Agreement with 12 countries in the Ministry of AYUSH Ministry

 1. सरकारने आयुष मंत्रालायची स्थापना करून गत चार वर्षात वसुधैव कुटुंम्बकम या भावनेने जागतिक स्तरावर सर्वांसाठी भारतीय उपचार पद्धती पोहचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे; योग हे त्याचेच एक उदाहरण आहे.
 2. तसेच आयुष मंत्रालयाने तीन वर्षात 12 देशांसोबत यासंबंधीचे करार केले असून 40 देशात 58 माहिती केंद्रे उभी केली आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथे दिली.
 3. लायन्स क्लब इंटरनॅशनल डि. 317-बी व आयुर्वेदिक नॅचरल हेल्थ सेंटर प्रा. लि., गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींचे शैक्षणिक प्रदर्शन भरविण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाईक बोलत होते.
 4. भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच पहिले गेले आणि त्यातून जाणीवपूर्वक स्थानिक औषधी उपचार पद्धती दाबली गेली.
 5. आयुर्वेद हजारो वर्ष जुनी, प्राणी तसेच मानवाच्या माध्यमातून तपासलेली उपचार पद्धती आहे.
 6. निसर्गाने आपल्याला जन्माला घातले आहे आणि पंचतत्वासून आपले शरीर बनले आहे. त्यामुळे निसर्गावर आधारित आयुर्वेद आपल्या शरीराला लगेच लागू पडते, असे नाईक यावेळी म्हणाले.
 7. आयुर्वेद आपल्याला निसर्गासोबत राहायला शिकवते. आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून राज्यातील नागरिकांना आपल्या 'किचन गार्डन' मध्ये औषधी वनस्पती वाढविण्यासाठी प्रेरित केले जात आहे, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.
 8. या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल डि. 317-बी च्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर मोनिका सावंत, अतिथी वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व वनस्पती आधारित आहार तज्ज्ञ आदित्य हरमलकर आणि आयुर्वेद तज्ज्ञ व सहाय्यक प्राध्यापक डॉ. जॉय परेरा हे मान्यवर उपस्थित होते.


