Israeli Prime Minister Benjamin Netanyahu visits India-1

 1. भारत आणि इस्रायल यांच्यातल्या द्वैपक्षीय संबंधांना नव्याने विस्तारीत स्वरूप प्राप्त झाले आहे.
 2. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अलीकडील भारत भेटीत विविध विषयांमध्ये नऊ करार करण्यात आले आहेत.  
 3. दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांना 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची ही भारताला पहिलीच अधिकृत भेट आहे.
 4. जुलै 2017 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता.
 5. चर्चेतील महत्वाचे मुद्दे:-
  1. दोन्ही देश कृषी व जल क्षेत्रामधील धोरणात्मक सहकार्यासाठी पंचवार्षिक संयुक्त कार्ययोजनेवर एकत्रितपणे काम करीत आहेत. त्याचा कामाचा आढावा घेण्यात आला.
  2. इस्रायलचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारताचे कृषी मंत्रालय यांच्या भागीदारीने कृषी क्षेत्रातला त्रैवार्षिक कार्य कार्यक्रम (2018-2020) म्हणून भारत-इस्रायल विकास सहकार्याच्या अंमलबाजवणीबाबत आढावा घेण्यात आला.
  3. हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करण्याच्या आणि कार्यक्षमतेने कमी पाण्याचा वापर करण्याच्या उद्देशाने सुरू केला गेला आहे.
  4. भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन व विकास आणि टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन फंड (IBF) अंतर्गत प्रथमच प्रस्ताव मागविण्याच्या प्रक्रियेला सुरू केले गेले.
 6. सहमती देण्यात आलेले मुद्दे:-
  1. दोन्ही देशांच्या लोकांमधील संपर्क वाढविण्यासाठी या 2018 साली इस्रायलमध्ये ‘भारतीय संस्कृती केंद्र’ उघडले जाणार आहे.
  2. दोन्ही देशांनी अभिनवता, व्यवसाय आणि व्यापार, अवकाश, संरक्षण आणि सायबर, उच्च शिक्षण आणि संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शवली.
  3. शिवाय, वर्ष 2019 मध्ये दोन्ही देशांनी आपापल्या देशात एकमेकांचा महोत्सव आयोजित करण्याचे मान्य केले गेले.
भारत - इस्रायल करार
 1. सायबर सुरक्षा सहकार्यासाठी सामंजस्य करार
 2. तेल आणि वायू क्षेत्रातल्या सहकार्यासाठी सामंजस्य करार
 3. हवाई वाहतूक  करारात दुरूस्ती करण्यासाठी राजशिष्टाचार (protocol)  
 4. चित्रपट सह-निर्मिती क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार
 5. होमिओपॅथी औषधीमध्ये संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार
 6. केंद्रीय होमिओपॅथी परिषद (आयुष मंत्रालय, भारत सरकार) आणि इस्रायलचे शारेझेडेक वैद्यकीय केंद्र यांच्यामध्ये सहकार्य करण्यासाठी करार
 7. अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्था आणि इस्रायल अंतराळ तंत्रज्ञान संस्था यांच्यात करार
 8. भारतात इस्रायलने आणि इस्रायलमध्ये भारताने गुंतवणूक करण्यासंबंधी संयुक्त निवेदन
 9. मेटल एअर बॅटरी निर्माण क्षेत्रात सहकार्यासाठी IOCL आणि फिनर्जी लिमिटेड यांच्यामध्ये करार
 10. IOCL आणि येदा संशोधन व विकास संस्था यांच्यात केंद्रीत सौर औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करार
 11. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाने द्वैपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंमधील वाढत्या सहकार्याबद्दल चर्चा केली. 


