1. पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी 'एफ-16' लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या 'मेक-इन-इंडिया' योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.
  2. तसेच यासाठी 'एप-16' विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि  टाटा उद्योग समूहातील टाटा अडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या 'पॅरिस एअर शो'मध्ये अधिकृत करार झाला.
  3. या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी 'एफ-16'  विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे.
  4. भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही  'एफ-16'  लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.


  1. पंतप्रधान मोदींचे गुरु आणि  रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचे 18 जून रोजी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने  निधन  झाले. ते 98 वर्षांचे होते. नरेंद्र मोदीआणि स्वामी आत्मस्थानंद यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक ऋणानुबंध होते.
  2. 1966 मध्ये  स्वामी आत्मस्थानंद राजकोट येथील रामकृष्ण मठाचे प्रमुख म्हणून गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी मोदी स्वामी आत्मस्थानंद  यांना पहिल्यांदा भेटले होते.
  3. पंतप्रधान मोदींनी वयाच्या  20व्या वर्षी  स्वामी आत्मस्थानंद यांच्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी आत्मस्थानंद यांनी दीक्षा देण्यास नकार दिला, तसेच त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारण्याचा सल्ला दिला. मोदी आत्मस्थानंद यांच्या शिकवणीतून प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्मस्थानंद यांना गुरु मानले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.