The definition of seven basic measurements, including kilograms, was changed

 1. 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2018 या कालावधीत व्हर्सिल (फ्रान्स) येथे ‘वजन व माप महापरिषद’ (General Conference on Weights and Measures -CGPM) याची 26वी बैठक पार पडली.
 2. या बैठकीत मूलभूत प्लांक्स कोंस्टंट (h) या वैज्ञानिक संज्ञेच्या आधाराने "किलोग्रामचे SI युनिट" याची 130 वर्ष जुनी म्हणजेच 1889 साली परिभाषित केली गेलेली व्याख्या पुनर्परिभाषित करण्याच्या हेतूने मतदान केले गेले.
 3. किलोग्राम सोबतच सेकंद (s), मीटर (m), एम्पियर (A), केल्विन (K), मोल आणि कॅन्डेला या सात मूलभूत मापांची व्याख्या बदलली गेली आहे.
 4. या ऐतिहासिक मतदानानंतर दिनांक 20 मे 2019 पासून नवीन व्याख्या लागू होणार आहेत.
 5. फ्रान्सच्या पॅरिस शहरात आंतरराष्ट्रीय वजन व माप संस्था (BIPM) याच्या कार्यालयात किलोग्रामचे आंतरराष्ट्रीय नमूना ठेवण्यात आले आहे.
 6. तो नमूना 90% प्लॅटिनम आणि 10% इरीडियम या धातूंनी बनलेला आहे आणि वृत्तचित्ती (cylinder) या आकारात असलेल्या या नमून्याचा व्यास 39 मिलिमीटर आणि उंची 39 मिलिमीटर इतकी आहे.
 7. 1875 साली स्थापन करण्यात आलेली ‘वजन व माप महापरिषद’ (CGPM) ही अचूक आणि नेमके मापांसाठी जगातली सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
 8. या समूहात भारतासह 60 देश आणि 42 सहकारी सदस्य देश आहेत.
 9. आंतरराष्ट्रीय वजन व माप संस्था (International Bureau of Weights and Measures -BIPM) हे CGPMचे मुख्य कार्यकारी मंडळ आहे, ते ‘इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स (SI)’ परिभाषित करण्यासाठी जबाबदार आहे.


An expert committee of RBI to resolve issues related to additional capital

 1. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) मंडळाने केंद्रीय बँकेसह 9.69 लक्ष कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाशी संबंधित समस्यांचे परीक्षण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्रातील बुडीत मालमत्तेच्या पुनर्रचनेसाठी एक योजना तयार करण्यासाठी सल्ला देण्यासाठीच्या हेतूने ही समिती तयार करण्यात आली आहे.
 3. याशिवाय, RBIने दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी सरकारी समभागांच्या खरेदी प्रणालीमधून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
 4. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 5. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
 6. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते.
 7. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


Maldives will be re-join in 'Commonwealth'

 1. मालदीवच्या मंत्रिमंडळाने 53 राष्ट्रांच्या राष्ट्रकुल (Commonwealth) यामध्ये पुन्हा समाविष्ट होण्यास मान्यता दिली आहे.
 2. मालदिवने ऑक्टोबर 2016 मध्ये राष्ट्रकुलमधून बाहेर पडले.
 3. त्यावेळी माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन सत्तेत होते. देशावर भ्रष्टाचार तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत दबाव टाकल्यानंतर देश राष्ट्रकुलमधून बाहेर पडले होते.
 4. राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स) ही 53 सदस्य राष्ट्रांची आंतरसरकारी संघटना आहे, जे भूतकाळात ब्रिटीश साम्राज्याखाली होते. याची स्थापना दिनांक 11 डिसेंबर 1931 रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे.
 5. ब्रिटनची संसद ही संघटनेची संस्थापक आहे.
 6. मालदीव हा हिंद महासागरातला एक उष्णकटिबंधीय बेटराष्ट्र आहे.
 7. हा देश 1000 पेक्षा जास्त कोरल बेटांपासून बनलेला आहे.
 8. माले हे देशाचे राजधानी शहर असून मालदीवी रुफिया हे राष्ट्रीय चलन आहे.


Civil Aviation Ministry's 'Air Service 2.0' Portal inaugurated

 1. केंद्रीय नागरी विमान उड्डयण मंत्रालयाकडून दिनांक 19 नोव्हेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत ‘एयर सेवा 2.0’ या संकेतस्थळ आधारित पोर्टलच्या आधुनिक आवृत्तीचे आणि मोबाईल ॲपचे उद्‌घाटन करण्यात आले आहे.
 2. यावेळी एक वर्षात प्रवाशांच्या तक्रारींचे तत्परतेने निवारण केल्याबद्दल चेन्नई विमानतळाला चॅम्पियन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
 3. हवाई वाहतुकीच्या सर्व सुविधांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पोर्टल आणि ॲप तयार करण्यात आले आहे.
 4. त्याशिवाय या ॲपमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुधारित यंत्रणा, विमानाच्या वेळा, वेळापत्रक यांची अद्ययावत माहिती प्रवाशांना मिळू शकेल.


Submit the report regarding the industrial park ranking system to the commerce ministry

 1. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयापुढे औद्योगिक पार्क क्रमवारीता संबंधी प्रणाली बाबत अहवाल सादर केला गेला आहे.
 2. हा अहवाल औद्योगिक धोरण व जाहिरात विभागाने (DIPP) तयार केला आहे.
 3. औद्योगिक पार्कमधील राज्ये आणि 3994 औद्योगिक समुहांमधील पायाभूत सुविधेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी हा अभ्यास केला गेला आहे.
 4. हा अहवाल अंतर्गत पायाभूत सुविधा; बाह्य पायाभूत सुविधा; व्यवसाय सेवा आणि सुविधा आणि पर्यावरण; सुरक्षा व्यवस्थापन या चार घटकांवर आधारित आहे.
 5. भारत उत्पादन क्षेत्रात जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभीकरण (EoDB 2019) या क्रमवारीतेमध्ये 190 देशांमध्ये 77 या क्रमांकावर आहे.
 6. या क्रमवारीतेमध्ये भारताला प्रथम 50मध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मंत्रालयाने त्यासंबंधी यावेळी अभ्यास केला आहे.


Top