NAMVAR SINH

 1. प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले आहे. ते 93 वर्षाचे होते. 19 फेब्रुवारी रोजी रात्री एम्स रुग्णालयात नामवार सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 2. दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते.

 3. नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 4. 1959 मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

 5. छायावाद (1955), इतिहास आणि आलोचना (1957), कहानी : नयी कहानी (1964), कविताचे नविन प्रतिमान(1968), दूसरी परंपरा की खोज (1982), वाद विवाद आणि संवाद (1989) यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहल्याआहेत.


MEENA KUMARI BOXER

 1. कनिष्ठ गटातील माजी जागतिक विजेती बॉक्सर निखत झरीन आणि मीना कुमारी देवी यांनी बल्गेरिया येथील सोफियामध्ये सुरू असलेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

 2. अनेकदा राष्ट्रीय पदकांवर नाव कोरणाऱ्या झरीनने 51 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात फिलिपिन्सच्या आयरीश मँगो हिच्यावर 5-0 अशी सहज सरशी साधली.

 3. मीना कुमारी देवी हिने 54 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत फिलिपिन्सच्याच आयरा विलेगस हिच्यावर 3-2 असा निसटता विजय साकारला. दरम्यान, मंजू राणी (48 किलो) हिला अंतिम फेरीत फिलिपिन्सच्या जोसी गाबुको हिच्याकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 4. झरीन हिने आक्रमक खेळ करताना तितकाच भक्कम बचाव करत मँगो हिच्यावर वर्चस्व गाजवले. झरीनने मँगोला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. मीना कुमारीला गेल्या वेळी याच स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण या वेळी सर्व कसर भरून काढत तिने सुवर्णपदक प्राप्त केले. आक्रमक खेळाला बचावाची जोड देत मीना कुमारीने सुवर्णपदक पटकावले.

 5. दरम्यान पिलाव बासुमतारी (64 किलो), नीरज (60 किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (69 किलो) यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.


JOKOVICH

 1. गतवर्षांत प्रतिष्ठित चार ग्रँडस्लॅमपैकी दोन स्पर्धाचे विजेतेपद मिळवणारा सर्बियाचा नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने चौथ्यांदा लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारावर नाव कोरले

 2. वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाइल्स, गोल्फपटू टायगर वूड्स व फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघानेसुद्धा मानाचे पुरस्कार पटकावले.

 3. 2018मध्ये जोकोव्हिचने विम्बल्डन व अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याशिवाय या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही त्याने विजयश्री खेचून आणली.

 4. जोकोव्हिचला फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियान एम्बाप्पे, एलिउड किपचोज आणि ली ब्रॉन जेम्स यांच्याकडून कडवी लढत मिळाली. मात्र अखेरीस जोकोव्हिचनेच बाजी मारली. जोकोव्हिचने विश्वातील वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या चार पुरस्कारांशी बरोबरी केली असून पाच पुरस्कारांसह अव्वल स्थानावर असलेल्या रॉजर फेडररपेक्षा तो फक्त एका पुरस्काराने मागे आहे.


DIN VISHESH

 1. 20 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक सामाजिक न्याय दिन‘ आहे.

 2. शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना सन 1978 या वर्षी देण्यात आला.

 3. सन 1987 यावर्षी मिझोराम भारताचे 23 वे राज्य बनले.

 4. सन 2014 मध्ये तेलंगण हे भारताचे 29 वे राज्य बनले.


Top