India's successful test of Amarnath Bhawan Agni II missile

 1. भारताने 29 फेब्रुवारीला ‘अग्नी-2’ या मध्यम वर्गात मोडणाऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे.
 2. ओडिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली. एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या चौथ्या संकुलामधून मोबाइल लाँचरच्या सहाय्याने ही चाचणी घेण्यात आली.
 3. अग्नी-2 ची वैशिष्ठ्ये:-
  1. हे क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन इतके आहे.
  2. एक टनापर्यंत वहनक्षमता असलेल्या अग्नी-2 चा मारा पल्ला 2000 किलोमीटर इतका आहे.
  3. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
  4. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) च्या अॅडवांस्ड सिस्टम्स लेबोरेटरीने विकसित केलेल्या ‘अग्नी’ या मालिकामधले हे क्षेपणास्त्र आहे.
  5. क्षेपणास्त्राला एकात्मिक पथदर्शी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) अंतर्गत तयार केले गेले आहे.
  6. हे दोन टप्पे असलेले क्षेपणास्त्र आहे. यामध्ये इंधनासाठी घन इंधन वापरण्यात आले आहे.
  7. यामध्ये हाय-अॅक्युरेसी नेव्हिगेशन सिस्टम बसविण्यात आले आहे.
‘अग्नी’ ची मालिका
 1. पार्श्वभूमी:-
 2. स्वदेशी ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राच्या मालिकेमध्ये आतापर्यंत मारा करण्याच्या पल्लानिहाय 5 प्रकार विकसित करण्यात आले आहेत. ते आहेत –
 3. अग्नी 1 - 700 किलोमीटरचा मारा पल्ला
 4. अग्नी 2 - 2000 किलोमीटरचा मारा पल्ला
 5. अग्नी 3 - 3000 किलोमीटरचा मारा पल्ला
 6. अग्नी 4 - 4000 किलोमीटरचा मारा पल्ला
 7. अग्नी 5 - 5000 किलोमीटरचा मारा पल्ला
 8. अग्नी क्षेपणास्त्र याआधीच लष्करामध्ये सामील करण्यात आले असून अत्यंत आधुनिक अशा यंत्रणेने सज्ज आहे.


Cabinet approval for 'irregular deposit scheme ban' and 'chit fund (amendment)' bill

 1. गुंतवणूकदारांच्या बचतीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने धोरणात्मक पुढाकार घेत संसदेत त्यासंबंधी विधेयके मांडण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 2. ही विधेयके आहेत -
  1. अनियमित ठेव योजना बंदी विधेयक-2018
  2. चीट फंड (दुरूस्ती) विधेयक-2018 
 3. अनियमित ठेव योजना बंदी विधेयक:-
  1. देशातल्या बेकायदेशीर ठेव योजनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक तयार करण्यात आले आहे. अशा योजना चालवणाऱ्या कंपन्या आणि  संस्था त्या संदर्भात सध्याच्या नियामक तृटी आणि कडक प्रशासकीय उपाययोजनांचा अभाव याचा लाभ उचलत गरिब जनतेची कमाई लुबाडत आहेत. त्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे.
  2. अनियमित ठेव योजनेंतर्गत ठेव स्वीकारणे, त्याची जाहिरात करणे, योजना चालवणे याला प्रतिबंध घालण्यात आला आहे.
  3. या विधेयकात तीन प्रकारचे गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहेत; त्यात अनियमित ठेव योजना चालवणे हा गुन्हा मानण्यात आला आहे.
  4. जरब बसण्यासाठी या विधेयकात जबर शिक्षेची आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  5. देशातल्या ठेव योजनांबाबत माहिती जमा करण्यासाठी आणि आदान प्रदान करण्यासाठी ऑनलाइन केंद्रीय माहिती निर्मितीची तरतूद आहे.
  6. ठेव आणि ठेव स्वीकारणारा यांची सर्वंकष व्याख्या यात करण्यात आली आहे.
  7. या कायद्याच्या तरतुदी लागू करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य शासनांवर सोपवण्यात आली आहे.
  8. हे विधेयक देशातल्या बेकायदेशीर ठेव योजनांना प्रतिबंध करण्यासाठी
  9. उपाययोजना:- 
   1. अनियमित ठेव योजनांना पूर्णतः प्रतिबंध आणि अश्या योजना चालवणाऱ्यांना कडक शिक्षा;
   2. ठेवीदारांना रक्कम परत करण्यात अपयशी ठरल्यास संबंधीताना कडक शिक्षा;
   3. ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्यास ठेवी परत करण्याबाबत खातर जमा करण्यासाठी राज्य शासनाकडून सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती आणि त्यांना मालमत्ता जप्त करण्यासह इतर अधिकार दिले जाणार;
   4. तसेच या कायद्या अंतर्गत येणारे गुन्हे आणि ठेवीदारांना पैसे परत करण्यासंदर्भात न्यायालयाची निर्मिती.

