Sandip bakshi appointed as ICICI Director

 1. व्हिडिओकॉन उद्योग समुहाला दिलेल्या कर्ज प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी आता संदीप बक्षी हे बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत.
 2. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने 18 जून रोजी बक्षी यांची संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारीपदी नियुक्ती केली.
 3. त्यामुळे आता आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी 19 जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.


BCCI has declared permission to uttrakhand ranji team

 1. आगामी वर्षांत भारतीय स्थानिक क्रिकेटला आणखी एक सदस्य मिळणार आहे. बीसीसीआयने उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता दिली आहे. यासोबत उत्तराखंडची 18 वर्षांची तपस्या अखेर फळाला आली आहे.
 2. उत्तराखंडमधील क्रिकेटची प्रगती पाहण्यासाठी बीसीसीआयने 9 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
 3. अलीकडेच पार पडलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत क्रिकेट प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता मिळण्याबाबतच्या वृत्ताला होकार दर्शवला आहे.
 4. 9 सदस्यीय समितीमध्ये सहा विविध राज्यांच्या संघटनांचे सदस्य, एक उत्तराखंड सरकारचा प्रतिनीधी, दोन बीसीसीआयच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
 5. उत्तराखंड क्रिकेट संघटनेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये असणारे वाद आता मिटले आहेत. यानंतर सर्वानुमते उत्तराखंडच्या रणजीमधील सहभागाला हिरवा कंदील दर्शवला आहे.
 6. तसेच याआधी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मेघालय या 5 राज्यांनी आगामी रणजी करंडक स्पर्धेत आपला स्वतंत्र संघ उतरवणार असल्याचे सांगितले आहे.
 7. त्यामुळे आगामी काळात रणजी क्रिकेट स्पर्धा रंगतदार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.


 India's target of 175 GW from renewable energy sector till 2022

 1. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग म्हणाले की, भारत 2022 सालापर्यंत आपल्या अक्षय ऊर्जा क्षमतेला 175 गिगावाट (GW) पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.
 2. भारताच्या अक्षय क्षमतेत वेगाने वाढ झाली असली तरी तांत्रिक आणि आर्थिक आव्हाने उभी आहेत. जसे की पवन आणि सौर ऊर्जा अनियमित वातावरणामुळे अनियमित असू शकते आणि अशा ऊर्जेचे कुशलतेने वितरण करण्यासाठी भारतातील पॉवर ग्रीडचे आधुनिकीकरण केले जाणे आवश्यक आहे.
 3. दरम्यान, पवन आणि सौर ऊर्जा दरांनी इतकी खालची पातळी गाठली आहे की पुरवठादार अगदी कमी मार्जिनसह काम करत आहेत. म्हणजेच एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत या क्षेत्राचा विकास मंदावू शकतो.
 4. 69 GW क्षमतेचे लक्ष्य साध्य करण्याची काळमर्यादा सन 2016 आणि सन 2017 यशस्वी करण्यात भारत अपयशी ठरला आहे.
 5. त्यात हे 175 GW चे लक्ष्य म्हणजे येत्या चार वर्षांत 106 GW क्षमता प्रस्थापित करावी लागणार, जी गेल्या चार वर्षांमधील प्रस्थापित क्षमतेच्या दुप्पट आहे.
 6. एकट्या सौर क्षेत्रात, धोरण अनिश्चितता मोठ्या प्रमाणात आहे.
 7. फोटोव्होल्टाइक (PV) सेल उत्पादकांनी चीनकडून आयात होणार्‍या PVवर 70% अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची मागणी करत आहे. परंतु अशी कोणतेही शुल्क आकारल्यास पुरवठादार प्रभावित होतील जे चीनच्या हार्डवेअरवर अवलंबून असतात, यामुळे क्षेत्राच्या वाढीस धोका निर्माण होईल. 
 8. छतावरील सौर तंत्रज्ञान क्षेत्रात, 2022 सालापर्यंत 100 GW चे सध्याचे लक्ष्य आहे. सन 2013 आणि सन 2017 या काळात या क्षेत्रात प्रस्थापित क्षमतेत 117% वार्षिक वृद्धीदर नोंदविला आहे.
 9. ब्लूमबर्ग न्यू एनर्जी फायनॅन्स अहवालानुसार 2017 सालच्या अखेरपर्यंत भारताने लक्ष्यित केलेल्यापैकी केवळ 3% क्षमता साध्य करण्यात यशस्वी ठरला.
 10. ग्रिडसोबत जोडलेले छतावरील सौर यंत्रणेला आवश्यक लागणार्‍या धोरणाची कमतरता राज्यांमध्ये असल्याने अडचण दिसून येत आहे.


