indian chief economic advisor arvind subramaniam resigned

 1. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली.
 2. अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता. परंतु, सरकारने त्यांचा एक वर्षाचा कालावधी वाढवला होता.
 3. जेटली यांनी ‘थँक यू अरविंद‘ या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट केला आहे. ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी अरविंद अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकेला माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 4. तसेच त्यामुळे आपल्या समोर पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी दिलेल्या सेवेबाबत त्यांचे आभार देखील मानले आहेत. ऑक्टोबरमध्ये ते अमेरिकेत जाणार आहेत, असे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
 5. मूत्रपिंडाच्या ऑपेरेशनमुळे सुट्टीवर असलेले अरुण जेटली गेले काही दिवस फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक विषयांवर भाष्य करत आहेत.


womens will get permission in shani shingnapur temple

 1. नगर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानात यापुढे महिलांनाही प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 2. श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यासह आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली.
 3. शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. गर्दीच्या प्रमाणात याठिकाणी सोयी-सुविधा निर्माण करण्यासह कल्याणकारी कार्य करणे आवश्‍यक होते.
 4. तसेच यापूर्वीच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराबाबत तसेच सध्या नव्याने नियुक्त विश्वस्तमंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत शासनास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
 5. त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही याठिकाणी घडल्या होत्या. त्यामुळे अस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन अधिनियमान्वये शनैश्वर देवस्थान राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


yoga day celebrated in150 countries

 1. 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात योगदिनानिमित्त प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत.
 2. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.
 3. पहाटेपासूनच योगदिन साजरा होण्यास सुरुवात झाली असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील डेहरादूनमधील कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
 4. या ठिकाणी जवळपास 50 हजार लोक उपस्थित असल्याची माहिती भाजपाने दिली आहे.
 5. दुसरीकडे राजस्थानमधील कोटा येथे बाबा रामदेव मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबत योगदिन साजरा करत असून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. या ठिकाणी तब्बल दोन लाख लोक एकत्र योग करणार आहेत.


BVR Subramaniam Chief Secretary of Jammu and Kashmir

 1. जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 2. राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी 20 जून रोजी ही नियुक्ती केली.
 3. तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी.बी. व्यास यांची राज्यपालांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 4. मुळचे आंध्रप्रदेशचे असलेले बीव्हीआर सुब्रमण्यम (वय 55 वर्षे) हे 1987व्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
 5. त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्यामुळे ते सध्या मुख्य सचिव असलेल्या बी.बी. व्यास यांची जागा घेतील.


United States left from united nation Human Rights Council

 1. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीरकेला आहे.
 2. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.
 3. 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतेच दीड वर्ष पूर्ण झाले होते.
 4. अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत असे वृत्त काही दिवसांपासून आले होते.
 5. तेव्हापासूनच अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. याबाबत केवळ अधिकृत घोषणा झाली नव्हती.


Top