चीट फंड (दुरूस्ती) विधेयक

 1. चीट फंड क्षेत्राची  वृद्धी आणि त्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी ‘चीट फंड कायदा-1982’ मध्ये दुरूस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.
 2. चीट ड्रॉ करण्यासाठी कमीतकमी दोन ग्राहकांची आवश्यकता कायम ठेवण्यात आली आहे.
 3. कार्यवाहीचा अधिकृत अहवाल तयार करण्यासाठी व्हिडीयो कोन्फ्रेंसद्वारे दोन ग्राहक सहभागी होण्याला मान्यता देण्यात येणार.
 4. फोरमन याकडे कार्यवाहीचा अधिकृत अहवाल असेल, ज्यावर दोन दिवसात अशा दोन ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या होतील.
 5. फोरमनच्या मानधनाची मर्यादा 5% वरून 7% करणे.
 6. चीट फंड कायदा-1982 च्या कलम 85(ब) मध्ये दुरुस्तीमुळे कायदा तयार करताना 1982 साली निर्धारित 100 रुपयांची  कालबाह्य झालेली मर्यादा दूर करता येईल.
 7. राज्य सरकारांना मर्यादा निश्चित करण्याची आणि वेळोवेळी त्यात वाढ करण्याची परवानगी देण्यात येईल.


The establishment of the committee to settle the inefficient assets on the Reserve Bank of India

 1. भारतीय रिजर्व बँक (RBI) ने वाय. एच. मालेगाम यांच्या अध्यक्षतेत एक विशेषज्ञ समिती तयार केली आहे, जी बँकेमधील फसवणुकीच्या वाढत्या घटनांमागील करणांवर विचार करणार आहे.
 2. अश्याप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत त्यासाठी विविध उपाययोजनांची शिफारस करणार आहे.
 3. सोबतच बँकांमधील अकार्यक्षम मालमत्ता आणि त्याच्या संबंधित केल्या गेलेल्या मालमत्ता तरतूद यामधील प्रचंड तफावत यामागील कारणांचा तपास घेणार आणि या प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाय सुचविणार.
 4. भारतीय रिजर्व बँक (RBI) ही भारतातील मध्यवर्ती बँकिंग संस्था आहे, जी ‘भारतीय रुपया’चे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 5. भारतीय RBI अधिनियम-1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 रोजी पासून कार्य सुरू झाले.
 6. 15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या विकास धोरणांमध्ये एक महत्त्वाचा भाग निभावते. 
 7. ही एशियन क्लिअरिंग युनियनची सदस्य बँक आहे.


Madhu Mangesh Karnik received the Wanda Karandikar Life Gaurav Award

 1. राज्य सरकारतर्फे दिला जाणारा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. 
 2. तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.
 3. राज्याचे सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार, मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली.
 4. कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना , श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्यातील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 5. या सोहळ्यादरम्यान रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत.
 6. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.
 7. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल.
 8. यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे ते मराठी अभिमान गीताचे समूहगायन.
 9. विधानभवन परिसरात विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृहनेते चंद्रकांत (दादा) पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व अन्य मान्यवर मंडळी समूहगीताचे गायन करतील.


K.P Sharma Oli, the new Prime Minister of Nepal

 1. राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या नेपाळमध्ये युएमएल पक्षाचे अध्यक्ष के पी शर्मा ओली यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
 2. चीनधार्जिण्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे ओली यांनी यापूर्वी ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ या कालावधीत देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते.
 3. राजकीय अस्थिरतेमुळे सातच महिन्यातच शेर बहादूर देऊबा यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ते देशाचे ४०वे पंतप्रधान होते.
 4. यापूर्वी मे २०१७मध्ये पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांच्या राजीनाम्यानंतर शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता.
 5. प्रचंड यांनी अवघ्या नऊ महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते नेपाळचे ३९वे पंतप्रधान होते.
 6. नेपाळच्या संसदीय आणि स्थानिक निवडणुकीत देबुआ यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सीपीएनच्या पाठिंब्याने देबुआ नेपाळचे पंतप्रधान झाले होते.
 7. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ओली नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-युएमएलआणि प्रचंड नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-माओवादी यांच्या आघाडीने संसदेतील २७५ पैकी १७४ जागा जिंकल्या.
 8. ओली यांचा सीपीएन-यूएमएल पक्ष २७५ सदस्यांच्या संसदेत १२१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
 9. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ओली व सीपीएन- यूएमएलच्या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ओली हे नेपाळचे ४१ वे पंतप्रधान आहेत.
 10. सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा आहे.


Veteran journalist and writer Muzaffar Hossain passed away

 1. इस्लामी देशांतील विविध घडामोडींवर मराठीतून अभ्यासपूर्ण लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन यांचे  निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
 2. २० मार्च १९४० रोजी जन्मलेले मुझफ्फर हुसेन महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सर्वांना सुपरिचित होते.
 3. पाकिस्तान वा अरब देशांतील महत्त्वाच्या घटनांवर विविध वृत्तपत्रांचे संपादक त्यांना आवर्जून लिहायला सांगत.
 4. कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या विषयाचे नेमके विवेचन करणे, हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा पैलू होता.
 5. मुझफ्फर हुसेन यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली. त्यापैकी इस्लाम व शाकाहार, मुस्लिममानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद : एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 6. मुंबईतील विश्व संवाद केंद्राच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा जवळचा संबंध होता. परभणी येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 7. २००२साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकाकिता पुरस्कार (२०१४) देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 8. याशिवाय राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार त्यांना मिळाले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.