chalu ghadamodi, current affairs

1. सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय सुरू झाली आहे.

2. तसेच न्यायालयाच्या वेबसाइटवर यासाठी ‘व्हर्नॅक्युलर जजमेंट्स’ असा स्वतंत्र शोधसंकेतक सुरू करण्यात आला आहे.

3. तर केरळ उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसारच ही भाषांतर सेवा सुरू केली गेली आहे.

4. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर गुरुवारी पहिल्या दिवशी हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू, बंगाली, आसामी व मराठीत भाषांतरित केलेली एकूण 113 निकालपत्रे प्रसिद्ध केली गेली. त्यापैकी 14 मराठीत आहेत.


chalu ghadamodi, current affairs

1. जीवनावश्यक वस्तू कायद्यातून अन्नधान्य क्षेत्राला वगळण्याचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. शेती क्षेत्रातील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीची पहिली बैठक दिल्लीत झाली.

2. जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे शेतीमालाचे दर नियंत्रित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. बिगर अन्नधान्य क्षेत्रासाठी हा कायदा कायम राहू शकतो, मात्र शेती क्षेत्रासाठी हा कायदा रद्द केला जावा वा अत्यंतिक गरजेच्या वेळीच त्याचा वापर व्हावा, असे मत समितीच्या बैठकीत मांडले गेल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

3. तसेच शेती क्षेत्र हा राज्यांचा विषय असल्याने 7 ऑगस्टपर्यंत राज्यांनी समितीला सूचना कराव्यात असे सूचवण्यात आले आहे. समितीची दुसरी बैठक मुंबईत 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.

4. शेती क्षेत्राचा विकासदर 3-4 टक्के असला तरी अन्नप्रक्रिया क्षेत्राचा विकास दर केवळ एक टक्का आहे. या क्षेत्राचा विकास कृषी क्षेत्राच्या विकासापेक्षा जास्त झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्यदर मिळणार नाही. शिवाय शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढीवरही विचार करण्यात आला. शेतीमध्ये 13 टक्के गुतंवणूक होते. त्यापैकी 76 टक्के गुंतवणूक शेतकऱ्यांकडूनच होते. हे पाहता शेती क्षेत्रात खऱ्याअर्थाने फक्त 3 टक्केच गुंतवणूक होते. त्यामुळे खासगी गुंतवणूक कशी वाढेल याबाबत विचारमंथन झाले.


chalu ghadamodi, current affairs

1. संयुक्त राष्ट्रांनी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला, 18 जुलैला हा दिवस  मंडेला डे म्हणून ओळखले जातो . दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन 18 जुलै रोजी झाला होता.
2. मंडेला यांना त्यांच्या मूल्यांकडे, वारसा आणि समाजातील योगदानाबद्दल श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाहीच्या चळवळीतील आणि जगातील शांततेच्या संस्कृतीस प्रोत्साहन देण्यातील त्याचे योगदान ते मान्य करतात.
3. नेल्सन मंडेला फाऊंडेशनने
2019 ची  थीम म्हणून" मंडेला डे: द नेक्स्ट चॅप्टर "नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. हि योजना शिक्षण आणि साक्षरता, अन्न आणि पोषण, निवारा, स्वच्छता यासारख्या पाच भागात केंद्रित आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. गत सात वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर 2 पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे. त्यामुळे बिल गेट्स श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

2. ब्लूमबर्ग                              बिलेनिअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे दुसर्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर, श्रीमंतांच्या यादीत क्रमांक एकवर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (अमेरिका) यांचे वर्चस्व कायम आहे.

3. तसेच बर्नार्ड अरनॉल्ट हे फ्रान्समधील लग्झरी गुड्स कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. 70 वर्षीय अरनॉल्ट यांची कंपनी फ्रान्समधील चर्चित कंपनी आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. सन 1832 मध्ये सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

2. क्रांतिकारक मंगल पांडे यां चा जन्म 19 जुलै 1827 मध्ये झाला.

3. लॉर्ड कर्झन यांनी 19 जुलै 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती.

4. सन 1969 मध्ये भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

5. नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना 19 जुलै 1976 मध्ये करण्यात आली.


Top