current affairs, loksatta chalu ghadamodi

1. यश बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष, यशोवर्धन बिर्ला ज्याला यश बिर्ला म्हणून ओळखले जाते, त्याला 16 जून, 2019 रोजी कोलकाता स्थित यूको बँकेने जाणूनबुजून पैसे न भरल्याबद्दल डिफॉल्टर घोषित केले आहे.

2. यूको बँकेने दावा केला आहे की यशवर्धनच्या ग्रुप कंपन्यांमध्ये बिर्ला सूर्या या कंपनीने 67.65 कोटी रुपयांचे कर्ज फेडले नाही. यूको बँकेच्या मीडियाच्या निवेदनानुसार, यश बिर्लाला कर्जाची परतफेड करण्यासंबंधी अनेक सूचना पाठविल्या गेल्या. त्यांच्या कंपनीला मल्टी-क्रिस्टलाइन सोलर फोटोव्होल्टेक पेशी तयार करण्यासाठी रु. 1 अब्ज चे कर्ज देण्यात आले होते.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. सध्याच्या कामगारविषयक 44 कायद्यांचे चार गटांत वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण केले जाणार आहे. वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि ओद्योगिक संबंध अशा चार गटांत या कायद्यांचा समन्वय साधला जाणार आहे. 

2कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंडशी संबंधित कायदे, कामगार राज्य विमाविषयक कायदे, प्रसूतीविषयक सवलती आणि भरपाईविषयक कायदे यांचे एकाच सामाजिक सुरक्षा कायद्यात सुसूत्रीकरण होणार आहे.

3.औद्योगिक सुरक्षाविषयक सध्या अस्तित्वात असलेल्या खाण कामगार कायदा, गोदी कामगार कायदा आदी कायद्यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. किमान वेतन कायदा, बोनस कायदा, प्रोत्साहन आणि अन्य भत्ते या कायद्यांचेही सुसूत्रीकरण होण्याची शक्यता आहे. औद्योगिक तंटा कायदा 1947, कामगार संघटना कायदा 1926, औद्योगिक कामगार कायदा 1946 यांचेही सुसूत्रीकरण अपेक्षित आहे


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. पुढील पाच वर्षे केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्य समाजातील पाच कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना तीन प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जाणार आहेत. या शिष्यवृत्त्यांमध्ये पन्नास टक्के विद्यार्थिनींना सामावून घेतले जाणार आहे.

2. मदरशामध्येही आधुनिक शिक्षण देण्यासाठी जुलै महिन्यापासून नवा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्य कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. दहावीपर्यंत (प्री मॅट्रिक), दहावीनंतर (पोस्ट मॅट्रिक) आणि व्यावसायिक-तांत्रिक शिक्षणासाठी (मेरिट कम मिन्स) अशा तीन शिष्यवृत्त्यांचा लाभ अल्पसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळणार आहे.

 


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली. या यादीमधील पहिले नाव मुंबई शहराचे आहे. अॅपल आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे.

2. मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली. सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 58 टक्के अधिक वेळ लागतो.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 1862 :-अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली .
2. 1961 :-कुवेतला इंग्लंड कडून स्वातंत्र्य मिळाले .
3. 1966 :-शिवसेनेची स्थापना 
4. 1981 :- भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण 
5. 1941 :- फ्रेंच गणित तज्ज्ञ ब्लेस पास्कल यांचा जन्म 
6. 1947 :- ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म 
7. 1956 :- अमेरिकन उद्योगपती आय बी एम चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन 


Top