1. राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच कार्यान्वित होत असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत या कार्यशाळेच्या उभारणीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
  2. संसर्गजन्य संशोधन प्रयोगशाळेत सूक्ष्मजीव शास्त्र, विषाणू विभाग, रक्तातील पातळ द्रव्याच्या अभ्यासाचा विभाग व रेण्वीय विभाग, असे चार विभाग कार्यरत राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
  3. इथे एकूण १३ रोगांवरील तपासण्या होणार आहेत. या प्रयोगशाळेत वीजपुरवठा अखंड उपलब्ध राहावा, यासाठी जनरेटर सुविधा, तसेच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम लवकरात-लवकर पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी डॉ. सावंत यांनी दिल्या.
  4. बैठकीत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. व्ही. एस. सिंग, महसूल व वनविभागाचे सचिव विकास खारगे, संचालक डॉ. सतीश पवार, एन.आय.व्ही. पुणेचे संचालक डी. टी. मोर्य, सहसंचालक डॉ. एम. एस. डीग्गीकर, डॉ. प्रदीप आवटे, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि. प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपसंचालक समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.


mpsc exam

  1. सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली आहे.
  2. मुंबई-पुणे एक्स्प्रेसजवळ किवळे येथे १५ एकराच्या विस्तृत जागेत विद्यापीठाचा कॅम्पस उभारण्यात आला असून राज्य शासनाने त्याला नुकतीच मान्यताही दिली आहे. कारखाने आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील अनुभवात्मक शिक्षण मिळावे तसेच उद्योग आणि बाजारपेठेत नोकरीसाठी प्रशिक्षित युवक उपलब्ध व्हावेत या हेतूने सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याची माहिती सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार व प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनी दिली.
  3. या वेळी सचिन कामत, एस. के. जैन, पुनिता गुप्ता उपस्थित होते. स्कूल आॅफ आॅटोमोबाईल अ‍ॅन्ड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, रिटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, अर्बन डेव्हलपमेंट, ब्युटी अ‍ॅन्ड वेलनेस, हेल्थ सायन्सेस अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, पब्लिक पॉलिसी अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आदी कोर्सेसचा या विद्यापीठामध्ये समावेश असणार आहे. डिप्लोमा कोर्सेससाठी ३ ते १५ हजार, इंजिनिअरिंगसाठी १ लाख ८० हजार रुपये शुल्क असेल, अशी माहिती स्वाती मुजुमदार यांनी दिली.


Top