netaji bose ash request to come in india

 1. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून भारत सरकारने परत आणाव्यात, असे आवाहन त्यांच्या कन्या अनिता बोस-पाफ यांनी केले आहे.
 2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तैवान येथे 18 ऑगस्ट 1945 रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात सप्टेंबर 1945 पासून पडून आहेत. अनिता बोस म्हणाल्या, की नेताजींच्या 73व्या स्मृतिदिनी मी त्यांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन पुन्हा एकदा करीत आहे.
 3. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारतात परत येण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे किमान त्यांच्या अस्थी तरी स्वतंत्र भारतात आणाव्यात.
 4. माझे वडील हे हिंदू होते, त्यामुळे परंपरेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेत करणे आवश्यक आहे. हिरोजी हिराबायाशी हे टोकियोतील जपान भारत असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी नेताजींच्या अस्थी भारतात नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
 5. हिराबायाशी हे जपानचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनी सांगितले, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या असून त्याबाबत भारताकडून अधिकृत विनंतीची गरज आहे.
 6. रेणकोजी मंदिरात नेताजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी तैपेईतील विमान अपघातात मरण पावले व नंतर त्यांच्या अस्थी टोकियोत आणण्यात आल्या. त्याचे काही पुरावे आशिष राय यांच्या अलिकडील पुस्तकात आले आहेत.


mp state has added 1 chapter of atal ji in the school education

 1. देशाचे माजी पंतप्रधान तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच निधन झाले.
 2. अटलजींची राजकीय तसेच साहित्यिक कारकिर्द दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या याच कार्याची ओळख येणाऱ्या पिढीला व्हावी यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
 3. अटल बिहारी वाजपेयी यांचा धडा अभ्यासक्रमात असावा यादृष्टीने मध्यप्रदेश शिक्षण मंडळाने पुढाकार घेतलाआहे. येथील शाळांच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे.
 4. शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी याबाबतची माहिती दिली.
 5. अटलजींचे कार्य हे देशापुरतेच स्तिमित नव्हते तर त्यांची महती जगभरात होती.
 6. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या कथांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला जातो. त्याअंतर्गत अटलजींच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार असल्याचे देवनानी यांनी सांगितले.
 7. आधुनिक भारतात अटलजी यांच्यासारखा दुसरा राजकीय नेता नाही. त्यांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रांचा पाठ्यपुस्तकात सहभाग करणे हीच खरी त्यांना शिक्षण विभागाची श्रद्धांजली ठरेल, असंही ते म्हणाले.


operation sahyog for kerala floods by indian army

 1. केरळमध्ये ८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पावसाने हाहाकार माजवला असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या मृतांचा आकडा ७० पेक्षा अधिक झाला आहे.

 2. केरळच्या १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 3. भारतीय लष्कराकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून, केरळमधील बचावकार्याला ‘ऑपरेशन सहयोग’ असे नाव देण्यात आले आहे.

 4. लष्कराने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली आहे.

 5. केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण जीवन कोलमडून गेले आहे.

 6. मुसळधार पावसामुळे केरळच्या इतिहासात प्रथमच ३९ पैकी ३५ धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत.

 7. संपूर्ण राज्यात बचाव मोहिम सुरु असून लोकांना मदत छावण्यांमध्ये पोहोचवले जात आहे.

 8. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही फोन करुन केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्याशी पूरस्थितीबाबत संवाद साधला.


rafel nadal and simona halep has won toranto masters tennis championship

 1. स्पेनच्या राफेल नदालने ग्रीसच्या स्टीफानो त्सित्सिपासवर मात करीत टोरंटो मास्टर्स टेनिस स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.
 2. नदालने त्सित्सिपासला ६-२, ७-६ (७-४) असे पराभूत केले.
 3. मास्टर्स दर्जाच्या स्पर्धामधील नदालचे हे ३३वे विजेतेपद आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचे हे ८०वे विजेतेपद आहे.
 4. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिमोना हॅलेपने स्लोअन स्टीफन्सचा ७-६, ३-६, ६-४ असा पराभव करत विजेतेपद मिळवले.


92 nd marathi sahitya sammelan in yawatmal

 1. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार असल्याची घोषणा केली आहे.
 2. त्यामुळे सुमारे ४५ वर्षांनंतर यवतमाळला साहित्य संमेलन होणार आहे.
 3. याआधी यवतमाळमध्ये १९७३मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते.
 4. ग. दि. माडगूळकर या संमलेनाचे अध्यक्ष तर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण उद्घाटक होते.


Top

Whoops, looks like something went wrong.