C. N. R. Rao declares 'Sheikh Sheikh International International Award for Subject Research'

 1. भारताचे नामांकित शास्त्रज्ञ भारतरत्न सी. एन. आर. राव यांची पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ (Sheikh Saud International Prize for Materials Research) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 2. यावर्षीपासून संयुक्त अरब अमिरात या आखाती देशाच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड मटेरियल या संशोधन संस्थेकडून हा पुरस्कार दिला जात आहे.
 3. एक लक्ष डॉलर एवढी रोख रक्कम, एक पदक आणि चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 4. दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी रास अल खैमान (UAE) येथे आयोजित ‘इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन अॅडव्हान्स्ड मटेरियल्स’ या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 5. चिंतामणी नागेश रामचंद्र राव:-
  1. चिंतामणी नागेश रामचंद्र राव (जन्म: 30 जून 1934, बेंगळुरू) एक रसायन शास्त्रज्ञ आहेत, जे घन-अवस्था आणि संरचनात्मक रसायनशास्त्राच्या क्षेत्रात मुख्य रूपाने कार्य करीत आहे.
  2. त्यांना 2013 साली भारत सरकारकडून भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  3. चंद्रशेखर वेंकट रामन आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर हा पुरस्कार प्राप्त करणारे ते तीसरे शास्त्रज्ञ आहेत.


NROL-71: US state-of-the-art spy satellite

 1. दि. 19 जानेवारी 2019 रोजी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेनी “NROL-71” या नावाचा नवा गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवला.
 2. ‘युनायटेड लॉन्च अलायन्स (ULA) डेल्टा IV हेवी रॉकेट’ या अग्निबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला गेला.
 3. हा उपग्रह ‘यू.एस. नॅशनल रिकोनिसन्स ऑफिस’द्वारे संचालित केला जाणार आहे आणि याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
 4. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) :-
  1. ही संयुक्त राज्ये अमेरिका (USA) या देशाची एक सरकारी शाखा आहे. 
  2. जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि हवाई उड्डाणशास्त्र व अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे. 
  3. NASAची स्थापना दिनांक 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) याच्या जागी केली गेली.


Tamilnadu State's second industrial line for the production of defense sector

 1. दि. 19 जानेवारी 2019 रोजी तिरुचिराप्पल्ली येथे भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ‘तामिळनाडू संरक्षण औद्योगिक मार्गिका’ (Tamil Nadu Defence Industrial Corridor) याचे औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले आहे.
 2. याप्रसंगी, संरक्षण क्षेत्राशी संबंधित तीन सामंजस्य करार देखील केले गेले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘कोयंबटूर संरक्षण नवकल्पना समूह केंद्र’ याचे उद्घाटन करण्यात आले.
 3. उत्तरप्रदेशाच्या अलीगढ येथे देशाची पहिली संरक्षण औद्योगिक मार्गिका उभारण्यात आली. त्यानंतरची ही संरक्षण क्षेत्रातली दुसरी औद्योगिक मार्गिका आहे.
 4. या संपूर्ण प्रकल्पामध्ये त्रिची, सालेम, होसूर, कोवाई, मदुराई आणि चेन्नई असे सहा केंद्र आहेत.
 5. या सहा शहरांमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे स्वदेशी उत्पादन घेण्यासाठी विविध उद्योग उभारले जाणार आहेत.


The National Museum of Indian Cinema was established in Mumbai

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ या वास्तुचे उद्घाटन करण्यात आले.
 2. संग्रहालय दक्षिण मुंबईच्या चित्रपट विभाग संकुल येथे उभारण्यात आले आहे.
 3. हे संग्रहालय ऐतिहासिक काळातले गुलशन महाल आणि आणखी एक नवी इमारत अश्या दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे.
 4. या संग्रहालयात भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
 5. शतकापासून चित्रपटसृष्टीच्या उत्क्रांतीला छायाचित्र, ध्वनिफिती, फिल्म क्लिपींग, कलात्मक वस्तू, यंत्रसामुग्री व उपकरणे, प्रसिद्धीची सामुग्री, परस्परसंवादी प्रदर्शन अश्या विविध बाबींचे दर्शन येथे घडविण्यात आले आहे.
 6. देशात चित्रीकरण करण्यासाठी सर्व प्रकारची परवानगी घेण्यासाठी येथे एकल खिडकीची सुविधा तयार करण्यात आली आहे.
 7. तसेच चित्रपटांची चाचेगिरी टाळण्यासाठी सिनेमासंबंधी कायद्यात बदल करण्यासाठी येथे कार्य चालणार आहे.
 8. शिवाय याप्रसंगी, ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ तर्फे सर्व उद्योगांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी दाव्होस परिषदेप्रमाणेच जागतिक सिनेमा शिखर परिषद भरविण्यात आली.


