India ranked 103th on the list of global hunger index

 1. Concern worldwide आणि Welthungerhilfe यांनी जाहीर केलेल्या ११९ देशांच्या जागतिक उपासमार निर्देशांक यादीत भारताला १०३वे स्थान प्राप्त झाले.
 2. गेल्यावर्षीच्या तुलनेत (१००व्या स्थानावरून) भारताची ३ स्थानांनी घसरण झाली आहे. तसेच भारतातली उपासमार संबंधी पातळी ‘गंभीर’ म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे.
 3. भारतात कुपोषित लोकांची संख्या २०००सालच्या १८.२ टक्क्यावरून २०१८साली १४.८ टक्के इतकी कमी झाली आहे.
 4. तर याच काळात बाल मृत्युदर ९.२ टक्क्यावरून ४.३ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे आणि खुंटीत वाढ असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण ५४.२ टक्क्यावरून ३८.४ टक्के झाले आहे.
 5. या यादीमध्ये भारताची शेजारी राष्ट्रे चीन २५व्या, श्रीलंका ६७व्या, नेपाळ ७२व्या, बांगलादेश ८६व्या तर पाकिस्तान १०६व्या स्थानी आहे.
 6. या यादीमध्ये बेलारूस, क्युबा, एस्टोनिया, कुवैत, लाटविया, क्रोएशिया, माँटेनिग्रो, रोमानिया, तुर्की, युक्रेन हे देश आघाडीवर आहेत.
 7. झिम्बाब्वे आणि सोमालियामध्ये कुपोषण दर सर्वात जास्त आहे. ईस्ट-तिमोर, इरिट्रिया व बुरुंडी या देशांमध्ये बालकांच्या वाढीचा दर सर्वात कमी आहे. दक्षिण सुदानमध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
 8. चाड, हैती, मादागास्कर, सिएरा लिओन, यमन आणि जाम्बिया या देशांमधील उपासमारीची स्थिती फारच वाईट आहे. हिंसा, राजकीय अस्थिरता आणि दारिद्र्य ही यामागची मुख्य कारणे आहेत.
 9. २०१३ ते २०१७ या काळातल्या माहितीच्या आधारे हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील ४ निर्देशक विचारात घेण्यात आले आहेत.
  1. एकूण लोकसंख्येमध्ये कुपोषित असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण
  2. ५ वर्षाखालील बालकांमधील कुपोषित असणाऱ्या बालकांचे प्रमाण
  3. ५ वर्षाखालील बालकांमधील खुंटलेली वाढ असणाऱ्या बालकांचे प्रमाण
  4. ५ वर्षाखालील बालकांमधील बाल मृत्यूदर
 10. जागतिक उपासमार निर्देशांक:-
  1. जागतिक उपासमार निर्देशांक (Global Hunger Index) हे देशातील उपासमारीच्या परिस्थितीचे मापन करण्याचे एक बहुमितीय साधन आहे.
  2. हा निर्देशां क वर्षातून एकदा प्रसिद्ध केला जातो. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (आईएफपीआरआय) या संस्थेने हा निर्देशांक तयार केला.
  3. २००६मध्ये Welthungerhilfe या एनजीओच्या सहाय्याने प्रथम प्रसिद्ध केला. २००७पासून Concern Worldwide या एनजीओने सहप्रकाशक म्हणून सहभागी होण्यास सुरूवात केली.
  4. हा निर्देशांक ० ते १०० या दरम्यान मोजला जातो. शून्य याचा अर्थ शून्य उपासमार आणि १०० याचा अर्थ पूर्ण उपासमार.


New Academy Award winner for writer Maris Conde

 1. साहित्याच्या नोबेल पुरस्काराचा विरोध म्हणून सुरु करण्यात आलेले साहित्यातील न्यू अकॅडमी पारितोषिक लेखिका मेरिस कोंदे यांना मिळाले आहे.
 2. ४७ लेखकांमधून मेरिस यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी २०पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या आहेत. देसिरादा, सेगु आणि क्रासिंग द मॅन्ग्रोव या त्यांच्या मुख्य कादंबऱ्या आहेत.
 3. साहित्यातील न्यू अकॅडमी पारितोषिक
 4. हा पुरस्कार ‘न्यू अकॅडमी’ने सुरु केला आहे. न्यू अकॅडमीमध्ये १००पेक्षा जास्त स्वीडिश लेखक, कलाकार आणि पत्रकार आहेत.
 5. साहित्यातील नोबल पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या स्वीडिश अकादमीचा विरोध म्हणून या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
 6. स्वीडिश अकादमीशी संबंधित फोटोग्राफर जीन क्लॉड अर्नाल्ट याच्यावर लैंगिक शोषण आणि आर्थिक हितसंबधांवरुन गभीर आरोप झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
 7. अर्नाल्टने अॅकॅडमीची सदस्य असलेल्या एका महिलेशी विवाह केला आहे. तसेच अॅकॅडमीने अर्नाल्टच्या क्लबलाही अनेक वर्षे आर्थिक सहाय्य केले आहे.
 8. या वादानंतर जीन क्लॉड अर्नाल्टला ऑक्टोबरमध्ये दोन वर्षांची शिक्षाही सुनाविण्यात आली होती.
 9. त्यामुळे अॅकॅडमीतील १८ आजीवन सदस्यांनी अॅकॅडमीच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला.
 10. या पार्श्वभूमीवर स्वीडिश अकादमीने २०१८चा साहित्यातील नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे.


