Maharashtra government has announced 20 crore rupees relief fund for kerala flood

 1. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
 2. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
 3. तर समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 4. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.


Kofi annan former un secretary general dies

 1. संयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला होता.
 2. 1997 मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती. पुढे ते 1962 ते 1974 आणि 1974 ते 2006 इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात ते काम करत होते. 
 3. त्याचबरोबर, 1962 मध्ये कोफी अन्नान यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेत 3 वर्षे बजेट अधिकारी म्हणून काम केले होते.
 4. 1965 ते 1972 या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले. 
 5. कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्च केले आहे. त्यासाठी, त्यांना 2001 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते.
 6. तसेच गरीबीचे उच्चाटन कसे करता येईल यादृष्टीनेही त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले आहे.


Imran Khan took oath as Pakistan's 22nd Prime Minister

 1. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.
 2. दोन दशकं राजकारण केल्यानंतर त्यांच्या पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तेच पाकिस्तानचे पंतप्रधान होतील अशी शक्यता त्याच वेळी वर्तवण्यात आली होती.
 3. शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपलं मताधिक्य संसदेत दाखवलं. खान यांना 176 मतं मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मतं मिळाली.
 4. प्या शपथविधीसाठी सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धू, कपिल देव यांच्यासह अनेक मान्यवरांना पाकिस्तानला निमंत्रित केलं होतं.त्यापैकी सिद्धू या सोहळ्यास उपस्थित होते.
 5. इम्रान खान यांनी कॅप्टन म्हणून 1992 साली पाकिस्तानला क्रिकेट वर्ल्डकप जिंकवून दिला होता. पाकिस्तानचा सगळ्यांत यशस्वी कॅप्टन म्हणूनही त्यांची ओळख आहे.
 6. इम्रान यांनी 1996 मध्ये PTI पक्ष स्थापन केला आणि राजकारणात प्रवेश केला. पण त्यांना राजकारणात दखल घेण्याजोगं यश संपादन करण्यासाठी 2013 साल उजाडावं लागलं. त्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये PTI तिसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला.


Vajpayee's name given to cyber tower, tribute to Atalarnala, Mauritius

 1. जगभरात हिंदी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी शनिवारपासून मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 2. या संमेलनात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याशिवाय मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी ज्या सायबर टॉवरच्या निर्मीतीमध्ये वाजपेयींनी सहकार्य केलं होतं, त्या सायबर टॉवरला ‘अटल बिहारी वाजपेयी’ नाव देण्याची घोषणा केली.
 3. संमेलनाच्या सुरूवातीला दोन मिनिट मौन धारण करुन वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यादेखील उपस्थित होत्या.
 4. संमेलनात भारतीय नेत्यांसह जगभरातील विविध देशांचे नेत्यांनीही भाग घेतला. यापूर्वी वाजपेयींचा सन्मान म्हणून मॉरीशसने त्यांचा राष्ट्रध्वजही खाली घेतला होता.
 5. हिंदी संमेलनात सहभागी होण्यासाठी जवळपास २९० अधिकारी लुईस पोर्टवर दाखल झाले होते. देशातील २९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधींनी या संमेलनात पहिल्यांदाच भाग घेतला आहे. हे संमेलन ३ दिवस चालणार आहे.
 6. दरम्यान, या संमेलनात विविध हिंदी आणि भारतीय संस्कृतीवरील ८ विषयांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदींनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Top