1. यूनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) ने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 2017 - वर्ल्डस् अपार्ट: रिप्रोडक्टिव हेल्थ अँड राइट्स इन द एज ऑफ इनइक्वेलिटी’ हा आपला जागतिक लोकसंख्येचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. कित्येक देशांमध्ये श्रीमंत-गरीब यांच्यातले अंतर वाढतच आहे. अश्या देशांमध्ये दर दस लाख लोकसंख्येपैकी शेकडो लोक दिवसाला 78 रुपये कमाईवर जगत आहेत. जगातील 2473 अब्जोपतींची मालमत्ता सुमारे 77000 खरब डॉलर असून हा आंकडा 2015 साली जगाच्या 80% देशांच्या GDP बरोबर आहे.
 3. विकसनशील देशांमध्ये सर्वाधिक गरीब कुटुंबातील (20%) महिलांपर्यंत कुटुंब नियोजन संकल्पना अजूनही पोहचलेली नाही. या 20% कुटुंबांमधील तरुणांचा (13-19 वर्ष) पालक बनण्याचा दर विकसित देशांच्या कुटुंबांच्या तुलनेत तीन पटीने अधिक आहे.
 4. जागतिक स्तरावर, जपानमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबतीत सर्वाधिक अंतर दिसून आला आहे, ज्यात समर्थित रोजगाराच्या बाबतीत 20% आणि समर्थित शिक्षणाच्या बाबतीत हे प्रमाण जवळपास 80% आहे.
 5. स्वीडन हा रोजगारासाठी समर्थन देण्याच्या प्रमाणात 95% आणि शिक्षणाच्या बाबतीत 98-99% या प्रमाणाने सर्वोत्तम देश ठरत आहे.
 6. विकसनशील देशांमध्ये 20% गरीब महिला कोणत्याही प्रशिक्षित मदती वाचून मुलांना जन्म देते. कमी विकसनशील देशांमध्ये फक्त 48% बालकांचा जन्म प्रशिक्षित मदतीने होत आहे, जेव्हा की विकसित देशांमध्ये गावांमध्येही 99% मुलांचा जन्म प्रशिक्षित मदतीने होतो. यात भारताचे स्थान जगात 18 वा देश आहे.
 7. लोकसंख्येच्या वृद्धीदराला स्थिर राखण्याच्या दृष्टीने भारताने विकास केला आहे, मात्र बालविवाह आणि माता मृत्यूदर यासारख्या दृष्टीने अजूनही मागासलेला आहे. भारतात माता मृत्यूदर (MMR) भलेही आंतरराष्ट्रीय सरासरी 216 पेक्षा चांगला (174) आहे, परंतू विकसित देशांच्या (MMR- 12) तुलनेत मागे आहे.
 8. भारतात 27% बालकांचे लग्न 18 वर्षाखालील वयातच होते. जगभरात बालविवाहाची सरासरी 28% आहे. भारतात एकूण प्रजनन दर (TFR) वैश्विक सरासरी 2.5 हून कमी आहे. प्राप्त आकड्यांनुसार हा दर 2.2 आहे.
 9. भारतात 15-49 वर्ष वयोगटातील केवळ 56% महिलाच गर्भनिरोधकांच्या वापर करत आहेत. एकूणच केवळ 50% लोक आधुनिक गर्भनिरोधक पद्धतींचा उपयोग करत आहेत.
 10. भारताने विद्यापीठांमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबतीत सकारात्मक कल दाखविलेला आहे, परंतू रोजगार कमी असल्याने समर्थित रोजगाराच्या संधी नाहीत. तर त्यांना संधी असताना फक्त 24-25% समर्थित रोजगार मिळवतात.


 1. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन खात्याने नव्या जीन थेरेपीला (जनुकीय संबंधित उपचार प्रणाली) वापरण्यास परवानगी दिली आहे. यापुढे अमेरिकेत कर्करोगास नष्ट करण्यासाठी रुग्णांच्या प्रतिकारक पेशीत जनुकीयदृष्ट्या बदल करणार्‍या आणखी एका नव्या उपचार पद्धतीला निर्णायक स्वरुपात वापरल्या जाणार.  
 2. काईट फार्मा कंपनीने विकसित केलेल्या ‘यसकार्ता’ या नवीन उपचार पद्धतीला दोन अयशस्वी केमोथेरपीनंतर  नॉन-होजकींस लिम्फोमा यासारख्या रक्ताच्या कर्करोगाच्या आक्रमक स्वरूपामध्ये प्रौढांसाठी वापरले जाणार. उपचारानंतर रुग्णांच्या पेशी कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करणार.
 3. रुग्णांकडून त्याच्या लाखो  T-पेशी  (प्रतिकारक शक्तीसाठी महत्वपूर्ण असलेल्या एक प्रकारच्या पांढर्‍या रक्त पेशी) प्राप्त केल्या जाणार आणि त्यांना गोठवून काईटकडे कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी जनुकीयदृष्ट्या त्यात बदल केले जाणार. त्यानंतर या रूपांतरित T-पेशी पुन्हा रुग्णाच्या रक्तात सोडल्या जाणार, जे पुढे कर्करोगास कारणीभूत ठरणार्‍या B-पेशींवर हल्ला चढवून त्यांना नष्ट करणार. रूपांतरित T-पेशीला ‘CAR-T पेशी’ नावाने संबोधले गेले आहे.
 4. यसकार्ता’ उपचार पद्धत मूलतः नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. स्टीव्हन रोझेनबर्ग यांच्या नेतृत्वाखाली विकसित केली गेली आहे. 2012 साली संस्थेने काईट फार्मा कंपनीशी करार केला, ज्यामधून कंपनीने संशोधनासाठी निधी दिला आणि परिणामांचे व्यावसायीकरण करण्याचे अधिकार प्राप्त केले.
 5. अमेरिकेत सुमारे 3,500 लोक यसकार्ता थेरपीसाठी उमेदवार असू शकतात. यामध्ये औषध सरळ रक्तवाहिनीत मिसळले जाणार आणि याला प्रत्येकासाठी वैयक्तिकरित्या तयार करणे आवश्यक आहे. याला किमान $373,000 चा खर्च येणार.


Top

Whoops, looks like something went wrong.