The WHO classified gaming addiction as mental illness

 1. व्हिडिओ गेम्स खेळणे हे सध्या एक वाढते व्यसनच म्हटले जावे. आज युवांमध्ये याचे प्रमाण अधिक वाढले आहे आणि हे धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे.
 2. WHO ने त्याच्या ‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज (ICD-11)’ याच्या 11 व्या आवृत्तीत निदान करण्यायोग्य स्थिती म्हणून "गेमिंग आजार" याला वर्गीकृत केले आहे.
 3. व्हिडिओ गेम्सचा अतिवापर हा मानसिक रोग असल्याचे ICD यामध्ये नमूद करण्यात आल्यामुळे, गेमिंग आजार ही एक मानसिक स्थिती असून वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याच्या उपचारांसाठी आणि धोका ओळखण्यासाठी आधार म्हणून हा निर्णय आता काम करणार.
 4. गेमिंग आजार:-
 5. डिजिटल-गेमिंग किंवा व्हिडिओ गेमिंग याला अन्य क्रियाकलापांपेक्षा अधिकाधीक महत्त्व देणे आणि इतर हितसंबंध आणि दैनिक हालचालींपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते आणि नकारात्मक परिणाम दिसूनही खेळणे वाढत जाते.
 6. व्हिडिओ गेम्सपासून दूर राहु न शकणे, खेळ मधेच थांबवता न येणे, खेळत असताना इतर कशाचेही भान न राहणे, मित्र आणि कुटुंबियांमधील संपर्क तुटणे, अभ्यासात कमी पडणे आणि सलग कमीतकमी 12 महिने गेमिंग बाहेरच्या जगाकडे दुर्लक्ष करणे अशी या मानसिक रोगाची लक्षणे असून साधारण वर्षभर ही लक्षणे दिसल्यास मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे WHO ने म्हटले आहे.
 7. एका अभ्यासानुसार, सामान्य लोकसंख्येतील 0.3-1% पर्यंत इंटरनेट गेमिंग आजाराने झुंजत आहेत. शिवाय अनेक देशांमध्ये अत्याधिक खेळल्याने मृत्युच्या घटनाही आढळून आलेल्या आहेत. 


Appointment of 'ICGS Queen Rashmoni' in Visakhapatnam

 1. ‘ICGS राणी रश्मोनी’ हे जहाज भारतीय तटरक्षक दलामध्ये विशाखापट्टणम येथे नियुक्त करण्यात आले आहे.
 2. हे जहाज नवदीप सफाया यांच्या आदेशाखाली आहे.
 3. ‘ICGS राणी रश्मोनी’ हे 51 मीटर लांबीचे जहाज आहे.
 4. हे जहाज पाण्यावर 34 नॉट्स या गती धावू शकते.
 5. याची चार अधिकारी आणि 34 व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता आहे.
 6. यामध्ये अत्याधुनिक ग्लोबल मेरीटाइम डिस्ट्रेस अँड सेफ्टी सिस्टम (GMDSS) बसविण्यात आलेली आहे.
 7. वेगवान गस्त जहाज (Fast Patrol Vessel -FPV) प्रकल्पामधील पाचपैकी हे शेवटचे जहाज आहे.
 8. यापूर्वी ‘ICGS राणी अब्बाक्का’, ‘ICGS राणी अवंती बाई’, ‘ICGS राणी दुर्गावती’ आणि ‘ICGS राणी गैदिनलिऊ’ ही चार जहाजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विविध ठिकाणी सेवेमध्ये आहेत.


