BHAUSAHEB FUNDAKAR FALBAG LAGVAD YOJANA

 1. फळबागांची लागवड वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब (पांडूरंग) फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.
 2. फळांच्या व त्यांच्या प्रजातीच्या कलमांच्या रोपासाठी अर्थ सहाय्य या योजनेतून केले जाणार आहे.
 3. फळबाग लागवडीचा कालावधी दरवर्षी मे ते नोव्हेंबर असणार आहे. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्तमानपत्रात जाहीरात प्रसिद्ध करुन लाभार्थांकडून ऑनलाइन अर्ज मागवून योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
 4. या योजनेत बहुवार्षिक फळबाग लागवडीसाठी ३ वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे पन्नास, तीस, वीस टक्के अर्थसहाय्य अनुज्ञेय असेल.
 5. आंबा, डाळिंब, काजू, पेरू, चिंच, सीताफळ, आवळा, जाभूंळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजिर या पात्र फळांची कलमे व नारळाच्या रोपांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
 6. योजनेत अनुसुचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या आदिवासी उपाय योजनेतंर्गत आवश्यक तरतूद उपलब्ध केली जाईल.
 7. फळबाग लागवडीसाठी कोकणात दहा तर उर्वरीत महाराष्ट्रात सहा हेक्टर पर्यंत लाभ अनुज्ञेय असेल.
 8. योजनेत उपजिविका पूर्णत: शेतीवर अवलंबून असेल असे अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
 9. जमीन तयार करणे, माती-शेणखत, सेंद्रिय खतांनी खड्डे भरणे, अंतरमशागत सारखी कामे शेतकऱ्यांनी स्वतः करावी लागतील.
 10. तर खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे व ठिबक सिचंनद्वारे पाणी देणे या कामासाठी शासन १०० टक्के अर्थसहाय्य करेल.
 11. योजनेसाठी अनुदानाचे मापदंड असून ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मापदडांप्रमाणे राहतील.
 12. फळबाग लागवड योजनेत फळपीक निहाय तसेच पिकामधील अंतरानुसार खर्च व अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
 13. प्रत्यक्ष खर्च जर मापदडांनुसार निश्चित केलेल्या खर्चापेक्षा अधिक आला असेल तर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष खर्चाएवढेच अनुदान अनुज्ञेय असेल.
 14. पूर्वसमंती मिळाल्यापासून ७५ दिवसांमध्ये सर्व बाबीसह फळबाग लागवड करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांने फळबागेची लागवड केल्यानंतर त्याची नोंद वेळोवेळी पुस्तकात घेतली जाईल.
 15. लागवड केलेले क्षेत्र जिओ-टॅगींग करण्यात येईल. कलमे व नारळ रोपांची खरेदी बागवाणी मंडळातर्फे मानाकिंत खाजगी रोपवाटीकेतून करावी लागेल.
 16. शासकीय अनुदानाची रक्कम व देयकाची रक्कम यातील जी रक्कम कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.


NMU NAMES CHANGE TO

जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या विधेयकाला विधानसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.

विधेयकाला मंजुरी मिळण्यापूर्वी उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर सांगितले की, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला असून त्यात असलेले निकष पूर्ण केले जात आहेत. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन आहे.

राज्य सरकारकडून याचा वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती वायकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे विधेयक मंजूर करताना वायकर यांनी ही माहिती दिली.

मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यावे अशी मागणी काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केली होती. त्यावर वायकर यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही दिली.


Narendra modi will present at BRICS SUMMIT

दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिक्स परिषदेला हजर राहण्यासाठी जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात रवांडा आणि युगांडाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

ब्रिक्स परिषदेत मोदी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यासह महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

मोदी 23 ते 27 जुलै या कालावधीत तीन देशांना भेटी देणार आहेत, सर्वप्रथम ते रवांडाला दोन दिवस भेट देणार आहेत, भारतीय पंतप्रधान प्रथमच रवांडाला जाणार असल्याने ही भेट ऐतिहासिक आहे.

त्यानंतर ते 24 जुलै रोजी युगांडाला रवाना होणार असून तेथून दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव (आर्थिक संबंध) टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले.

जोहान्सबर्गमध्ये मोदी 10व्या ब्रिक्स परिषदेला हजर राहणार असून त्या वेळी या गटाचे नेते आंतरराष्ट्रीय शांतता-सुरक्षा, व्यापार आदी विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या शिखर परिषदेच्या पाश्र्वभूमीवर मोदी काही नेत्यांशी परस्पर संबंधांबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.


MICROSOFT CEO SATYA NADELA

 1. माहिती आणि तंत्रज्ञान सेवा आणि सॉफ्टवेअर पुरवठादार ‘मायक्रोसॉफ्ट’ने तब्बल 100 अब्ज डॉलरचा महसूल कमवला आहे. कंपनीने जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने पहिल्यांदाच महसुलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून, याचे शिल्पकार मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सत्या नाडेला ठरले आहेत.
 2. इंटेलिजंट क्‍लाउडमध्ये गेलेल्या भरीव गुंतवणुकीची मधुर फळे कंपनीला चाखण्यास मिळाली आहेत. नाडेला यांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या समभागाचे मूल्य तीन पटीने वाढले आहे.
 3. मायक्रोसॉफ्टने इंटेलिजंट क्‍लाउड बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. इंटेलिजंट क्‍लाउड, पर्सनल कॉम्प्युटिंग, सरफेस नोटबुक, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि सर्व्हर प्रॉडक्‍ट्‌सचा कंपनीची विक्री वाढण्यात महत्त्वाचा वाटा आहे.
 4. जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ‘मायक्रोसॉफ्ट’ला 100 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे


Top