Weightlifers Opportunity for Olympic Eligibility

  1. भारताची माजी जगज्जेती मीराबाई चानू हिच्यासह अन्य वेटलिफ्टर्सना टोक्यो 2020 ऑलिम्पिक पात्रता गाठण्याची संधी मिळणार आहे.

  2. 20 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे ध्येय भारतीय वेटलिफ्टर्सनी बाळगले आहे.

  3. पाठीच्या दुखण्यामुळे तब्बल 9 महिने खेळापासून दूर राहावे लागलेल्या चानूने दमदार पुनर्रागमन करत ऑलिम्पिकसाठीच्या दावेदारीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते.

  4. फेब्रुवारीत थायलंडमध्ये झालेल्या ईजीएटी चषक स्पर्धेत चानूने स्नॅच प्रकारात 82 तर क्लिन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात 110 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र ऑलिम्पिक पात्रता गाठायची असल्यास चानूला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

  5. आंतररराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या नूतन नियमावलीनुसार चानूला 48 किलो वजनी श्रेणीतून 49 किलो गटात जावे लागले आहे.

  6. पुरुषांमध्ये भारताच्या सतीश शिवलिंगम याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे सर्व आशा युवा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याच्यावर आहेत.

  7. जेरेमीने नव्या नियमांनुसार 62 किलो गटातून 67 किलो गटात प्रवेश केला आहे. विकास ठाकूर 96 किलो वजनी गटातून तर अजय सिंग 81 किलो वजनी गटातून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.


Day special:

  1. प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी 1770 यासाली ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

  2. नाझी हुकूमशहा तसेच दुसर्‍या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म 20 एप्रिल 1889 रोजी झाला.

  3. सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा.ह.भ.प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा 20 एप्रिल 1896 रोजी माहीम, ठाणे येथे जन्म झाला होता.

  4. सन 1946 मध्ये राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

  5. आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 मध्ये झाला.


Top