Can not adopt children living in live-in relationship: CARA

 1. मूल दत्तक घेण्याबाबत देशातील सर्वोच्च नियामक मंडळाने लिव इन संबंधामध्ये राहणार्‍या जोडप्यांवर मुलांना दत्तक घेण्यासाठी बंदी घातली आहे.
 2. या संघटनेचे असे मानणे आहे की, भारतात लग्न न झालेल्यांना एक स्थिर कुटुंब मानले जात नाही. 
 3. नवे नियम:-
  1. केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरण (CARA) एकट्या राहणार्‍या स्त्रीला पुरुष व स्त्री कोणतेही लिंग असलेले मूल दत्तक घेण्यास परवानगी देते, परंतु पुरुषाला केवळ पुरुष मूल दत्तक घेण्याची परवानगी दिली आहे.
  2. जर अर्जदार विवाहित असेल, तर पती/पत्नी दोघांचीही सहमती असावी लागेल आणि या व्यतिरिक्त त्यांना कमीतकमी दोन वर्षांपर्यंत स्थिर वैवाहिक जीवनात जगलेले असावेत.
  3. ‘दत्तक विनियम-2017’ अनुसार, अर्जदारांना शारीरिकदृष्ट्या, वित्तीय रूपाने आणि मानसिक रूपाने संपन्न असावे लागेल आणि त्यांची मूल दत्तक घेण्याची अत्याधिक इच्छा असावी.
  4. भारतात ‘घरगुती हिंसाचारापासून स्त्रीयांचे संरक्षण अधिनियम-2005’ मधून लिव-इन संबंधांना मान्यता दिली आहे. त्यामधून अश्या संबंधात राहणार्‍या स्त्रियांना देखील संरक्षण दिले जाईल.
 4. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA):-
  1. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) हे भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचे एक वैधानिक मंडळ आहे.
  2. हे भारतीय मुलांना दत्तक घेण्याकरता केंद्रीय मंडळच्या स्वरुपात कार्य करते तसेच देशांतर्गत आणि आंतर-देशांतर्गत दत्तक घेण्याच्या कार्यावरही देखरेख आणि नियंत्रणास बंधनकारक आहे.
  3. 2003 साली भारत सरकारने मान्य केलेल्या, 1993 सालच्या आंतर-देशांतर्गत दत्तक घेण्याच्या हेग कराराच्या तरतुदीनुसार आंतर-देशांतर्गत दत्तक घेण्यासाठी केंद्रीय प्राधिकरण म्हणून CARA ला मान्यता मिळाली आहे.   


Sustainable Gastronomy Day : 18 June

 1. 18 जून 2018 म्हणजेच आज द्वितीय ‘शाश्वत आहारशास्त्र दिन' (Sustainable Gastronomy Day) साजरा करण्यात आला आहे.
 2. 21 डिसेंबर 2016 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत एक ठराव अंगिकारला गेला.
 3. दरवर्षी 18 जूनला ‘शाश्वत आहारशास्त्र दिन’ साजरा करण्याचे मान्य करण्यात आले.
 4. आहारशास्त्र निरंतर विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता महत्त्वाची भूमिका निभावते.
 5. त्यामुळे आहारशास्त्रावर जगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. 


Top

Whoops, looks like something went wrong.