NIITI Commission's GIAN Program on Sustainable Town Planning

 1. NITI आयोगाच्या पुढाकाराने शाश्वत नगर विकास करण्यासाठी एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
 2. हा अभ्यासक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरचे नोएडा येथील बाह्यशिक्षण केंद्रामार्फत प्रदान केला जाणार आहे.
 3. हा अभ्यासक्रम ‘शैक्षणिक जाळ्यासाठी वैश्विक पुढाकार (Global Initiative on Academic Network -GIAN)’ अंतर्गत चालवण्यात येणार आहे.
 4. या अभ्यासक्रमात 25 जून 2015 रोजी भारत सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट शहरे अभियानांतर्गत स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे.
 5. स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासाठी ‘स्मार्ट’ पर्याय शोधून नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी उच्च गुणवत्ता असलेल्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.
GIAN कार्यक्रम
 1. कार्यक्रम IIT कानपुरच्या भूशास्त्र विभागाचे प्रा. राजीव सिन्हा आणि इंग्लंडचे डरहॅम विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे डॉ. पेट्रीस कार्बोनेउ यांच्याद्वारा समन्वयीत केला जात आहे.
 2. सुदूर संवेदी आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा उपयोग करत शाश्वत नगर नियोजनाबाबत हा पहिलाच वैश्विक पुढाकार आहे.
 3. कार्यक्रमाला NITI आयोग आणि गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालय यांचे पाठबळ लाभले आहे.
 4. कार्यक्रमात जलस्त्रोत व्यवस्थापन, जल प्रदूषण आणि जल प्रक्रिया सुविधेसाठी महत्त्वपूर्ण व्यवस्थांच्या स्थापनेवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
 5. स्मार्ट शहरे अभियान:-
  1. 2015 साली सुरू करण्यात आलेला स्मार्ट शहरे अभियान हा शहरी विकास मंत्रालयाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  2. या उपक्रमामधून देशात 100 स्मार्ट शहरे तयार केली जाणार आहेत.
  3. संपूर्ण देशात एकूण 90 शहरांना स्मार्ट शहरांसाठी निवडलेले आहे.
  4. रांची हे देशातले प्रथम हरित क्षेत्र स्मार्ट शहर असणार आहे.


Successful test of India's Agni-5 missile

 1. सुमारे ५००० किलोमीटरपेक्षा लांब अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची भारताने १८ जानेवारी रोजी यशस्वी चाचणी घेतली.
 2. ओडिशाच्या समुद्रातील अब्दुल कलाम बेटावरुन ही चाचणी करण्यात आली. 
 3. चीनचा उत्तर भागासह संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला असून भारताची प्रतिहल्ल्याची क्षमता वाढली आहे.
 4. अग्नी-५ हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने विकसित केले आहे. त्याची उंची १७ मीटर असून वजन ५० टन आहे.
 5. हे क्षेपणास्त्र दीड टन वजनापर्यंतची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा २४ पट आहे.
 6. कमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी भारताच्या ताफ्यात पृथ्वी आणि धनुष ही लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.
 7. पाकिस्तानपासून असलेला धोका लक्षात घेऊन भारताने अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ही अधिक ताकदीची मध्यें पल्ल्याची क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली आहेत.
 8. चीनची वाढती घुसखोरी आणि कुरापती यांना शह देण्यासाठी अग्नी-४ आणि अग्नी-५ या दोन क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
 9. ५००० ते ५५०० किमीपर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे इंटरकॉन्टिनेन्टल बॅलास्टिक मिसाइल (ICBM) म्हणून ओळखली जातात.
 10. सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनकडेच अशी क्षेपणास्त्र आहेत. अग्नी-५ ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारतही या पंक्तीत विराजमान होइल.
 11. वैशिष्ट्ये:-
  1. उंची = १७ मीटर
  2. वजन = ५० टन
  3. क्षमता =दीड टन
  4. वेग= आवाजाच्या वेगापेक्षा २४ पट


