Shivangi Pathak made the sixteenth year of Sir Mount Everest

 1. जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणे कसलेल्या गिर्यारोहकालाही आव्हानात्मक असते. मात्र, अवघ्या 16 वर्षांच्या शिवांगी पाठक हिने गुरुवारी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे.
 2. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं शिवांगीने सांगितलं.
 3. अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्टची यशस्वी चढाई करणं, हे स्वप्न होतं आणि याद्वारे महिला कोणतंही लक्ष्य पार करण्यासाठी सक्षम आहेत हे दाखवून द्यायचं होतं, असं शिवांगी म्हणाली.
 4. वयाच्या दहाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा यांचा व्हिडीओ शिवांगीने पाहिला होता.
 5. अरुणिमा यांचा व्हिडीओ पाहून ती इतकी प्रभावित झाली की तेव्हापासून तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर शिवांगीने गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं.
 6. प्रशिक्षणादरम्यान शिवांगीने केदारनाथ, बद्रीनाथच्या मोठमोठ्या टेकड्या पार केल्या.
 7. हरिणायाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या शिवांगीने ‘सेव्हन समिट ट्रेक’मध्ये सहभागी होऊन एव्हरेस्टची चढाई करण्याचा पराक्रम केला आहे. शिवांगीचे वडील राजेश पाठक हे व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.
माउंट एव्हरेस्ट
 1. उंची - २९,०२९ फूट (८,८४८ मीटर) उंचीमध्ये क्रमांक
 2. ठिकाण -  सागरमाथा अंचल, नेपाळ, तिबेट, चीन
 3. पर्वतरांग - हिमालय
 4. गुणक - 27°59′17″N 86°55′31″E
 5. पहिली चढाई - २९ मे १९५३ ( एडमंड हिलरी, तेनसिंग नोर्गे)
 • माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
 • सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली.
 • ह्या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता.
 • त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.

 


Royal Bengal Tigers have been genuinely sequenced

 1. यावेळी प्रथमच रॉयल बंगाल वाघ या लुप्तप्राय प्राणी प्रजातीचे जनुकीय अनुक्रमन (genome sequenced) केले गेले आहे. हा प्राण्यांचा उच्च दर्जेदार आराखडीत जनुकीय अनुक्रम तयार करण्याच्या योजनेचा भाग आहे.
 2. बंगाल वाघाचे (पॅंथरा टायग्रिस टायग्रिस)जनुकीय अनुक्रम आणि त्याची वैविध्यपूर्ण जनुकीय ओळख सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलीक्युलर बायोलॉजी (CSIR-CCMB) आणि हैदराबादमधील एक खाजगी कंपनी येथील शास्त्रज्ञांनी पूर्ण केली आहे. याबाबतचा तपशील BioRxiv मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
 • अभ्यासाचे निष्कर्ष
 1. बंगाल वाघाच्या जनुकाची तुलना अम्यूर किंवा सायबेरियन वाघांच्या जनुकाशी केली गेली आहे. या दोन उपप्रजाती विविध वातावरणात आढळून येतात आणि ही नवीन माहिती दोन्हीमधील मुख्य फरक उघड करतो.
 2. अम्यूर वाघ मुख्यत: निम-समशीतोष्ण आणि हिमाच्छादित अधिवासात आढळून येतो. तर बंगाल वाघ हिमालय पर्वतराजी ते मध्य भारत पठार आणि पश्चिम घाट ह्या वैविध्यपूर्ण उष्णदेशीय अधिवासात आहेत.
 3. अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, दीर्घकाळापासून असे समजले जात होते की सिंगल न्यूक्लियोटाइड व्हेरीएंट (SNVs) बहुतेक वैयक्तिक जनुकीय विविधतेमध्ये योगदान देतात. परंतु आता हे ओळखले गेले की, संरचनेची विविध रूपे आणि कॉपी नंबर विविधता यासारखे जनुकामधील मोठे बदल देखील रोगाबद्दल संवेदनशीलता, वातावरणाला संवेदनशील जनुकीय विविधता आणि रोग प्रतिकारशक्ती याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
 4. धोक्यात आणि विविध विलोपन जोखीम असूनही, वाघाची ही जात सर्वाधिक जनुकीय विविधतेसह संख्येत सर्वाधिक भरते आणि यांची वन्यजीवनात जगण्याची अधिकाधिक शक्यता आहे.
 5. संशोधकांचा असा दावा आहे की जंगलातील लुप्तप्राय वन्य प्रजातींच्या जनुकांमधील मोठ्या प्रमाणातील संरचनेची विविध रूपे आणि कॉपी नंबर विविधता यांच्या शोधावर तयार केला गेलेला पहिलाच अहवाल आहे.
 6. अशा अभ्यासामुळे संवर्धन व्यवस्थापनात सुधारणा करण्यास देखील मदत होईल, कारण संकटग्रस्त प्राण्यांच्या दुसर्‍या जागी स्थलांतरित करताना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची चांगल्या प्रकारे समजूत अधिकार्‍यांना मिळणार.


