MPSC chalu ghadamodi, current affairs

1. काश्मीर खोऱ्यात दहशतावद्यांशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांना आता एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे.

2. तर विशेष म्हणजे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल देखील हे कवच निष्प्रभ ठरवणार आहे. कारण, स्वदेशी बनावटीचे मजबूत असे तब्बल 40 हजार बुलेटप्रुफ जॅकेट नुकतेच भारतीय सेनेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

3. तसेच हे स्वदेशी बनावटीचे बुलेटप्रुफ जॅकेट अत्यंत कठीण स्टीलपासून तयार झालेल्या एके- 47 राइफलच्या गोळ्या देखील झेलू शकते. शिवाय, अन्य शस्त्र देखील याच्यासमोर निष्प्रभ ठरतील.

4. बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेलमेटची देखील निर्मिती करण्यात आली आहे. हे हेलमेट देखील एके – 47 राइफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय निवड समितीने लोकेश राहुलला संघातून डच्चू देत रोहित शर्माला संधी दिली. रोहितनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं करत, कसोटी मालिकेतलं तिसरं शतक झळकावलं.

2. विशाखापट्टणम कसोटीत रोहितने पहिल्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावलं होतं. रांची कसोटीत अजिंक्य रहाणेसोबत रोहितने द्विशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

3. कसोटी मालिकेत सलामीवीर रोहितने 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

4. तसेच 2005 साली पाकिस्तानविरुद्ध मालिकेत सेहवागने सलामीला येत 500 पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. यानंतर तब्बल कोणत्याही भारतीय सलामीवीराला ही कामगिरी करता आलेली नव्हती.

5. तर अखेरीस तब्बल 14 वर्षांनी रोहित शर्माने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

6. याचसोबत रोहित शर्माने विनू मंकड, बुधी कुंदरन, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. या सर्व खेळाडूंनी कसोटी मालिकेत सलामीवीर या नात्याने 500 धावा पटकावल्या होत्या.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताने अलीकडेच कंपन्यांचा प्राप्तिकर कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तेथील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे.

2. भारताच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवताना नाणेनिधीने सांगितले,की हा निर्णय योग्यच असला तरी भारताने आर्थिक मजबुती वाढवली पाहिजे. आर्थिक घटकांबाबत दीर्घकालीन स्थिरता प्राप्त केली पाहिजे.

3. भारतात गेल्या दोन तिमाहीत आर्थिक वाढीचा दर कमी झाला असून तो 6.1 होता, पण 2020 मध्ये तो पुन्हा 7 टक्के होईल, असे सांगून ते म्हणाले,की पत धोरणातून मिळालेले प्रोत्साहन व कंपनी प्राप्तिकरातील कपात यामुळे गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आयएमएफचे माजी प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांची युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या (ईसीबी) प्रमुखपदी नेमणूक झाली. युरोपियन युनियन कौन्सिलने त्यांना युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षपदी नामांकन दिले होते.

2.आयएमएफमधील दुसर्‍या पाच वर्षाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी लागार्डे यांनी दोन वर्षांचा काळ सोडला. 63 वर्षीय लिगार्डे एक फ्रेंच वकील, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांना चांगले नेतृत्व आणि संस्थात्मक अनुभव तसेच राजकीय आणि आर्थिक अनुभव आहे. २०११ पासून त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अध्यक्ष आहेत.

3. युरोपियन सेंट्रल बँक ही युरोसाठी मध्यवर्ती बँक आहे आणि युरोझोनमध्ये आर्थिक धोरणाची अंमलबजावणी करते. यात युरोपियन युनियनच्या 19 सदस्य देशांचा समावेश आहे आणि हे जगातील सर्वात मोठे आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जेएसडब्ल्यू स्टीलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांची वर्ल्ड स्टील असोसिएशनचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची नियुक्ती एका वर्षासाठी केली जाते. असोसिएशनने एचबीआयएस ग्रुप को चे अध्यक्ष वाय.यू. योंग यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. या व्यतिरिक्त मंडळाने 14 सदस्यांची कार्यकारिणीही निवडली.

2. टी व्ही. नरेंद्रेंद्र, टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, आणि आर्सेलर मित्तल, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल. याव्यतिरिक्त, आरएल स्टील्स आणि एनर्जी लिमिटेड (इंडिया) नियमित सदस्य म्हणून आणि स्टील मंत्रालयाची संयुक्त वनस्पती समिती (जेपीसी) म्हणून संलग्न सदस्य म्हणून निवडले गेले.

3. लोह आणि स्टील उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था आहे आणि जगातील सर्वात मोठ्या उद्योगातील प्रतिनिधित्व आहे. याची स्थापना 10 जुलै 1967 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय ब्रसेल्स, बेल्जियममध्ये आहे.

4. जागतिक पातळीवरील सदस्य 160 पेक्षा जास्त स्टील उत्पादक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्टील उद्योग संघटना आणि स्टील संशोधन संस्था यासह जगातील सुमारे 85% स्टील उत्पादनांचे प्रतिनिधित्व करतात.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 20 ऑक्टोबर हा जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन तसेच जागतिक सांख्यिकी दिन म्हणून पाळला जातो.

2. कृ.भा. बाबर यांनी सन 1950 मध्ये समाजशिक्षणमाला स्थापन केली.

3. चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे सन 1962 मध्ये चीन-भारत युद्धास सुरवात.

4. सन 1969 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना झाली.

5. हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना सन 1970 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर.


Top