Pandit Buddudev Dasgupta, the famous sarod player, passed away

 1. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध सरोद वादक पंडित बुद्धदेव दासगुप्ता यांचे १५ जानेवारी रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
 2. बुद्धदेव दासगुप्ता यांचा जन्म १ फेब्रुवारी १९३३ रोजी बिहारमधील भागलपुर येथे झाला. घरातील संगीतामय वातावरणामुळे त्यांनाही सुरुवातीपासून संगीतात रूचि निर्माण झाली.
 3. त्यांनी सरोद उस्ताद संगीताचार्य राधिका मोहन मित्र यांच्याकडून सरोद वादनाचे धडेघेतले. घराण्याच्या परंपरेत राहून वेगळी वाट चोखाळणारे सरोदिये म्हणून त्यांची ओळख होऊ लागली.
 4. सरोदवर रबाब या वाद्यातील विशिष्ट शैली त्यांनी आत्मसात केली. त्याबरोबरच या वाद्यावर तालवाद्यातील बोलकारीचाही अंतर्भाव केला.
 5. रागदारी संगीतात रवींद्र संगीताचा मिलाफ कसा करता येईल, याचा विचार त्यांनी केला, त्यामुळेही त्यांचे सरोदवादन वेगळेपणाने उठून दिसू लागले.
 6. संगीत प्रभाकर आणि संगीत प्रवीण या पदव्या त्यांना मिळाल्या. आकाशवाणीवरील एक नामांकित वादक म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
 7. संगीत नाटक अकादमी, शिरोमणी पारितोषिक, अल्लादीन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांबरोबरच २०१२साली भारत सरकारचा पद्मभूषण हा किताबही त्यांना मिळाला.
 8. त्यांच्या जीवनावर आधारित ‘बामानेर चंद्रस्पर्शविलास’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
 9. २००४मध्ये हे पुस्तक बंगाली आत्मकथांमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले.
 10. सरोद वादनातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल २०११मध्ये त्यांना पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला. परंतु दासगुप्ता यांनी तो नाकारला.


Aishwarya Tipnis' cultural honors by the French government

 1. भारतातील वास्तूंचे वास्तुरचना संधारणशास्त्राच्या माध्यमातून संवर्धन करणाऱ्या ऐश्वर्या टिपणीस यांना फ्रेंच सरकारचा ‘शवालिए द ला ऑर्दे दे आर्त ए लेत्र’ (कला-साहित्य क्षेत्रातील उमराव) हा सांस्कृतिक सन्मान जाहीर झाला.
 2. ऐश्वर्या या संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतातील फ्रेंच वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.
 3. जुन्या वास्तूंचे तिचा मूळ पोत कायम ठेवून संवर्धन व जीर्णोद्धार करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे.
 4. ऐश्वर्या टिपणीस दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
 5. त्यांनी युरोपीय शहर संवर्धन या विषयात स्कॉटलंडच्या डँडी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीघेतली आहे. तसेच ब्रिटनमध्ये वास्तुरचनेचे प्रशिक्षण घेतले.
 6. ‘व्हर्नाक्युलर ट्रॅडिशन्स-कंटेम्पररी आर्किटेक्चर’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून, अनेक वृत्तपत्रांतून वास्तुकलेवर लेखनही केले आहे.
 7. त्यांनी देशातील संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून पुरातन वास्तूंचा वारसा जपण्यात मोठे काम केले.
 8. मध्य प्रदेशातील महिदपूर किल्ल्याचे संवर्धन, डेहराडून येथील डून स्कूलच्या इमारतीचे संवर्धन हे त्यांचे प्रकल्प गाजले. त्यासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कारही मिळाला होता.
 9. चंद्रनगर ही कोलकात्यापासून ४० किमी अंतरावर असलेली फ्रेंच वसाहत त्यांनी संवर्धन तंत्राने जपली आहे.
 10. त्यांनी पश्चिम बंगालमधील चिनसुरा ही डच वास्तू संवर्धित केली असून जागतिक वारसा असलेल्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा सर्वंकष संवर्धन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 11. यापूर्वी १९८०च्या दशकात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी तसेच वास्तुरचना शास्त्रात राज रेवाल यांनाही फ्रेंच सरकारचा हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. 


The unveiling of the song for 'Play India'

 1. भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाकडून ‘खेलो इंडिया’ गीताचे अनावरण केले गेले आहे.
 2. या गीताची संकल्पना ओगिलवाईद्वारे तयार केली गेली आहे, याला लुइस बँकद्वारा तयार केले गेले आहे आणि याचे चलचित्रीकरण ‘निर्वाणा फिल्‍म्स’ कडून केले गेले आहे.
 3. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.
 4. समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नियोजित 31 जानेवारी 2018 पासून सुरु होणार्‍या ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ यांच्या प्रथम संस्करणात जवळपास 6000 खेळाडू आणि अधिकारी भाग घेतील.
 5. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
 6. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार आहे.
 7. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार आहे.
 8. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल.
 9. शालेय खेळांमध्ये तीरंदाजी, अॅथलेटिक्‍स, बॅडमिंटन, बास्‍केटबॉल, मुष्टियुद्ध, फुटबॉल, जिमनॅस्टिक्‍स, हॉकी, जूडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, वॉलीबॉल, भारोत्‍तोलन आणि कुस्ती यासारख्या 16 क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.