 Indian-born Tommy Thomas as the Malaysian Advocate General

 1. मलेशियातील सत्ताबदलानंतर तेथील महाधिवक्तापदी (अ‍ॅटर्नी जनरल) भारतीय वंशाचे बॅरिस्टर टॉमी थॉमस यांची नेमणूक झाली आहे.
 2. माजी पंतप्रधान नजीब रझाक व त्यांची पत्नी यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत ते महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
 3. मलेशियन विकास निधीत नजीब रझाक यांनी केलेले घोटाळे जनतेच्या रोषास कारण ठरले होते. याचाच फायदा घेऊन रझाक यांच्याविरोधात महाथीर महंमद यांनी उतारवयातही नेतृत्व करून सत्ता मिळवली.
 4. थॉमस हे मलेशियात गेल्या ५५ वर्षांत महाधिवक्तापदी विराजमान झालेले पहिलेच अल्पसंख्याक व्यक्ती आहेत.
 5. खरे तर मलेशियातील ३१ दशलक्ष लोकांपैकी दोनतृतीयांश लोक हे वांशिक मलय वंशाचे व मुस्लीम आहेत. त्यांनी हे पद मुस्लीम व्यक्तीला देण्याची मागणी केली असताना थॉमस यांची केलेली नेमणूक ही वेगळी आहे.
 6. थॉमस हे गेली ४२ वर्षे मलेशियात वकिली व्यवसायात काम करीत आहेत. ते मँचेस्टरविद्यापीठाच्या व्हिक्टोरिया इन्स्टिट्युय़ूशनचे माजी विद्यार्थी आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
 7. ब्रिटनमध्ये तेथील वकील संघटनेने १९७५मध्ये त्यांना निमंत्रित केले होते, पण नंतर १९७८ मध्ये त्यांनी मलेशियात वकिली सुरू केली.
 8. थॉमस यांनी १९८४-८७ या काळात ‘इन्साफ’ या नियतकालिकेचे संपादन केले होते. एकूण १५० महत्त्वाचे खटले त्यांनी लढवले.
 9. बॅरिस्टर असलेले थॉमस हे केवळ वकील म्हणूनच नाही, तर समाजशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिध्द आहेत.
 10. अर्थशास्त्र, राजकारण, इतिहास यात त्यांना तेवढाच रस असून त्यांनी वेगवेगळ्या मंचावर शोधनिबंधही सादर केले आहेत.


 According to the CIA report, RSS Nationalist Congress Party

 1. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांचा उल्लेख ‘धार्मिक दहशतवादी समूह’ असा केला आहे.
 2. राजकीय दबाव टाकणाऱ्या संघटनांच्या यादीत सीआयएने या बजरंग दल आणि विहिंपचे नाव समाविष्ट केले आहे.
 3. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही संघटना राष्ट्रवादी असल्याचे निरीक्षण सीआयएने नोंदवले आहे.
 4. सीआयएने काश्मीरच्या हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी संघटना असल्याचे नमूद केले आहे.
 5. तर राज्यसभा खासदार मौलाना मेहमूद मदानी यांच्या उलेमा-ए-हिंद या संघटनेला धार्मिक संघटनेचा दर्जा देण्यात आलाय.
 6. ‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे वार्षिक प्रकाशन आहे. या फॅक्टबुकमध्ये देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, उर्जा, दळणवळण सेवा, लष्कर याबाबतची माहिती दिलेली असते.


 New Zealand's youngest cricketer to score double century in Amelia Kerr ODI

 1. न्यूझीलंडची अष्टपैलू क्रिकेटपटू अॅमेलिया केर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे.
 2. अवघ्या १७व्या वर्षी अॅमेलियाने आयर्लंड विरुध्दच्या सामन्यात १४५ चेंडूत ३१ चौकार आणि २ षटकारांची बरसात करत नाबाद २३२ धावा केल्या.
 3. एकदिवसीय सामन्यातील हे तिचे पहिलेच शतक आहे. तिने आपल्या पहिल्याच शतकाला द्विशतकात परिवर्तित करण्याचा पराक्रम देखील केला.
 4. यानंतर अॅमेलियाने गोलंदाजीतही कमाल दाखवत आयर्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून संघाला सहज मिळवून दिला.
 5. पुरुष आणि महिलांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतक्या कमी वयात (१७ वर्ष २४३ दिवस) द्विशतक ठोकणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
 6. महिला क्रिकेटमध्ये वन-डेत २०० धावा ठोकण्याचा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने केला होता.
 7. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :-
 8. अॅमेलिया केर (न्यूझीलंड) : नाबाद २३२ धावा वि. आयर्लंड
 9. बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : नाबाद २२९ धावा वि. डेन्मार्क
 10. दिप्ती शर्मा (भारत) : १८८ धावा वि. आयर्लंड


Top