र UNESCO कडून मान्‍यता प्राप्त आहे.
 5. ही संस्था दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधील कला, सांस्‍कृतिक वारसा आणि जीवन पद्धती यासंदर्भात क्षेत्रीय डेटा बँक विकसित करीत आहे.


'Paramveer Parvaan' - Book that tells the victory of Param Vir Chakra winners

 1. ‘परमवीर परवाने’ या शीर्षकासह परमवीर चक्र विजेत्यांची शौर्यगाथा सांगणार्‍या पुस्तकाचा पहिला भाग लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे.
 2. पुस्तकामध्ये कविता आणि गीतांच्या माध्यमातून देशाच्या रक्षणार्थ सर्वोच्च बलिदान देणार्‍या 11 परमवीरांची शौर्यगाथा वर्तवली आहे.
 3. पुस्तकात सन 1947-48 चे युद्ध आणि त्यानंतर सन 1965 पर्यंतच्या युद्धांच्या बाबतीत वृतांत दिले गेले आहे.
 4. डॉ. प्रभाकिरण जैन यांनी पुस्तकात 11 परमवीरांचे जीवन आणि पराक्रम यांचे वर्णन केले आहे.
  1. मेजर सोमनाथ शर्मा,
  2. लांस नायक करम सिंह,
  3. सेकंड लेफ्टनंट रामा राधोबा राणे,
  4. कंपनी हवालदार मेजर पीरूसिंह शेखावत,
  5. नायक जदुनाथ सिंह,
  6. कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया,
  7. मेजर धनसिंह थापा,
  8. सूभेदार जोगिंदर सिंह,
  9. मेजर शैतान सिंह,
  10. कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद
  11. ले. कर्नल अर्देशिर बुर्जोजी तारापोर यांचा समावेश आहे.


International forestry Day: 21st March

 1. दरवर्षीप्रमाणे 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन (International Day of Forests) म्हणून साजरा केला गेला. यावर्षी हा दिवस “फॉरेस्ट्स अँड सस्टेनेबल सिटीज” या विषयाखाली साजरा केला गेला.
 2. आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या वन प्रदेशाचे व झाडांचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण केली जाते तसेच लोकांचा जीवन विकास, शाश्वत विकासाला चालना आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी लाकूड ऊर्जेचे महत्त्व ठळक केले जाते.
 3. 21 डिसेंबर 2012 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी 21 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
 4. भारतातली वनसंपदा:-
  1. राज्य वन अहवाल 2017 अनुसार, 2015 सालच्या गणनेपासून भारतातील वनक्षेत्र केवळ 1% ने वाढले आहे. भारताचा 24.39% भाग वन आणि वृक्षांनी आच्छादलेला आहे. सरकारने 33% वनक्षेत्र साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  2. वनांना सहा श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते, ते आहेत – दमट उष्णकटिबंधीय वनक्षेत्र, कोरडे उष्णकटिबंधीय वनक्षेत्र, कोरडे वाळवंट क्षेत्र, पर्वतीय उप उष्णकटिबंधीय क्षेत्र, पर्वतीय समशीतोष्ण वनक्षेत्र, अल्पाइन क्षेत्र.