Jowar,bajra in the list of cereals of millet

 1. ज्वारी व बाजरीची भाकरी हे गरिबाचे अन्न, त्यामुळेच त्यांची कृषीक्षेत्रातही कुचेष्टा होत राहिली. त्यांना भरडधान्य म्हणून संबोधले जात असे.
 2. आपल्या गुणधर्मामुळे गरिबांच्या घरातील ही भाकरी जशी पंचतारांकीत हॉटेलमध्ये पोहोचली तशीच डॉक्टरांच्या शिफारशीलाही पात्र ठरली. पण आता ज्वारी, बाजरीची दैना फिटणार असून केंद्र सरकारने त्यांचा पोषक (मूल्यवर्धित) तृणधान्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
 3. केंद्र व राज्य सरकारने दोन्ही पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत.
 4. कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी, बाजरीचे पीक घेतले जाते. राज्यात ज्वारी १७ लाख हेक्टरमध्ये तर बाजरी ८ लाख हेक्टर क्षेत्रात पीक घेतले जाते.
 5. पूर्वी हे क्षेत्र ६६ लाख हेक्टरवर होते. लोकांच्या आहारातही ज्वारी, बाजरीची भाकरी असे. सार्वजनिक वितरण व्यवस्था आल्यानंतर शिधापत्रिकेवर गहू मिळू लागला. त्यामुळे ज्वारी, बाजरीचे बाजारातील दर पडले.
 6. भाव चांगले नसल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळले. मात्र ज्वारी व बाजरीमध्ये ग्लुटेन नसते. ज्वारीत पोषक तत्त्व जास्त असते. तंतुमय पदार्थ असल्याने सहज पचतात. बाजरीमध्ये प्रोटीन कमी असते, ग्लुटेन नसते.
 7. जस्त व लोहाचे प्रमाण जास्त असते. तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे आरोग्याला चांगली व पचायला सोपी असते. आता ज्वारी,बाजरीचे आहारातही महत्त्व वाढत असून पुन्हा लोकांच्या आहारात स्थान मिळवू लागले आहे.
 8. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी ज्वारी, बाजरीच्या प्रसारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भरड धान्यातून त्यांची नावे केंद्र सरकारने काढून टाकली आहे.
 9. पोषक तृणधान्यामध्ये त्यांचा समावेश केला आहे. मंत्री राधामोहन सिंह यांनी बैठक घेऊन दोन्ही पिकांच्या प्रचारावर जोर दिला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागानेही आगामी वर्षांत दोन्हीही पिकांच्या लागवडीत वाढ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
 10. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत कृषी आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांनी शास्त्र व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना संबंधित सरकारच्या निर्णयाची माहिती दिली.
 11. १४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बालदिन साजरा केला जातो. या दिवशी मूल्यवर्धित तृणधान्य दिन साजरा केला जाणार आहे.
 12. ज्वारी, बाजरीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिले जाईल. यापुढे कुठल्याही सरकारी परिपत्रकात ज्वारी, बाजरीचा उल्लेख भरडधान्य म्हणून केला जाणार नाही. तर तो मूल्यवर्धित तृणधान्य किंवा पोषक तृणधान्य म्हणून करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
 13. बालदिनी कृषि विभागाचे अधिकारी हे सरपंच, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांना ज्वारी, बाजरीपासून बनविलेले पदार्थ भेट देणार आहेत.
 14. तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय अन्नप्रक्रिया संस्था व राष्ट्रीय तृणधान्य विकास संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. ज्वारी, बाजरीचे सुमारे दोन हजार पदार्थ तयार केले जातात.
 15. हे पदार्थ तयार करणाऱ्या इच्छुकांना प्रशिक्षण व कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. एक विशेष प्रचार मोहीम चालविली जाणार असून गावोगाव ज्वारी, बाजरी लोकांनी खावी म्हणून पदयात्रा, प्रचार फेऱ्या काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 16. हवामान बदल, दुष्काळी परिस्थिती आदींवर दोन्ही पिके मात करू शकतात. पावसावर अवलंबून असलेल्या प्रदेशात ही पिके चांगली येऊ शकतात.
 17. आता केंद्र सरकारने दोन्ही पिकांच्या आधारभूत किमतीत सुमारे ४० ते ६६ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात दर चांगले असल्याने या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढेल. त्यासाठी या पिकांवरच अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
 18. अंगणवाडीमध्ये मुलांना एक दिवस ज्वारीची बिस्किटे, भाकरी, ज्वारीचे पोहे दिले जाणार आहे.
 19. पिझ्झा व बर्गरऐवजी ज्वारी व बाजरीची भाकरी महत्त्वाची असल्याचा संदेश सेलेब्रिटींच्या माध्यमातून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 20. अंगणवाडी व शाळामध्ये मुलांच्या माध्यान्ह भोजनात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. तसेच कर्नाटक सरकारने रेशनवर ज्वारी, बाजरी दिली आहे.
 21. राज्यातही ती दिली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 


