State Level Award for Koyna Bhawan for Excellent Dam Management

 1. महाराष्ट्रातील “कोयना धरण” हे मोठ्या व महत्वाच्या धरणांपैकी एक धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्वर येथुन उगम पावणाऱ्या कोयना नदीवर सन १९५४ ते १९६४ या कालावधीमध्ये हे धरण बांधण्यात आले आहे.
 2. या धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी तसेच सिंचनासाठी वापरण्यात येत असून जलविद्युत प्रकल्पाची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे.
 3. धरणातून होणाऱ्या उर्जा निर्मितीमुळे आपल्या राज्यामध्ये औद्योगिक विकास होण्यास हातभार लागला आहे. त्यामुळेच या धरणाला “महाराष्ट्राची भाग्यरेषा” असे म्हटले जाते.
 4. “केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळ” (Central Board Of Irrigation And Power ) या संस्थेने सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणास जाहीर केला आहे.
 5. या संस्थेमार्फत १९२७ पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना / संस्थांना गौरविण्यात येत आहे. 
 6. कोयना धरणाची लांबी ८०७ मीटर असून उंची १०३ मीटर आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता २९८१ दलघमी (१०५ टीएमसी) एवढी आहे.
 7. या धरणामुळे ८९२ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला जलाशय निर्माण झाला असून त्याला “शिवाजीसागर” या नावाने ओळखले जाते.
 8. धरणातून पूराचे पाणी सोडण्यासाठी ६ वक्राकार दरवाजे बसविण्यात आले असून या धरणामुळे पूरनियंत्रण होण्यास हातभार लागला आहे. 
 9. दि. १० डिसेंवर १९६७ रोजी कोयनानगर येथे ६.३ रिक्टर क्षमतेचा भुकंप झाल्यामुळे कोयना धरणाला तडे गेले होते.
 10. तेव्हापासून  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर “जलाशय प्रेरित भूकंप” (Reservoir Induced Seismicity) वर संशोधनास सुरुवात झाली आहे.
 11. सन १९६८ मध्ये धरणास पडलेल्या भेगा ग्राऊटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन १९७३ मध्ये या धरणाचा अपरिवाह (non-overflow) भागाचे तर सन २००६ मध्ये परिवाह (overflow) भागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. अशा प्रकारे धरण पुर्णपणे भुकंपरोधीत करण्यात आले आहे.
 12. धरणाचे बांधकाम होऊन आता ५५ वर्ष झाले आहेत तर कोयना भुकंपाला देखील ५० वर्ष झाले आहेत.
 13. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या ५० वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने (Best Maintained functional Project for more than 50 years) देण्यात आला आहे. 
 14. धरणाचा इतिहास -
  1. १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या धरणाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली होती.
  2. १९१८ नंतर पहिले जागतिक महायुध्द संपल्यानंतर टाटा कंपनीने कोयना प्रकल्प बांधण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. मात्र त्यानंतर १९२८ च्या जागतिक मंदीमुळे हा प्रकल्प रेंगाळला.
  3. १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी सन १९५१ मद्ये कोयना धरण विभाग सुरु करण्यात आला.
  4. सन १९५३ मध्ये प्रकल्पास मान्यता मिळाली आणि सन १९५४ मध्ये बांधकामास सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम १९६४ मध्ये पूर्ण करण्यात आले.
  5. या प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी कोयना धरण आणि कोळकेवाडी धरण ही दोन मोठी धरणे आहेत. कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युतनिर्मिती केंद्रांद्वारे उर्जा निर्मिती करण्यात येते. त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविदुत केंद्रामध्ये आणले जाते.
  6. या तीनही टप्प्यातून जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसऱ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात उर्जा निर्मिती करिता वापरले जाते. त्यानंतर हे पाणी  वशिष्टी नदीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते. 
  7. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरण्यासाठी दोन वेळा (सन २००२ मध्ये व सन २०१५ मध्ये) लेक टॅपिंग करण्यात आले व हा देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता व दोन्ही लेक टॅप यशस्वी झाले आहेत.
  8. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर होणे ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. 