वनांसंदर्भात भारतापुढील आव्हाने आणि उपाय

 1. वनांसंदर्भात भारतापुढील आव्हाने:-
  1. भारतातील वनांसंबंधी सर्वात मोठी समस्या म्हणजे अपुरे आणि वेगाने कमी होत जाणारे वनक्षेत्र आहे. आधीच नमूद केल्याप्रमाणे, देशातील एकूण वनक्षेत्र अंदाजे 21% आहे, मात्र ते आवश्यकतेनुसार 33% हवे. लहान-मोठ्या वन उत्पादनांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी वनक्षेत्राचे हे अगदी लहान प्रमाण देखील गंभीर बाब ठरते.
  2. भारतामध्ये बहुतेक वने संरक्षणात्मक दृष्टीने आहे आणि व्यावसायिक वनांची कमतरता आहे. पर्यावरणाचा र्‍हास याविषयी जागरुकता वाढविल्यामुळे आपल्याला वनसंपदा व्यावसायिक वस्तु म्हणून वागविण्याऐवजी पर्यावरणासाठी संरक्षणात्मक घटक म्हणून पाहणे भाग पाडले आहे.
  3. वनांच्या वाढीसंबंधी भारतात शास्त्रीय तंत्रांचीही कमतरता आहे. भारतात वनांची केवळ नैसर्गिक वाढ होते. त्यामुळे त्यांची वाढ मंद गतीने होते आणि ते खराब उत्पन्न देणारी असतात.
 2. संबंधित समस्येसंदर्भातील उपाय:-
  1. वनीकरणासाठी सघन विकास योजना अंगीकाराने आवश्यक आहे. उच्च उत्पादन देणारे वाण योग्य भागात लावणे तसेच वृक्षतोड आणि वहनासाठी सुधारित तंत्र वापरणे आवश्यक ठरते.
  2. दूरस्थ आणि प्रवेश करण्यायोग्य नसलेल्या जंगलांसाठी योग्य वाहतूक सुविधा पुरविल्या जाव्यात. कच्च्या माला वाया न जाण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे.
  3. आग आणि कीड यासारख्या गंभीर समस्यांच्या समाधानासाठी योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक ठरते.


2019 Indian Science Council will be organized in Bhopal

 1. 106 वी ‘भारतीय विज्ञान परिषद’ (2019 Indian Science Congress) जानेवारी 2019 मध्ये बरकातुल्ला विद्यापीठ (भोपाळ, मध्यप्रदेश) येथे आयोजित केली जाणार आहे.
 2. “फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलजी” या विषयाखाली परिषद भरवली जाणार आहे.
 3. 20 मार्च 2018 रोजी मणीपुरच्या इंफाळमध्ये भारतीय विज्ञान परिषदेच्या 105 व्या सत्रात ‘7 वी महिला विज्ञान परिषद’ याच्या उद्घाटन प्रसंगी ही घोषणा करण्यात आली.
 4. भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे.
 5. याची 1914 साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात.
 6. यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत.
 7. 15-17 जानेवारी 1914 या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.


Autonomy of UGC's 60 Higher Education Institutions

 1. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) याने एका ऐतिहासिक निर्णयासह उच्च शैक्षणिक मानदंडांचे पालन करणार्‍या 60 उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता देऊ केली आहे. शिवाय 8 महाविद्यालयांना देखील स्वायत्तता दिली गेली आहे.
 2. या 60 उच्च शिक्षण संस्थांमध्ये 52 विद्यापीठांचा समावेश आहे. या 52 विद्यापीठांमध्ये 5 केंद्रीय विद्यापीठ, 21 राज्य विद्यापीठ, 24 मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि 2 खाजगी विद्यापीठ आहेत.
 3. ही विद्यापीठं UGC च्या अधीन असतील, मात्र त्यांना नवे अभ्यासक्रम, ऑफ-कॅम्पस केंद्र, कौशल्य विकास अभ्यासक्रमे, शोध पार्क आणि अन्य शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यास स्वतंत्रता असेल.
 4. त्यांना परदेशी विद्याशाखा ठेवणे, परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी, विद्याशाखांना प्रोत्साहन आधारित मिळकत देणे, शैक्षणिक भागीदारी आणि खुले दूरस्थ शिक्षण कार्यक्रमे सुरू करण्यास स्वतंत्रता असेल.
 5. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही भारतातली विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे.
 6. या आयोगाची स्थापना 28 डिसेंबर 1953 रोजी करण्यात आली.
 7. 1956 सालच्या कायद्यानुसार 'UGC'ला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला.
 8. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत हा आयोग येतो. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता राखणे हे UGC चे उद्दिष्ट आहे.


The Importance of Today's Day in History 22 march

महत्वाच्या घटना:-

 1. १७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
 2. १९४५: अरब लीगची स्थापना झाली.
 3. १९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
 4. १९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

जन्म:-

जन्म
 1. १७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८८८)
 2. १९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)
 3. १९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)
 4. १९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.
 5. १९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)
 2. १९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.
 3. २००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)


Top

Whoops, looks like something went wrong.