India ranks 58th in the list of countries for competitive economy

 1. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून मंगळवारी जगभरातील सर्वात प्रतिस्पर्धी अर्थव्यवस्था असणाऱया देशांची सूची सादर करण्यात आली आहे. या यादीत भारताचे 58 वे स्थान असल्याचे सांगण्यात आले आहे.
 2. वर्ल्ड इकॉनॉमिक फेरमने ग्लोबल कॉम्पीटीव्ह निर्देशाकांत जगभरातील अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाचे मापन करुनच दीर्घकाळासाठी आर्थिक वाढीच्या नोंदी करण्यात येतात. त्यासाठी हे मूल्यमापन महत्वाचे असल्याचे म्हटले जाते.
 3. जी 20 देशांच्या यादीमध्ये भारताच्या रॅकमध्ये यदा सर्वात जादा सुधारणा झाल्याचेही नोंदवण्यात आले. भारत यंदा पाच अंकानी वरती आला आहे.
 4. मागील वर्षी भारत 53 व्या क्रमांकावर राहिला होता. निर्देशांकांत अमेरिका यंदा टॉपवर राहिली आहे. 2008 नंतर अमेरिका प्रथमच नंबर एकवर आली असल्याचे नोंदवण्यात आले.
 5. उच्च आणि मध्यम वर्गाची अर्थव्यवस्थेत बदल करण्यासाठी चीन आणि भारताची कामगिरी समाधानकारक असल्याची नोंद सादर करण्यात आलेल्या अहवालात नोंदवण्यात आली आहे.
 6. संशोधन आणि गुंतवणूक करण्यात चीन भारतापेक्षा चीन वरच्या पातळीवर असल्यचे यात म्हटले आहे.
 7. भारताची वाटचाल योग्य असली तरी ब्युरोक्रेसीमध्ये कमी असल्याकारणामुळे भारत थोडय़ा पाठीमागे आहे.
 8. सिंगापूर दुसऱया स्थानी:-
  1. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून सादर करण्यात आलेल्या यादीत 140 देशांचा समावेश असून यात सिंगापूरचा दुसरा क्रमाक लागतो आहे. तर त्या पाठोपाठ जर्मनीचा तिसरा क्रमांक आहे.
  2. चौथा स्वित्झरलॅन्डचा क्रमांक लागतो.
  3. जपान हा पाचव्या स्थानांवर राहिलाय.
  4. चीन 28 व्या क्रमांकावरती आहे.


/professor-k-j-purohit-aka-shantaram-dies-at-the-age-of-95

 1. ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांचे बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वांद्रे येथील साहित्य सहवासमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
 2. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री १० वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 3. पुरोहित यांनी १९८९ मध्ये अमरावती येथे झालेल्या ६२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. कथाकार म्हणून त्यांचा नावलौकिक मोठा होता.
 4. पुरोहित यांचे पूर्ण नाव केशव जगन्नाथ पुरोहित. त्यांनी 'शांताराम' या टोपणनावाने लेखन केले.
 5. सन १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. पुरोहित यांचा जन्म नागपूरचा.
 6. त्यांनी कर्मभूमी म्हणून मुंबईची निवड केली. नागपूर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
 7. जोगेश्वरीच्या ईस्माइल युसुफ महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते.
 8. गृहस्थी लेखक हरपले:- 
  1. ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांना सन २०११चा राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी विपुल कथालेखन केले.
  2. शांताराम यांनी कथांमधून वेगवेगळे विषय हाताळले. त्यांच्या लेखनामध्ये स्थिरता होती. तसेच ते गृहस्थी लेखक म्हणून मानले जायचे.
  3. अंधारवाट, आठवणींचा पार, उद्विग्न सरोवर, काय गाववाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीवरची माणसं, ठेवणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरवा, संत्र्यांचा बाग, संध्याराग, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुवाद) आदी पुरोहित यांची साहित्य संपदा आहे.


Youth Olympics: Pravin Chitravel won the first bronze medal for India

 1. अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या Youth Olympics स्पर्धेत भारताच्या प्रविण चित्रावेलने आज भारताला यंदाच्या स्पर्धेतील पहिले कांस्यपदक मिळवून दिले.
 2. पुरुष गटातील तिहेरी उडी प्रकारात त्याने कांस्यपदकाची कमाई केली. या पदकाबरोबर भारताच्या खात्यात १२व्या पदकाची भर पडली.
 3. प्रवीणने तिहेरी उडी प्रकाराच्या पहिल्या टप्प्यात १५.८४ मीटर उडी मारली होती.
 4. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १५.६८ मीटर उडी घेत हे त्याने हे पदक जिंकले. त्याने एकूण ३१.५२ मीटरची नोंद केली.
 5. क्युबाच्या जॉर्डन फॉर्च्युनने सुवर्णपदक पटकावले. त्याने एकूण ३१.१८ मीटरची नोंद केली.
 6. तर नायजेरियाच्या इनेह ओरीत्सेमेयीवा याने ३१.८५ मीटरची नोंद करत रौप्यपदक खिशात घातले.
 7. प्रवीणच्या या कामगिरीमुळे भारताले १२वे पदक मिळाले. सध्या भारताच्या खात्यात एकूण ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि १ कांस्यपदक आहे.


Top