WEF's 'Global Risk Report 2019'

 1. बोर्ज ब्रेन्डे (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात असलेल्या जागतिक आर्थिक मंच (WEF) कडून ‘वैश्विक धोका अहवाल 2019’ (Global Risk Report) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. मानवी समाजापुढे असलेल्या आव्हानांची आणि मुख्य धोक्यांची ओळख पट‍वून देणार्‍या या अहवालात वैश्विक धोके कमी करण्यासाठी कमकुवत आंतरराष्ट्रीय सहकार्य हे धोकादायक ठरत असून, त्याचा सामूहिक इच्छाशक्तीवर नकारात्मक प्रभाव पडत आहे, असे दिसून आले आहे.
 3. 2018 साली जगाला जटिल आणि एकमेकांशी जुळलेल्या वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागला. हवामान-विषयक बदल आणि घटलेली जागतिक वाढ ते आर्थिक असमानता अश्या समस्यांना कमी करण्यास जग अपयशी ठरत आहे. आणि याचे परिणाम भविष्यात सर्वांना भोगावे लागणार, असा इशारा देखील दिला गेला आहे. अश्या परिस्थितीचे निराकरण न झाल्यास, चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील वाढत्या अडथळ्यांमध्ये अधिकच वाढ होणार.
 4. इतर ठळक बाबी:-
  1. सामूहिकपणे संकटाला सामोरे जाण्याऐवजी जगात जोरदार राज-केंद्रित राजकारणाचा एक नवीन टप्पा आकार घेत आहे. वाढते भौगोलिक-राजकीय आणि भौगोलिक-आर्थिक तणाव हा 2019 सालचा सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा धोका आहे, असे 90% तज्ञांचे मत आहे.
  2. शिवाय पर्यावरण-विषयक हानी हा एक दीर्घकालीन धोका आहे आणि 2019 सालच्या पाच सर्वात प्रभावशाली जागतिक धोक्यांमधील चार तर हवामानाशी संबंधित आहेत.
  3. बदलत्या आणि तणावपूर्ण भौगोलिक आणि मानवी जीवनामुळे बरेच लोक विचलित, दुःखी आणि एकट्याने जगत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात राग वाढत आहे आणि असंवेदनशील होत आहेत.
  4. 2018 साली मॅक्रोइकनॉमिक धोक्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले होते. यादरम्यान आर्थिक बाजारातील अस्थिरता वाढली. 
  5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार जागतिक वाढीचा दर सर्वात जास्त उंचावला असल्याचे दिसते, मात्र पुढील काही वर्षांमध्ये हा वृद्धीदर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. चीन सारख्या प्रगत अर्थव्यवस्थांमधील मंदीचा हा परिणाम आहे.
  6. वैश्विक कर्जाचा भार हा देखील खूप महत्त्वाचा परिणामकारक घटक आहे. सद्यस्थितीत जागतिक कर्ज हे जागतिक GDPच्या 225% एवढ्या प्रमाणात आहे.
  7. हवामानात होणार्‍या बदलांचा जैवविविधतेला सर्वात मोठा फटका बसलेला आहे.
  8. 1970 सालापासून जगभरात आढळून येणार्‍या एकूण प्रजातींच्या संख्येत 60% घट झाल्याचे दिसून आले आहे, जे मानवी जीवनावर देखील आरोग्य आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्‍या परिणाम करीत आहे.
  9. वेगाने विकसित होणारे सायबर आणि तांत्रिक धोके हे सर्वात धोकादायक अडथळे आहे, जे मानवी समाजाला एकसंध करण्याच्या प्रयत्नांना अडथळा ठरत आहे.
  10. जागतिक धोक्यांमध्ये तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. डिजिटल माहितीमध्ये फसवणूक आणि सायबर हल्ला, फसव्या बातम्या आणि ओळख चोरी अश्या घटना वाढलेल्या आहेत.
  11. जगभरात लोकांमध्ये मानसिक आरोग्य-विषयक समस्या वाढलेल्या आहेत. जगभरात अंदाजे 700 दशलक्ष लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. शिवाय जैविक रोगजनकांशी संबंधित रोगांमध्ये वाढ झाली आहे. स्वाइन फ्ल्यू सारख्या विविध रोगांचा कालांतराने उद्रेक होत आहे.
  12. वाढत्या वैश्विक तापमानामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहे, परिणामी समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे.
  13. 2050 सालापर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी दोन-तृतियांश लोक शहरात राहणार असण्याचा अंदाज आहे.
  14. आज 570 तटीय शहरांमध्ये 800 दशलक्ष लोक राहतात, जेव्हा की 2050 सालापर्यंत समुद्र-पातळीत 0.5 मीटरची वाढ होण्याचा अंदाज आहे.


India's agreement with Uzbekistan to supply uranium

 1. दि. 18 जानेवारी 2019 रोजी अहमदाबाद शहरात झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानाचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांच्यात द्वैपक्षीय बैठक पार पडली.
 2. बैठकीनंतर भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी युरेनियम या किरणोत्सर्गी पदार्थाचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबत भारतीय अणुऊर्जा विभाग आणि उझबेकिस्तानाच्या नोवोई मिनरल्स अँड मेटलर्जिकल कंपनी यांच्या दरम्यान करार करण्यात आला.
 3. शिवाय, उझबेकिस्तानमधील गृहनिर्माण आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या USD 200 दशलक्ष एवढ्याच्या कर्जासंदर्भात भारताची एक्झिम बँक आणि उझबेकिस्तान सरकार यांच्यात करण्यात आलेल्या कराराचे दोन्ही देशांनी स्वागत केले.
 4. उझबेकिस्तान हा मध्य आशियातला एक देश आहे.
 5. सन 1991 मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हा सोव्हियत संघाचा भाग होता.
 6. ताशकंद (किंवा ताशकेंत) हे देशाचे राजधानी शहर आहे.
 7. उझबेकिस्तानी सोम हे राष्ट्रीय चलन आहे.


Top