Supreme Court Approval for Cauvery Management Plan draft

 1. सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीच्या तीरावर वसलेल्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी यांच्यात न्यायपूर्ण पाणी वाटपासाठी कावेरी व्यवस्थापन योजनेसाठी केंद्र शासनाच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली आहे.
 2. भारताचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही मंजूरी दिली. आता न्यायालयाच्या १६ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार ६ आठवड्यांच्या आत कावेरी व्यवस्थापन योजना तयार करावी लागणार, ज्यामध्ये कावेरी व्यवस्थापन मंडळ देखील समाविष्ट असेल.
 3. कर्नाटकातील तळकावेरीत उगम पावणारी कावेरी नदी ३२२ किलोमीटर प्रवास करून तमिळनाडूत प्रवेश करते. तमिळनाडूत ४८३ किलोमीटर अंतर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळते. कावेरी नदी कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांसाठी पाण्याची पूर्तता करण्यासाठी एक प्रमुख स्त्रोत आहे.
पार्श्वभूमी
 1. कावेरी नदीच्या खोर्यातील ८१,१५५ हेक्टर क्षेत्रापैकी ४३,८६८ हेक्टर (५४.१ टक्के क्षेत्र) तामिळनाडूत येते तर ३४,२३४ हेक्टर (४२.२ टक्के क्षेत्र) कर्नाटकात येते. याशिवाय केरळ आणि पाँडिचेरीतही थोडे क्षेत्र आहे. यानुसार कावेरीच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी वेळोवेळी अनेक करार, निर्णय घेण्यात आलेले आहेत.
 2. म्हैसूर राज्यात कावेरीवर बंधारे घालण्याला सुरुवात झाली असता तंजावरच्या जिल्हाधिकार्याने इ.स. १८०७ साली पाणी कमी मिळते अशी तक्रार केली होती. म्हैसूरमधील दुष्काळ निवारणासाठी कावेरीवर धरणे बांधण्याचा विचार इ.स. १८७० मध्ये पुढे आला असता हा वाद पुन्हा उफाळून आला. मद्रास प्रांताची संमती असल्याखेरीज म्हैसूर नवी धरणे बांधणार नाही अशी इ.स. १८९२ साली तडजोड केली गेली असली तरी वाद चालूच राहीला. इ.स. १९२४ साली कृष्णराजसागर धरणाचा प्रस्ताव आला तेव्हा कावेरीच्या एकूण पाण्याच्या उपलब्धतेचा व उभय भागातील शेतकर्यांच्या गरजेचा विचार करून एक नवा करार केला गेला.
 3. इ.स. १९२४ मध्ये पन्नास वर्षांसाठी झालेल्या या करारात कावेरीच्या पाण्यावर तामिळनाडूचा अधिक हक्क असल्याचे मान्य झाले. या करारानुसार म्हैसूर संस्थानाने कृष्णराजसागर आणि मद्रास प्रांताने मेत्तूर ही धरणे बांधली. इ.स. १९७४ मध्ये कराराची मुदत संपल्यावर कर्नाटकने नव्या धरणांची कामे हाती घेऊ नयेत म्हणून तामिळनाडूने न्यायालयात धाव घेतली.

 


Top