The Director General of CSIR Dr. Shekhar Mande

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने डॉ. शेखर मांडे यांना वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) महासंचालकपदी नियुक्त केले.
 2. ते गिरीश साहनी यांची जागा घेतील. गिरीश साहनी ऑगस्ट २०१८मध्ये सेवानिवृत्त झाले होते.
 3. या संस्थेचे सर्वोच्च पद डॉ. मांडे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा महाराष्ट्राकडे आले आहे. यापूर्वी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या पदावर काम केले आहे.
 4. शेखर मांडे हे एक स्ट्रक्चरल बायोलॉजिस्ट आहेत. सध्या ते पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 5. त्यांनी डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डायग्नोस्टिक्स सेंटर, हैदराबाद येथेही काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विज्ञान भारतीशीही ते संबंधित आहेत.
 6. इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी आणि नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस या महत्त्वाच्या विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्य आहेत.
 7. २००५मध्ये त्यांना विज्ञान क्षेत्रातील मानाच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 8. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद:-
  1. इंग्रजी: Council of Scientific and Industrial Research (CSIR)
  2. स्थापना: २६ सप्टेंबर १९४२ (नवी दिल्ली येथे)
  3. मुख्यालय: नवी दिल्ली
  4. ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. देशाचे पंतप्रधान सीएसआयआरचे अध्यक्ष असतात.
  5. ही भारतातील सर्वात मोठी संशोधन आणि विकास संस्था आहे. देशभरात सुमारे ३८ राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा या संस्थेद्वारे चालविल्या जातात.


'Indian Revolution Center 4.0' is being started at Mumbai

 1. जागतिक आर्थिक मंचने (डब्ल्यूईएफ) भारतात मुंबई येथे चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी ‘औद्योगिक क्रांती केंद्र ४.०’ सुरू केले. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केंद्र सुरू केले.
 2. दावोस येथे जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला फायदा होईल.
 3. यापूर्वी जागतिक आर्थिक मंचाने सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका), टोकियो (जपान) आणि बीजिंग (चीन) येथे अशा केंद्रांची स्थापना केली होती. त्यानंतर जगातले हे चौथे असे केंद्रआहे.
 4. कृत्रिम बुद्धीमत्ता, यंत्रांचा अभ्यास, इंटरनेट, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि बिग डेटा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारताला विकासाची नवी शिखरे गाठण्यास या केंद्राचा फायदा होईल.
 5. या केंद्रामध्ये सरकार आणि मोठे उद्योजक नवीन तंत्रज्ञानावर एकत्र कार्य करतील. सुरुवातीला, ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान प्रकल्प क्षेत्र म्हणून निवडले गेले आहेत.
 6. हे केंद्र राष्ट्रीय स्तरावर नवीन तंत्रज्ञानासाठी फ्रेमवर्क आणि प्रोटोकॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकार, व्यावसायिक नेते, स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह कार्य करेल. यामध्ये नीती आयोग सरकारच्या वतीने समन्वय साधेल.
 7. औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यत तंत्रज्ञानाचा वापरसाह्यकारी ठरेल.
 8. या केंद्रामुळे शेतीमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय साधता येऊ शकेल. हवामान बदलानुसार पीक पद्धतीतही बदल करणे शक्य होईल.
 9. पीक साखळी निर्माण करणे, रोगांवरील उपाय, दुष्काळ परिस्थितीवरही उपाय शोधणे सोपे होणार आहे.
 10. औद्योगिक क्रांती केंद्राच्या मदतीने ड्रोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रशासकीय सेवांमध्येही सुधारणा करता येतील.
 11. भविष्यात कृत्रिम बुध्दिमत्तेचा अधिकाधिक वापर औद्योगिक क्रांती केंद्राच्या साह्याने करणे शक्य होईल.
 12. जागतिक आर्थिक मंच:-
  1. इंग्रजी: World Economic Forum (WEF)
  2. स्थापना: जानेवारी १९७१
  3. मुख्यालय: कॉलॉग्नी, स्वित्झर्लंड
  4. डब्ल्यूईएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, त्याची स्थापना क्लॉस एम श्वाब यांनी सार्वजनिक-खाजगी सहकार्याने जागतिक स्थिती सुधारण्यासाठी केली आहे.
  5. ही एक ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहाय्याने ती कार्य करते.
  6. व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजातील अग्रगण्य लोकांना एकत्र आणून जागतिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे.
  7. जागतिक संस्था, राजकीय पुढारी, बुद्धिवादी लोकांना तसेच पत्रकारांना चर्चा करण्यासाठी या संस्थेने एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


Top