Startup Ranking Announced; Maharashtra emerged emerging state

 1. ‘राज्यांची स्टार्टअप रँकींग २०१८’ आज येथे जाहीर करण्यात आली. या रँकींगमध्ये महाराष्ट्र राज्य उदयोन्मुख राज्य ठरले आहे.  
 2. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात या विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी ‘राज्यांचा स्टार्टअप रँकींग’अहवाल जाहीर केला.
 3. यावेळी सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते राज्यांना ६ श्रेणींमध्ये रँकींगनुसार प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 4. महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 5. राज्याच्या कौशल्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नवउपक्रम संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आणि विपणन व्यवस्थापक देवेंद्र नागले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 6. केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने घालून दिलेल्या निकषानुसार राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री यांनी ६ फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘स्टार्टअप रँकींग २०१८’ कार्यक्रमाची सुरुवात केली.
 7. या कार्यक्रमासाठी एकूण ७ आधार मानके आणि ३८ कार्यबिंदू ठरविण्यात आले. या आधारावर देशभरातील २७ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांचा तज्ज्ञ समितींकडून आढावा घेण्यात आला व परिक्षण करण्यात आले.
 8. या आधारावर अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार घालून दिलेल्या निकषावर गुणांकनाच्या आधारे सर्वोत्तम राज्य, शिर्ष राज्य,आघाडीचे राज्य, आकांक्षी राज्य,उदयोन्मुख राज्य आणि आरंभी राज्य अशा सहा श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. यात महाराष्ट्राचा समावेश उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत करण्यात आला आहे.      
 9. महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नवउपक्रम या नोडल संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.
 10. आजच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर  या संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन यांनी सांगितले, महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ मध्ये स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.
 11. केंद्राच्या स्टार्टअप इंडिया रँकींगसाठी मार्च २०१८ हा कालावधी ग्राह्य धरून रँकींग देण्यात आली आहे. अल्प कालावधीत राज्याने ही रँकींग मिळविल्याचे सांगत श्री.जॉन म्हणाले, राज्यात स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १६ कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. या माध्यमातून स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य पुरविण्यात येते.
 12. राज्यात अजून अशा २५ कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत तसेच राज्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे व गुंतवणूक व्हावी यासाठी राज्याबाहेरील २४ स्टार्टअप्सना परवानगी देण्यात आली आहे. या प्रत्येक स्टार्टअपला महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 13. यावर्षीच्या स्टार्टअप रँकींगच्या तुलनेत पुढील वर्षीच्या रँकींगमध्ये राज्याची प्रगती दिसून येईल, असा विश्वासही श्री.जॉन यांनी व्यक्त केला.


Bhojpuri will get constitutional status

 1. भोजपूरी, भोटी आणि राजस्थानी या तीन भाषांचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात येणार आहे. त्यामूळे या तिन्ही भाषांना लवकरच घटनात्मक दर्जा मिळणार आहे.
 2. अजून ३८ भाषा आठव्या अनुसूचित येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
 3. मात्र या तीन भाषा भुतान, सुरीनाम, मॉरिशस,त्रिनिनाद आणि नेपाळमध्येही बोलल्या जात असून तिथे या भाषांना मान्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 4. भाजपाचे नवी दिल्लीचे अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली. या तिन्ही भाषांना घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 5. जर संसदेचे कामकाज सुरळीत चालले असते तर याच अधिवेशनात ही घोषणा झाली असती, आता पुढच्या अधिवेशनात ही घोषणा होणार असल्याचे तिवारी म्हणाले.


Recommended to be 'age 27' of UPSC

 1. नागरी सेवा परीक्षेची वयोमर्यादा सर्वसाधारण वर्गवारीसाठी 2022-23 पर्यंत टप्प्याटप्प्याने 30 वरून 27 करावी, अशी शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे.
 2. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये बदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरजही निती आयोगाने व्यक्त केली आहे.
 3. ‘स्ट्रॅटजी फॉर न्यू इंडिया @ 75‘ दस्तऐवज जारी करण्यात आला.
 4. नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेमध्ये काही बदल करण्याची गरज निती आयोगाने व्यक्त केली आहे.
 5. नवीन अधिकाऱ्यांची विविध विभागांमध्ये त्यांच्या वयानुसार नियुक्ती करावी, असे निती आयोगाचे मत आहे.
 6. अधिकारी तरुण, तडफदार असावे, 2020 नंतर भारतामध्ये 65 टक्के जनतेचे वय 35 हून कमी असेल. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे सरासरी वय 25 वर्षे सहा महिने आहे.
 7. सध्या यूपीएससीसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे. ही बाब लक्षात घेऊन वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्या, त्याचप्रमाणे ठरावीक विषयामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे जागा द्यावी, असेही निती आयोगाचे म्हणणे आहे.
 8. त्याप्रमाणेच परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याची शिफारस केली आहे. परीक्षेची वयोमर्यादा 27 करावी, अनुभवी व्यावसायिकांना करार तत्त्वावर अधिकारी म्हणून घ्यावे आदी शिफारशी आयोगाने केल्या आहेत.


Patanjali Group of Industries will soon embark on a revolution in China

 1. योगगुरू रामदेवबाबा यांचा पतंजली आयुर्वेद उद्योग समूह लवकरच ग्लोबल होणार आहे.
 2. रामदेवबाबा यांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये पतंजली जागतिक बाजारात उतरणार आहे.
 3. चीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी चीन सरकारने कंपनीला 10 हजार एकर जमीन आणि भांडवली साह्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
 4. रामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. याउलट पतंजलीने या क्षेत्रात प्रचंड काम केले आहे.
 5. दरम्यान, आयकर विभागासोबतच्या वादात दिल्ली हायकोर्टाने पतंजलीची याचिका फेटाळून कंपनीला झटका दिला आहे.
 6. 2010-11 या आढावा वर्षाचे स्पेशल ऑडिट’ करण्यासाठी आयकर विभागास सहकार्य करा, असे निर्देशही कोर्टाने दिले. पतंजली समूहाने स्पेशल ऑडिटला कोर्टात आव्हान दिले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.